ज्या पुण्याचे गणेशोत्सव, भाषा आणि शिस्त संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श होती, तिथे आज काय पाहायला मिळतंय ? कानठळ्या बसवणारा डीजे, लेझर शो, भाषेचे होत चाललेले हिंदीकरण आणि रस्त्यांवरची वाढती विकृती ! 'गायपट्ट्यातील' चुकीच्या प्रथांची री ओढताना आपण आपली मूळ पुणेरी संस्कृती नष्ट तर करत नाही ना ?
विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर पुण्याच्या संस्कृतीला 'काशी'ला जायला वेळ लागणार नाही !
#पुणे #PuneCulture #पुणेरीसंस्कृती
दिवा प्रभाग समिती अतंर्गत बेडेकर नगर येथील हि गटाराची परिस्थिती आहे सर्व झाकणे तुटून गेली आहेत.
तिथून शाळकरी विद्यार्थ्याची रहदारी आहे काही अपघात होऊ नये म्हणून पालिकेने हे गटार लवकर दुरुस्त करावे.
हि नम्र विनंती.
@TMCsmartcity@TMCaTweetAway@PrashantGawad29
हाच फरक आहे मुंबई व दिल्ली पोलिसांमधला !
ज्या प्रकारे ती एकटी महिला भगिनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांना नेत असताना पोलिस व्हॅन समोर उभी राहून विरोध करत आहे,एकटीच नडत आहे ते पाहता तिच्या या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. पण त्याच सोबत आमचा मुंबई पोलिसातला माणूस,जो लाठीमार न करता संयम ठेऊन उभा आहे,त्यांचेही कौतुक करायलाच हवे.या महिला भगिनीच्या धैर्याला व आपल्या मुंबई पोलिसांच्या संयमाला मनसे सलाम ! 🫡
@MumbaiPolice
दररोज जीव मुठीत धरून सुरू असलेला हा दिवा वासियांचा खडतर प्रवास कधी सुखकर होईल ? दिवा लोकलचे सुरू होण्याचे स्वप्न नक्की कधी पूर्ण होणार ?? अजून किती बळी गेले की प्रशासनाला जाग येईल ? प्रशासकीय अनास्था ही रेल्वे प्रवाशांच्या जीवावर उठतेय!
@GM_CRly@Central_Railway@RailMinIndia
दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २८ मधील नाईक नगर येथील पथदिवे गेली तीन दिवस झाले बंद आहेत. तरी आपण लवकरात लवकर पथदिव्यांची दुरुस्ती करून दिवे चालू करण्यात यावे ही विनंती.
@TMCaTweetAway@rajupatilmanase
दिवा प्रभाग क्रमांक २८ मधील बेडेकर नगर येथे गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कृपा करून यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती.
@TMCaTweetAway@rajupatilmanase
पहलगाम अतिरेकी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावर मा.राजसाहेब ठाकरेंनी भूमिका मांडली होती की ‘या पाक अतिरेक्यांना व त्यांच्या पाकिस्तानात लपुन बसलेल्या आकांना पाकिस्तानमध्ये घुसून शोधून शोधून ठोकायला पाहिजे,जसे की अमेरिकेने Twin Towers पाडल्यावर ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानात घुसून बोचका बांधून समुद्रात फेकला होता. तसेच देशात लपलेले बांगलादेशी व पाकिस्तानी शोधून त्यांना हाकलायला पाहिजे.युद्ध हा उपाय नाही तो कोणालाही परवडणारा नाही, जे लोकं आता युद्ध करा म्हणून उडताहेत त्यांनी कधी युद्ध पाहिले आहे का ? युद्धाचे काय परिणाम होतात त्याची कल्पना आहे का ?‘ या आशयाचे बोलले होते तेव्हा कोविडमध्ये थाळ्या वाजविणारी जमात भारताने पाकिस्तानसोबत युद्ध करायला पाहिजे असे बोलत होते ,हेच अंड भक्त मा.राजसाहेबांवर खालच्या स्तरावर टीका करत होते. आज तिकडे #epstein_files चे लक्ष दुसरीकडे जावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत छेडलेल्या युद्धामुळे आत्ताच आपला देश गॅसवर आहे ! प्रत्यक्षात युद्धाच्या झळा काय असतात तो हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून तरी अंडूल्ल्यांच्या रिकाम्या डोक्यात प्रकाश पडेल अशी व्यर्थ आशा करायला हरकत नाही.
#Stop_the_war_save_innocent
बेडेकर नगर येथील अंतर्गत नाल्यांची सफाई न झाल्यामुळे सर्व सांडपाणी चाळीत येत आहे. याकडे दिवा प्रभाग समितीच्या स्वच्छता विभागाने तात्काळ लक्ष देऊन संबंधित ठिकाणी नाल्यांची सफाई लवकरात लवकर करण्यात यावी, ही विनंती.
@TMCaTweetAway@rajupatilmanase@mieknathshinde
होलिका दहनाच्या पवित्र अग्नीत
आपल्या सर्व चिंता, दुःख आणि नकारात्मकता भस्म होवो,
आणि जीवनात सुख-शांती व समृद्धी नांदो.
होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥🙏
शेवटी भटक्या कुत्र्यांमुळे दिव्यात अजून एक जीव गेला. भिकारड्या महापालिका प्रशासनामुळे भटके कुत्रे आणि त्यांना खायला घालणारे पशुप्रेमी माजलेत. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि त्यांना खायला घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तरच हे हल्ले थांबतील.
@TMCaTweetAway@ThaneCityPolice
बेडेकर नगर येथे मनसे शाखेसमोरील रस्त्यांवर असलेल्या गटारांची झाकणे ही अशा अवस्थेत आहेत. महानगर पालिकेने तातडीने ही झाकणे बसविण्यात यावीत. बाजूला शाळा आहे. एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण असेल ?
@TMCaTweetAway@TMCsmartcity@rajupatilmanase
दिवा पश्चिमेला फाटका जवळ दिवा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. सर्वत्र दुर्गंधी आणि घाण वास सुटलाय. त्वरीत हा कचरा उचलावा. गणपती निम्मित पाहुणे गावात येतात आणि महानगर पालिकेची लाज काढतात. बघवत नाही हो बाकी काय नाही.
#स्वच्छ_ठाणे#स्वच्छभारत@TMCaTweetAway
बेडेकर नगर येथे मनसे शाखेसमोरील रस्त्यांवर असलेल्या गटारांची झाकणे ही अशा अवस्थेत आहेत. महानगर पालिकेने तातडीने ही झाकणे बसविण्यात यावीत. बाजूला शाळा आहे. एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण असेल ?
@TMCaTweetAway@TMCsmartcity@rajupatilmanase
दिवा स्टेशन ८.०३ ची ट्रेन ८.२० आणि कोपर स्टेशन ७.५४ ची ट्रेन ८.०४ ला येत असेल तर गर्दी नाही होणार तर काय होणार ? सध्या ना पाऊस, ना वारा तरी लोकल १०- १५ मिनिटं उशीरा. अरे एक दिवस तरी लोकल वेळेवर चालवा. @Central_Railway निर्लज्जम् सदासुखी
@RailwaySeva@drmmumbaicr@RailMinIndia
दिवा प्रभाग समिती अंतर्गत बेडेकर नगर येथे मनसे शाखे जवळ हा पथदिवा गेली पंधरा दिवस बंद आहे तरी आपण ती त्वरित दुरुस्त करून द्यावी
@TMCaTweetAway@TMCsmartcity