महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
मिरा भाईंदर येथील रॉयल कॉलेज, एल आर तिवारी महाविद्यालय व भाईंदर पश्चिम येथील रिना मेहता कॉलेज, मिरा रोड स्टेशन परिसर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिक ठिकाणी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/d1KyMziqzy
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #mnsadhikrut_
“नंदन निलकेणींनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ?”
- मा. राजसाहेब ठाकरे
#RajThackeray
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.
१) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.
२) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही.
३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ?
४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं.
५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ?
६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ?
७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे.
८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता.
९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?
देशाच्या पंतप्रधानाला बॉलिवूडच्या लोकांना भेटायला वेळ आहे, पण हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. अजूनही भेटायची हिम्मत नाहीये, आताही घरातूनच सेल्फी व्हिडिओ सुरू आहेत. #Shame
सगळा देश त्या दोघांना माफी मागा सांगतोय
पण ते दोघे लपून बसले आहेत
राज ठाकरेंनी मात्र काल सुवर्णपदक विजेता दिलीप गावित यांची भेट न घेऊ शकल्याने मनात कोणतीही आढी न ठेवता दिलगिरी व्यक्त केली
आमदार,खासदार,मंत्री या संख्येपेक्षा राजकारणातली वैचारिक उंची राज ठाकरेंना सर्वोत्तम ठरवते
राजसाहेब ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याच्या घोषणेला ९ वर्ष झाली, या काळात नाशिकची पूर्ण दुरवस्था झाली आहे. नाशिकवरच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यात पडून नागरिक दगावत आहेत. शहर बकाल झालं आहे. या सगळ्याचा लेखाजोखा घेण्यासाठी, आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राजसाहेब नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळेस नाशिकमधील जेनझीने त्यांची भेट घेतली.
#Rajthackeray #students #NEETprotest
#MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
महात्मा नाईट डिग्री कॉलेज, चेंबूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/pWHePoK2xP
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं.
अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.
गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.
एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं.
शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे |
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले विधानसभा, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/pWHePoK2xP
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ह्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचे मोजमाप करणे कठीण आहे! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील ह्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबियांना ह्या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांती!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
या अभियानाअंतर्गत टिळक कॉलेज, सीवूड,नवी मुंबई व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी, नवी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/6bsCPGXW31
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
या अभियानाअंतर्गत विकास कॉलेज, विक्रोळी पूर्व व श्रीराम कॉलेज, भांडुप पश्चिम येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/pWHePoK2xP
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे.
या अभियानाअंतर्गत श्री. नारायण गुरु कॉलेज, मानखुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केंद्र उभारले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य व्हा!
https://t.co/pWHePoK2xP
#AmitThackeray
#JoinMNVS #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे शिक्षणाचं माहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं! तिथेही काही नाही झालं! आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर Gen Z चा पारा चढणार की नाही चढणार? : राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #ChandrakantPatil #MaharashtraPolitics #MarathiNews