भ्रष्ट, जुलमी आणि अन्यायी राजवटींना नमवून शिवरायांनी स्वाभिमान, स्वतंत्रता, सहिष्णूता आणि न्याय या मूल्यांनी अलंकृत असे रयतेचे कल्याणकारी स्वराज्य स्थापन केले. जातपात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन रयतेच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य, धैर्य, पराक्रम, कर्तुत्व आणि नेतृत्वाचा सर्वोच्च आदर्श आहेत. रयतेच्या जाणत्या राजास पुण्यस्मरणदिनी विनम्र अभिवादन.
संभाजी महाराजांचा घात हा शिर्के यांनी नाही तर त्यांच्या ब्राह्मण सरकारकुनांनी केला होता. हे सत्य पुराव्यानिशी इंद्रजित सावंत यांनी उघडकीस आणले.
त्यामुळे इंद्रजित सावंत यांना धमक्या देण चालू केल आहे. याचा जाहीर निषेध.
माझे सामर्थ्य, माझे आबा!
माझ्यासाठी हिम्मत आहेत आबा,
मित्र, गुरू, वडील आणि माझा रूतबा!
लढण्याची ऊर्मी, भिडण्याची ताकद आहेत आबा, माझा सन्मान आणि ओळख आहेत, माझे बाबा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा!
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,
आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत माय-बाप जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा मी अतिशय नम्रपणे स्वीकार करतो. या संपूर्ण प्रचार काळात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीचे सर्व कार��यकर्ते, पदाधिकारी, नेते यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मतदारांनीही माझ्यावर विश्वास टाकून भरभरून मतदान केले. याबद्दल त्यांचेही आभार. भविष्य सुद्धा असेच सोबत राहू. तुमचा सेवक म्हणून नेहमी कार्यरत राहीन.
धन्यवाद,
युगेंद्र श्रीनिवास पवार
हक्काचे उद्योग प्रकल्प हिरावले, महागाई वाढवून ठेवली, राज्यातील युवांना बेरोजगार केलं आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे महायुती सरकारच. महायुती सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जाब विचारायलाच हवा, महाराष्ट्राचा हक्क मागायलाच हवा! 'हक्क मागतोय महाराष्ट्र’ या मोहीमेत सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिसकॉल द्या!
#हक्क_मागतोय_महाराष्ट्र #विधानसभा२०२४
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून मा���ी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. माझ्यावर विश्वास दर्शवत ही जबाबदारी सोपवणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाचे मनापासून आभार !
महात्मा फुले हे कृषी क्षेत्रातील आधुनिक विचारवंत म्हणून ओळखले जातात. देशाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासाचा पाया कृषीक्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहे. भूमी व भूमिपुत्र समृद्ध झाल्याशिवाय कृषिप्रधान देशात सर्वांगीण विकास साधता येणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या विचारांचा पाईक म्हणूनच सर्व आमदारांना वेगवेगळ्या विद्यापीठात सदस्य म्हणून संधी मिळत असताना मी आवर्जून विनंती करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाची निवड केली.
संशोधनाच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या, अनेक प��रगतशील शेतकरी, संशोधक व अधिकारी घडवणाऱ्या विद्यापीठाचा सदस्य म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करेन.
I am honored to have been appointed to the Executive Council of Mahatma Phule Agricultural University, and I thank the university administration for trusting me with this responsibility.
Mahatma Phule, a modern thinker in agriculture, believed that progress in an agrarian country can only be achieved when the land and its farmers prosper. As a member, I will do my part to contribute to in driving agricultural transformation through research and innovation.
#MahatmaPhuleAgriculturalUniversity
महाराष्ट्रात भाजपचे पाळीव कुत्रे (आणि एक साप), त्यांच्या भोकात परतताना पाहणे या पेक्षा समाधानकारक काही नाही. सत्ता कायमस्वरूप��� टिकत नाही. दहा वर्षांच्या निर्दयी ट्रोलिंगनंतर, कर्म त्यांच्यासाठी जरूर येईल.
फाटलेला फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाही. अशा फोटो किंवा चित्र कुठेही नाही, हे पोस्टर कुणी बनवले याचा शोध घेतला पाहिजे. मी स्���तः ग्राफिक्स व्यवसायिक होतो, त्यामुळे मी ही Image कधीच बघितलेला नाही. मोर्फ केलेला किंवा Google Varun किंवा AI वरुन बनवलेली ही खोटी प्रतिमा दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा असूच शकत नाही. त्यामुळे झालेल्या प्रकरणात महामानवाचा फोटो फाडला म्हणणाऱ्या मीडियाने या प्रतिमाची चौकशी न करता बातम्या दाखवून परत एकदा अवमान केला आहे.
आंदोलक म्हणून सतर्कतेची भूमिका घेतली पाहिजे होती ती नेता असो क�� आयोजक यांनी घेतलेली नाही. हे पोस्टर आणणारे नक्की कोण आहेत? याकडे सुद्धा गांभीर्याने बघितले पाहिजे.
मी जितेंद्र आव्हाड ला कधीही भेटलेलो नाही, त्यांच्या गळ्यात सुद्धा पडलेलो नाही. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा संबंध नाही. आंबेडकरी तरुणांनी कोणत्याही ट्रॅप मध्ये अडकु नये.
आज बोलणारे मनुस्मृती अभ्यासक्रमांत लागू होत असताना कालपर्यंत गप्प होते. ते गप्प राहिले नसते तर जितेंद्र आव्हाड यांना आंदोलन करण्याची गरजच पडली नसती पण ती तत्परता दाखवण्याचे काम आजच्या तात्काळ पुढे आलेल्यांनी दाखवले नाही.
भावपूर्ण श्रध्दांजली !
माझा जिवाभावाचा सहकारी, युवक काँग्रेसच्या चळवळीपासून सातत्याने संपर्कात असलेला धडाडीचा कार्यकर्ता नागपूरचा अक्षय घाटोळे याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व करण्याचं स्वप्न उराशी बाळगून अक्षय त्याच्या वॉर्ड मध्ये प्रचंड सक्रिय होता. माझ्याकडे आग्रह करून, सातत्याने पाठपुरावा करून त्याने नुकतेच त्याच्या वॉर्डमध्ये शिवभोजन थाळी केंद्रही सुरू करून घेतले होते. अक्षय सारख्या धडाडीच्या युवकाचं असं अचानक निघून जाणं हे केवळ त्याच्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीही नुकसानकारक आहे.
अक्षयच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
दुय्यम निबंधक असणाऱ्या मित्राचे दोन वर्षाचा मुलगा असणाऱ्या विधवेबरोबर लग्न ठरलंय. सुरुवातीला घरच्यांनी विरोध दर्शवला होता. तु एवढा मोठा अधिकारी आहेस, लोकं काय म्हणतील वगैरे.. पण नंतर तयार झालीत. समाजसुधारक फक्त पाच दहा मार्कापुरते वाचले नाहीत तर जगतोय पठ्ठ्या..
अभिमान आहे मित्रा