महत्त्वपूर्ण सूचना
प्रिय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि परिवर्तनाच्या चळवळीतील सहकारी,
सर्वांना जयभीम,
सर्वप्रथम, पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीत आपण दाखविलेला विश्वास, दिलेला जनादेश आणि लोकशाही मूल्यांवर ठेवलेली निष्ठा याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
ही निवडणूक कोणत्याही व्यक्तीच्या विजय किंवा पराभव साठी नव्हती, तर पक्ष संघटन बांधणी आणि वाढीची जबादारी घेण्यासाठी होती.वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी होती. आपण दिलेला जनादेश हा फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा आणि संविधानिक मूल्यांवर असलेल्या आपल्या विश्वासाचा सन्मान आहे.आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथे प्रत्येक क्षण, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक रुपया हा चळवळीच्या बळकटीसाठी खर्च होणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर निवडणुकांची तयारी, तसेच गावागावात संघटना उभारण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे.याच पार्श्वभूमीवर मी आणि प्रदेश कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात, शहरात किंवा तालुक्यात सत्कार स्विकारायचा नाही.
माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, कृपया हार तुरे, शाल श्रीफळ, फटाके, बॅनर, स्वागत समारंभ किंवा सत्कारावर कोणताही खर्च करू नका.त्या खर्चातून पक्षानिधी द्या, नवीन कार्यकर्ते जोडा, बूथ मजबूत करा, बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुजनवादी विचार प्रसार करा.एखाद्या गरजू विद्यार्थ्याला गरजवंताला मदत करा.तोच आमच्यासाठी सर्वात मोठा सत्कार असेल.आपल्या चळवळीची परंपरा ही व्यक्तिपूजेची नाही; ती विचारपूजेची, संघर्षाची, त्यागाची आणि समाजपरिवर्तनाची आहे.आपण पदासाठी नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा म्हणून लढत आहोत. म्हणूनच आज आपण व्यक्तींचा गौरव बाजूला ठेवून संघटना, विचार आणि जनतेच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देऊया.निवडणूक संपली आहे; आपण सर्व वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहोत.आपल्या एकजुटीतच पक्षाचे सामर्थ्य आहे आणि आपल्या सामर्थ्यातच सत्ता परिवर्तनाचा मार्ग आहे.
आता सत्कारासाठी नव्हे तर संघर्षासाठी एकत्र येऊया. हार-तुऱ्यांपेक्षा जनतेचा विश्वास जिंकूया.फटाक्यांच्या आवाजापेक्षा आपल्या कामाचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया.
आपल्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि निष्ठेबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आमच्या या निर्णयाचा आदर कराल आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने संघटन बांधणीच्या कार्यात स्वतःला झोकून द्याल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपला
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश.
वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर घरान्याचे एकनिष्ठ, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हुकमी एक्का
आद. राजेंद्र भाऊ पातोडे यांचे सोबतचा एक क्षण ❤️💐
#rajendrapatode#VBAforIndia#VBAForMaharashtra
वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव तथा राज्य प्रवक्ते आद. राजेंद्र भाऊ पातोडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक सदिच्छा ❤️💐
#vba_maharashtra#VBAforIndia#rajendrapatode
ब्रेकींग
बार्शीटाकळी नगर पंचायत पक्षीय बलाबल
१) वंचित बहुजन आघाडी ३+१ नगराध्यक्ष सह
२) भाजप ३
३) कॉंग्रेस ३
४)राष्ट्रवादी अजीत पवार २
५) एम आय एम १
६) अपक्ष ५
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार उपाध्यक्ष पदी अविरोध ✌️💐💐💐
@Prksh_Ambedkar@eprabuddhbharat@VBAforIndia
आज वंचित बहुजन आघाडी चे बार्शीटाकळी न प चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अख्तर खातुन अलिमोदीन यांनी पदभार स्वीकारला तेव्हा स्वता सुजातराजे आंबेडकर ह्यानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या 💐
@VBAforIndia@Sujat_Ambedkar@eprabuddhbharat