@MTPHereToHelp महोदय, घाटकोपर पूर्व, पंतनगर, सुचिता बिझनेस पार्क-मच्छी मार्केट इमारत, यशवंत जाधव मार्ग येथे नो पार्किंगचाचा बोर्ड असूनही आमदार-खासदार यांचे लोगो लावलेल्या काही गाड्या दररोज सायंकाळी ५:३० ते ८:३० दरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्या जातात.
@mybmc@mybmcWardN मुंबई मनपाच्या निष्काशन कारवाईचा धसका घेऊन टपरी लपवा अभियान सुरू असून इतर ठिकाणीच्या टपरी कारवाईपासून वाचवण्यासाठी घाटकोपर पूर्व, पंतनगर, संत ज्ञानेश्वर मार्ग, इमारत क्रमांक २० व २२ च्या समोरील बाजूच्या पदपथावर २ टपरी लपवलेल्या आहेत त्या तात्काळ तोडून टाका.
@mybmcWardN@mybmcWardN फक्त खोटा दिखावा सुरू आहे असे वाटत आहे येथून ५० फुटांवर इमारत क्रमांक २० च्या समोरील बाजूच्या फुटपाथवर २ इतर ठिकाणच्या टपरी कारवाई पासून वाचवण्यासाठी लपवलेल्या आहेत त्यांच्यावर का कारवाई करत नाही तुम्ही फोटो अर्धवट का काढता ..
@MTPHereToHelp महोदय, घाटकोपर पूर्व, पंतनगर, बै. नाथ पै मार्ग, ९० फुटी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सर्कल येथे बँक ऑफ इंडिया समोरील रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीरपणे व डबल पार्किंग १० चारचाकी व ६-७ दुचाकी पार्किंग केलेल्या असून अपघात होण्याची शक्यता आहे.
@Sagarpa31447100 प्रत्येक गावात २-३ प्रमुख कार्यकर्त्यांना तीच तीच वारंवार कंत्राटे देऊन श्रीमंत केले आहे गावातील समस्यांवर कोणी आवाज उठवला की त्याला दाबले जाते राज्यातील प्रत्येक गावात हीच अवस्था आहे निकृष्ट दर्जाचे रस्ते करून दर २-३ वर्षात पुन्हा टेंडर काढले जात आहेत.. फक्त कार्यकर्ते श्रीमंत
@rajtoday@mataonline मुंबई लोकलच्या स्टीलच्या आसन व्यवस्थेत पुढीलप्रमाणे हॅंडरेस्ट लावल्यास लोकल मधील सीटवरून होणारी ८०% भांडणं तंटे कमी होऊन लाखो नागरिकांचा सुरक्षित प्रवास होईल.