नुकत्याच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात लातूर - कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प लातूर - अंबाजोगाई - केज - जामखेड - अहिल्यानगर मार्गे कल्याण या मार्गावर राबविणे अपेक्षित आहे. मात्र हा महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात येणार असल्याची चर्चा होत असल्याने हा महामार्ग अन्यत्र वळवण्यात येऊ नये याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
या महामार्गावर परळीचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग अवघ्या १५ किमी अंतरावर जोडले जाणार असून या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात औद्योगिक प्रगती, दळणवळण सुलभता, शेतीमालाची वाहतूक अशा एकूणच आर्थिक उन्नतीत भर घालणारा हा प्रकल्प एक प्रभावी घटक ठरणार आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील कमी वेळेत उत्पादित शेती माल मुंबई, कल्याण, पुणे सारख्या प्रमुख बाजार पेठांमध्ये पोचवणे कमी खर्चात शक्य होणार आहे. वाहतूक सेवेसह रोजगार निर्मिती साठी हा प्रकल्प एक मोठी संधी ठरणार आहे.
हा नियोजित महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी बदलून धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू असून बीड जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असलेला हा प्रकल्प अन्यत्र वळवणे हे दुर्दैवी व बीड जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक ठरेल.
बीड जिल्ह्यात आधीच दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्थलांतर, मर्यादित औद्योगिक वसाहती अशा अनेक समस्यांना आम्ही तोंड देत आहोत. त्यात या महामार्गाच्या निमित्ताने विकासाची चालून आलेली संधी हिरावून घेतल्यास जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक, सामाजिक संघटना आदींच्या मनात असंतोष निर्माण होऊन प्रसंगी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जनभावना व नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून राज्य शासनाने प्रस्तावित लातूर - कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) मूळ नियोजनाप्रमाणे बीड जिल्ह्यातूनच राबवावा, अशी नम्र विनंती या पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे केली आहे.
@Dev_Fadnavis
#Beed
#JankalyanHighway
#Development
जनतेचे अनेक अनेक आभार!
नगर परिषद निवडणुकीत परळी वैद्यनाथ जि. बीड सह गंगाखेड जि. परभणी नगर परिषद निवडणुकीची जबाबदारी असलेल्या व प्रचार केलेल्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय.
न्यायालयाच्या निकालात निर्दोष आणि विजयी!
जनतेच्या न्यायालयातही विजयी!
माझ्या माय बाप जनतेचे पुन्हा एकदा सहृदयी आभार!
#नगरपालिका
#नगर_परिषद
#परळी_वैद्यनाथ
#गंगाखेड
अजितदादा, आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर केलेलं पहिलं भाषण आठवते का? पक्षात गुंड, चोर लोकांना स्थान देणार नाही म्हणाला होतात ना? बीड जिल्ह्यातील लाखो गरिबांच्या ठेवी खाऊन जेल भोगून आलेला बीड जिल्हा मध्यवर्ती बँक देशोधडीला लावली त्यांना पक्षात का घेता. @AjitPawarSpeaks
सत्यमेव जयते - @dhananjay_munde
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच - उच्च न्यायालयाचा निर्णय.
खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिका कर्ता तुषार पडगिलवार यास एक लाखांचा दंड.
माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्यच.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वात सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या निर्धार नवपर्वाचा यांतर्गत परभणी येथे आयोजित संवाद मेळाव्यास उपस्थित राहून पक्षातील लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
पक्ष संघटनेमध्ये पक्ष आणि जनता यामध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे कार्यकर्ता आहे. निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्यातच या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात सहभागी होताना मला आनंद होत असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.
परभणी महापालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला उत्तम यश मिळेल, त्यासाठी पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी आदरणीय श्री. तटकरे साहेब यांच्यासह आ. विक्रम काळे, आ. राजेश विटेकर, मा. आ. विजय भांबळे, सौ. रुपालीताई चाकणकर, मा. महापौर प्रतापराव देशमुख यांसह लोकप्रतिनिधी, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@mahancpspeaks@SunilTatkare
#MahaNCP
#Parbhani
#DMUpdates
धनंजय मुंडे हे रसायनच वेगळय.💪🔥
मंत्री असो वा नसो डीएम पॅटर्नची क्रेझ ही कायम आहे.जेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो त्या दुप्पट ताकद वाढते.👊🏻👍🏻
वेट ऍंड वॉच.👍🏻❤️
@dhananjay_munde
@deepakkedardk ते सुरेश धस यांच्या पोराने गरीब माणसाचा जीव घेतला काही बोलाव वाटल नाही का? फक्त ठराविक लोक असली तरच बोलणार का हा कसला न्याय बाबा. लई उर ताणून बोलता येत न आता काय झालं.
नमस्कार!
आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने व प्रेमाने मला प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद व शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करत असता; मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात आपले ज्येष्ठ सहकारी स्व. आर. टी. जिजा देशमुख यांचे अकाली निधन व एकूण सध्याची परिस्थिती पाहता मी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही.
माझ्या सहकारी बांधवांना विनंती आहे की, वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी-जाहिराती आदींवरील खर्च टाळून त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत.
दि. १५ जुलै रोजी आपल्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाही, त्याबद्दल क्षमस्व!
आपले प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा हीच माझी ताकद...
आपला
धनंजय मुंडे
📍विधानभवन, मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेऊन बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत माहिती दिली. तसेच या प्रकरणात सर्व पालक संशय व्यक्त करत आहेत त्याप्रमाणे आणखी काही मुलींवर देखील असे अत्याचार झाले असून, ही सर्व प्रकरणे समोर येणे गरजेचे आहे; त्याचबरोबर आरोपी, त्यांना मदत करून पाठीशी घालणारे याची सखोल चौकशी केली जावी व दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, यासाठी बीड जिल्ह्याबाहेर सेवेत असलेल्या अनुभवी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) नेमून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जावा अशी आग्रही मागणी केली.
मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले असून, बीड प्रकरणातील संपूर्ण सत्य नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास आहे.
बीड सह राज्यात सर्वच ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी मर्यादा, वसुलीची पद्धत, विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत नैतिक व कायदेशीर संहिता असावी, यादृष्टीने एक व्यापक नियमावली शासनाने निर्गमित करावी, अशीही मागणी यावेळी केली असून याबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MonsoonSession
#Mumbai
#Beed
#Umakiran
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम विजय वर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आधी राजकीय दबाव
आणि अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धडपड...
लाज वाटू दे रे आमदारा.
@SandipKshirsagr@supriya_sule@PawarSpeaks@Awhadspeaks
@KISHORTIDKE151 अभिनंदन 💐💐💐
ज्या उत्तम विद्यार्थिनीचा 3 रा क्रमांक आला त्यांना शुभेच्छा दायला नाही जमल आणि जिल्हा १५० मार्क पडले तिला लई पटकन जमल कारण तिथे सहानुभूती होती आणि स्वार्थ होता म्हणून. आणि परत सांगायच की सगळ्यात जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण झाली काय फेकू ताई
#सु ताई
Heartfelt Tributes💔
Over 242 innocent lives lost in the horrific Ahmedabad plane crash passengers,locals,families shattered. Who will take responsibility?
Where is accountability?
Where is morality?
India demands answers, not silence.
#WhoIsResponsible#ResignNow#WeWantJustice