शेतकऱ्यांना कर्जमाफिचा नाद लागलाय पण आम्ही निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासन देतो बाबासाहेब पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध..
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
युवा एल्गार सभा
प्रमुख मार्गदर्शक :
सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
दिनांक : 🗓️15 सप्टेंबर 2025
वेळ : 🕚सकाळी 11 वाजता
स्थळ : 📍मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ, एसटी स्टँडच्या समोर, अक्कलकोट.
#युवा_एल्गार_सभा#VBAForIndia
आज जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे प्रगतीशील शेतकरी कंधार तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालूका अध्यक्ष संतोष पाटील गवारे यांना जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, जिल्हा उप निरीक्षक यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले..
@VBAforIndia@Prksh_Ambedkar.
युगप्रवर्तक, अखंड भारतातील बहुजनांचे उधारकर्ते, समतानायक डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित वंचित बहुजन आघाडी , युवा आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले..
@VBAforIndia
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत.
आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया.
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया...जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया...!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
जय भीम!
#BhimJayanti #BhimraoAmbedkar
बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाअध्यक्ष शिवाभाऊ नरगले, संतोष पाटिल गवारे, अमोल तेलंग, मोसीन बागवान वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..
@VBAforIndia#ShivajiMaharajJayanti