आज ड्रग इन्स्पेक्टर पेपर संदर्भात काही महत्त्वपूर्ण साक्षी पोलीस यंत्रणांकडे नोंदवल्या जाणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे त्याकडे लक्ष आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणी पारदर्शक तपास महत्त्वाचा आहे. चार दिवसांपूर्वी आयोगाची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी लिंक जाहीर करण्याचा त्यांनी शब्द दिला होता, अद्यापही लिंक उपलब्ध केलेली नाही, या दिरंगाईचे कारण काय?
आज अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांकडे येणार आहेत, त्यामुळे आयोगाने आता तरी दिरंगाई न करता आजच्या आज FIR नोंद करून घ्यावा! प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांनीदेखील विसरू नये!
#DrugInspectorExam #पेपरफुटी #MPSC #StudentsJustice #स्पर्धापरीक्षा #PaperLeak
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मिडिया विभागाचे प्रमुख महादेव बालगुडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन सरकारने जेलमध्ये डांबलं, पण अखेर न्यायालयाने त्यांना जामीन दिला, याबाबत मा. न्यायालयाचे मनापासून आभार! बालगुडे यांनी राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं किंवा देशाची एकता-अखंडता धोक्यात आणणारी कृती केली असं कुठंही दिसत नसल्याचं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आणि सरकारवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, अशा शब्दांत सरकारची कानउघाडणीही केली.
खुद्द न्यायालयानेच कान उपटल्याने आतातरी सरकार ताळ्यावर येईल आणि विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणार नाही, ही अपेक्षा! गुन्हा खोटा असला तरी जामीन मिळण्यास वेळ लागला परिणामी त्यांच्या कुटुंबाला खूप काही सहन करावं लागलं, याची आम्हाला कायम खंत राहील.
@Dev_Fadnavis@Mahadev_Balgude
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
DAY 8
Still Alive, though not kicking….
Some 7,000 people gathered at Jantar Mantar today from morning to evening. Leaders of various social and political movements spoke in support. A clear indication of how effective this movement is can be judged from the number of trolls in the comments below. Over the years I’ve seen that this number is directly proportional to the impact. I’ll be so sad & dejected the day they go missing. Thank you, my success-o-meter, for your hard work.
#SonamWangchuk #CJP #JantarMantar #Education
कोर्टाचा निर्णय धक्कादायक!
आणि असे असून, जर ओम राजे निंबाळकर युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असतील, ज्यात त्यांच्या वडिलांच्या हत्येतील प्रमुख आरोपीच्या भगिनी आहेत आणि हे प्रमुख आरोपी हे भाजप चे आमदार आहेत, आणि हे केवळ पैशासाठी होत असेल, तर यपेक्षा मोठे दुर्दैव नाही.
नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान ✈️ उतरते
ऑपरेशन 🐅 नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते
यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती
खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामा मुळे वाढली
प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल ।
डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला
🐅 का म्हणता?
ही आहे राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पारदर्शक पोलखोल... भाजप मंत्र्यांच्या बाबतीत तर हे कंत्राटदार काय म्हणतात ते स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या सरकारने कान खोलून ऐकावं..
या सरकारने आधीच मराठी कंत्राटदारांची सुमारे 1 लाख कोटी रुपयांची बिले थकवली आहेत, त्यातही कामं देतानाच त्यावर कसा आडवा हात मारला जातो, हे यानिमित्ताने जगजाहीर झालं. त्यामुळं कमिशन खाणारं हे दलाल सरकार आहे, असंच म्हणावं लागेल. आता उघडपणे बोलणाऱ्या या कंत्राटदारांना सरकारने जाणीवपूर्वक त्रास दिला तर महाराष्ट्र धर्माला जागून या कंत्राटदारांसाठीही प्रसंगी रस्त्यावर उतरू..!
#कंत्राटदार #थकीत_बिले #भ्रष्टाचाराची_पोलखोल #CorruptionExposed
HOPE FOR THE BEST, PREPARE FOR THE WORST.
Let’s make this the most peaceful movement in India's history.
Please be vigilant that no miscreants play mischief.
See you all in Delhi tomorrow...
#CockroachJantaParty#CJP#SonamWangchuk
दूरदृष्टी, विचार आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श ठेवणारे आधुनिक भारताचे प्रथम पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांना बळ देत आधुनिक राष्ट्राची पायाभरणी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीला नवी दिशा दिली. औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी भारताला आधुनिकतेकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
भारताच्या उज्ज्वल भविष्याचे महामेरू पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत विज्ञान, शिक्षण आणि लोकशाही मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत देशाला प्रगतीची नवी दिशा दिली. औद्योगिकीकरण, शैक्षणिक संस्थांची उभारणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख मजबूत करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.