अजितदादांचा घातपात की अपघात हा मुद्दा ताटकळत ठेऊन..हे लोक त्यांची जयंती आणि आम्हाला दादा कसे प्रिय होते..? याचं गुणगान कसं काय गाऊ शकतात.?
अपघात असेल तर रोहित पवारांनी उचललेल्या मुद्द्यांचे काय..? आणि घातपात असेल तर त्याचा मास्टरमाईंड कोण..? याची उत्तरं शोधा..मग पुष्पहार घ्या..❤️
रशियाने सांगितल्यानंतर मग भारतीयांना समजलं.. शंभरेक भारतीय मेले.. ही परिस्थिती आहे इथल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची.. अजिबात विश्वास ठेवू नका यांच्यावर.. देशाचं वाटोळं करण्यात ही माध्यमे आघाडीवर आहेत.. त्यानंतर राजकारणी.. असो..❤️
#भारत
नीट परीक्षेत ज्या पद्धतीने खेळ झाला असण्याच्या शक्यता आणि पुरावे समोर येत आहेत.. त्या पाहता भारत सरकारने यात जातीने लक्ष घालून न्याय करायला हवा..म्हातारी मेल्याचं दुःख नाही.. काळ सोकावतोय..❤️
#NEET
यांना पीएम केअर्स बद्दल बोलायला हिंमत नाही..एपस्टिन बद्दल बाजू मांडायला हिंमत नाही..देशभरात यांचे पक्षबांधव कुऱ्हाडी घेऊन झाडं नामशेष करत आहेत..हे स्वतः जंगल अदानीच्या नावावर करत आहेत..त्याबद्दल बोलायला हिम्मत नाही.
जनतेला सल्ले मात्र स्वतः कोणीतरी तज्ञ असल्यासारखे देतात..❤️
महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्र्याची गरज आहे. मुख्यमंत्री पद, इन्फ्रामॅन, राजकीय डावपेच, पक्ष फोडाफोडी अशा सगळ्या जबाबदाऱ्या असताना गृहमंत्री पदाकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे! एक पुणेकर म्हणून तर हे प्रकर्षाने जाणवतंय!
गुन्ह्यांच्या बाबतीत पुण्याचा ग्राफ इतका खाली कधीच गेला नव्हता.
संतांच्या भूमीत बुवाबाबांचे उठलेले पेव या राज्याची परिस्थिती विशद करणारी आहे.. त्या बुवाबाबांना राजाश्रय मिळवू देणारी वृत्ती खरा राज्यद्रोह आहे..त्या द्रोहाला पुरून उरण्याची ताकद सामान्य मराठी माणसाला लाभो.. याच महाराष्ट्रदिनी शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..जय मराठी..❤️
#महाराष्ट्रदिन
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
माझा बाप माझी काळजी न करता एक दिवस अचानक निघून गेला आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप डोळे फुटेपर्यंत रडला. कधी कधी अजूनही रडतोय,आयुष्यभर रडेल,रडतच राहील. कदाचित त्याच्यासाठी कुणीतरी शेवटचे रडेपर्यंत..!
पितृदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आभाळातल्या बापा... ❤️😥
#बाप_माणूस
बापाशिवाय आयुष्यं म्हणजे, कमी वयात बरेच काही भोगायला लावते. पण, तरीही प्रत्येकजण त्यातून कधी ना कधी जातोच. काहीजण त्यातून बाहेर पडतात, तर काहीजण त्याच दुःखात राहूनही त्याला सामोरं जातात. बाप गेल्यावर जे शून्य राहते, ते भरून काढण्यासाठी कधी कधी आयुष्यभर धडपडावं लागते..!
#स्वानुभव
माय-बाप जिवंत असतात तोपर्यंत जगण्यात खरी मजा असते. एकदा ते गेले की कुणाला सांगणार आपलं यश आणि अपयश. एखाद्या गोष्टीत अपयश आलं तरी प्रेमाने पाठीवरून हात फिरवणारे आणि पुन्हा हिंमत देणारे आई वडीलच असतात. ते निघून गेले की या स्वार्थी जगात असतेच कोण आपल्या हक्काचे..!?🥹
#स्वानुभव
महाराष्ट्रातील लोकांना जगद्गुरू तुकोबाराय वाचायचे नसेल आणि खातू श्याम बाबा ने केलेले तथाकथित चमत्कार जवळचे वाटत असेल तर संघाने आपल्या संस्कृतीवर केलेले आक्रमण आहे
मरा तुम्ही तुमच्या कर्माने 😡
जिथं चढण्याचं धाडस फक्त वारा.. आणि उतरण्याची हिंमत फक्त पाण्याची धार करू शकते.. असा स्थापत्य वारसा निर्माण करणारा अग्रणी युगप्रवर्तक राजा म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज.
श्वास रोखून धरायला लावणारा इतिहास..ज्वलंत इतिहासाच्या जिवंत कारागिरास मानाचा मुजरा..!❤️
#छत्रपतीशिवाजीमहाराज#म