मन जपताना कधी स्वतःला हरवू नये
नातं टिकवताना स्वतःला विसरू नये..
आयुष्य क्षणभंगुर आहे एवढं लक्षात ठेवावं
जे खरं आहे त्याला कधीच दूर करू नये..🤍
#शब्दस्पर्श
मयूर ठाकरेने ऋतुजा पाटीलच्या वडिलांची आणि कौटिल्यचे प्रवीण पाटील यांची भेट घडवून आणली होती. ही बाब पोलीस आयुक्त तसेच आयोगाला देखील गेल्या महिन्यात लक्षात आणून दिली होती. आज मयूर ठाकरेला सुद्धा अटक झाली आहे.
राज्यभर पेपर विकणाऱ्या एजंटचे जे जाळे आहे त्यामध्ये एक एजंट मयूर ठाकरे हा आहे. CET, TET, MPSC अशा सर्व प्रकारचे पेपर याच्याकडे उपलब्ध असायचे. याच्या मुसक्या आवळल्या तर तलाठी भरती तसेच इतर परीक्षांचे पेपर फुटीचे धागेदोरे सापडतील. आम्ही अजून बरीच नावे दिली आहेत त्यांचा देखील तपास झाला तर खरा आका देखील नक्कीच सापडेल.
@Dev_Fadnavis
#MPSC #TET #CET #पेपरफुटी #ExamScam #PaperLeak
#MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजीची भावना आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक विद्यार्थी, सर्व क्लासचालक आणि अभ्यासिका चालक यांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांना विशेषतः पोलीस आयुक्तांना एकच सांगणं आहे, धमक्या द्यायच्या असतील तर कोयता गँगला द्या, बनावट दारू विक्रेत्यांना द्या!
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाद करू नका, अन्यथा ही बाब महागात पडेल. हे सर्व स्वाभिमानी मराठी विद्यार्थी आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, हे पोलीस प्रशासनाने विसरू नये!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#MPSC_विद्यार्थी #पुणे_पोलीस
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटला असेल तर परीक्षेच्या दोन महिने आधीच पेपर फुटला ही बाब अत्यंत गंभीर नाही का ? परीक्षेच्या दोन महिने आधी पेपर फुटला असतानादेखील मार्च मध्ये पेपर घेतलाच का? दोन महिने आयोग झोपा काढत होता का ?
कर्णिक घोटाळ्यासारखेच हे प्रकरण असून आपण जो विश्वासघात केलाय ना त्यामुळे अभ्यास करावा की करू नये ? या द्विधा मनस्थितीत आज विद्यार्थी आले आहेत, लायब्ररीतसुद्धा बसण्याची कोणाची मानसिकता राहिलेली नाही. संवैधानिक पदाची, आयोगावरच्या विश्वासाची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आपल्याला खरंच काळजी असेल तर तत्काळ नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्या आणि लाखों विद्यार्थ्यांवर उपकार करा.
राहिला विषय वैयक्तिक आणि राजकीय आरोपांचा, त्यासंदर्भात मी अजून एक टक्का देखील बोललेलो नाही, जेव्हा बोलायला सुरुवात करेल ना तेव्हा आपणच काय तर आपला पाठीराखा असलेल्या सरकारला सुद्धा परवडणार नाही कारण मी पुराव्याशीवाय बोलत नाही.
#MPSC #पेपरफुटी
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
औषध निरीक्षक पदाच्या पेपरसाठी ५० लाख????
पेपरफुटीच्या तपासात पुढं येत असलेले तपशील हे अत्यंत धक्कादायक आहेत.
५० लाख घेऊन पेपर देणाऱ्या सिस्टिममधील या किड्यांपर्यंत तपास पोचला पाहिजे. अन्यथा एकही किडा लपून राहिला किंवा सरकारने त्याला वाचवला तर तो आणखी किड्यांची पैदास केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं व्यवस्था पोखरणारी ही कीड मुळातून नष्ट झाली पाहिजे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असला तरी तो बड्या किड्यांपर्यंत पोचतोय की नाही, यावर आमचं बारकाईने लक्ष आहे.
@Dev_Fadnavis@mpsc_office
MPSC Paper Leakचा पर्दाफाश करणारा तरुण! 10 लाखाची offer! प्रचंड मानसिक त्रास! पोलिसा कडून कुटुंबाची चौकशी! पत्नी भयभीत, मुलं आजारी! Love angle! Team MPSC Resign करा! संपुर्ण भयंकर Inside story! एक नव्हे शेकडो जणांनी पेपर फोडल्याची शक्यता!
https://t.co/7xWRHvIXrq
Subhas Chandra कर्ज ₹22,000 कोटींचे… ₹6.5 कोटींवर सेटलमेंट! 99.97% Haircut कसा मिळाला? या case चे पारायण करा! आयुष्यभर उपयोग होईल!
https://t.co/mBPTcsqIBu
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
पेपर फोडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया ऐकली. आयोगाचा पेपर फुटला आहे, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना आपण ४o पैसे वाले ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही.
कोणासोबत फोटो हे दाखवायचे झाले तर भाजपा नेत्यांसोबत हजारो फोटो दाखवू शकतो. असो आपण ट्रोलर्सचा रेफरन्स देणार असाल तर माझ्या कार्यकर्त्याला आपण आपली भाजपचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत थेट पुणे महापौर यांचे OSD म्हणून नेमले, याचे मात्र मला आश्चर्य वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवले आहेत ना त्यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
(टिप - मी पुराव्याशिवाय बोलत नाही)
@Dev_Fadnavis
आम्ही दिलेल्या पुराव्यानुसार आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानुसार पेपरफुटी झाल्याचं सिद्ध झाल्याने #MPSC ला औषध निरीक्षक पदाची परिक्षा रद्द करावी लागली. हा विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे. यासंदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासाठी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला आणि या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा देण्याची आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची या पदावर नेमणूक करण्याची मागणी केली. तसंच केवळ एकाच विद्यार्थ्याला फुटलेला पेपर मिळाला, हा एमपीएससीचा निष्कर्ष आम्हाला मान्य नाही, तर हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे. त्यासाठी अध्यक्षांचा राजीनामा आवश्यक असून तो न दिल्यास १ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी मा. आ. सुनील जी भुसारा, प्रमोद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, नितेश सूर्यवंशी, ॲड. संकेत बारस्कर यांच्यासह आमचे पदाधिकारी विकास लवांडे, पंकज नाना बाराडे, रविकांत वरपे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
#MPSC #पेपरफुटी #औषध_निरीक्षक #विद्यार्थ्यांचा_लढा
#विद्यार्थ्यांचा_विजय #MPSCअध्यक्ष #MPSCअध्यक्षांचाराजीनामा #पेपरफुटी_रॅकेट