'पुणे शहराचा इतिहास' व 'पुण्याची समृद्ध बुधवार पेठ' या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अविनाश सोवनी लिखित 'पुणे शहराचा इतिहास' व युवा इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक लिखित 'पुण्याची समृद्ध बुधवार पेठ' या पुस्तकांचे प्रकाशन माझ्या हस्ते पार पडले.
प्राचीन काळापासून ते पेशवाईपर्यंतचा पुण्याचा समृद्ध इतिहास यात मांडला आहे. गेली दीड हजार वर्षापेक्षाही जास्त काळापासूनचा पुण्याचा इतिहास असून मराठा साम्राज्याच्या काळात ते एक प्रमुख राजकीय केंद्र होते. पुण्याच्या बुधवार पेठेची बदनामी होत असली तरी, ती एक प्रसिद्ध व्यापारी पेठ होती आणि आजही अनेक महत्त्वाची ठिकाणे व व्यक्ती या पेठेशी संबंधित आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या गोष्टींविषयी पुरावाधिष्ठित माहिती सांगणारी व चुकीची पसरवली गेलेली माहिती पुराव्यानिशी खोडून काढणारी दोन पुस्तके वाचकांना उपलब्ध झाली याचा मला आनंद वाटतो. 'खोटा इतिहास लिहिणे यामुळे समाजाची दीर्घकाळ दिशाभूल होते. त्यामुळे तथ्यहीन इतिहास लिहिणे हे पाप आहे.' असे मला वाटते.
'लालमहाल पाडून त्या ठिकाणी पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला.' असे धादांत खोटे पसरवलेल्या चुकीच्या माहितीचा प्रतिवाद या पुस्तकांमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यात आला आहे. तत्कालीन पुण्याची वैशिष्ट्ये पाच पेठांपासून 18 पेठांवर पसरलेले पुणे व इतर अनेक संदर्भ माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ही पुस्तके नक्की वाचायला हवीत अशी आहेत.
या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदीपदादा रावत, चिटणीस श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. मोहन शेटे, श्री. जगन्नाथ लडकत, श्री. आनंद सराफ, श्री. प्र.के. घाणेकर, श्री उदय कुलकर्णी, प्रकाशक श्री. मनोज केळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#pune #punehistory #budhwarpeth #mastani #BajiraoPeshwa #marathaempire #ChhatrapatiShivajiMaharaj
📚 पुस्तक प्रकाशन सोहळा 📚
उद्या सकाळी ११ वाजता
स्थळ - भारत इतिहास संशोधक मंडळ,
भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ.
नक्की या...भेटुयात
#Budhwar_Peth#Pune#Punehistory#Marathibooks
समृद्ध बुधवार पेठेचा इतिहास उलगडणार...
पुणे शहरातील अत्यंत महत्वाची पेठ म्हणजे बुधवार पेठ. बुधवार पेठ एक व्यापारी पेठ होती आणि आहे. कारण अनेक प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आजही येथेच यावे लागते.
पुण्यातील बऱ्याच महत्वाच्या वास्तू, मंदिरे, संस्था, रस्ते, चौक, दुकाने, नाट्य-चित्रपटगृह या बुधवार पेठेत होते आणि आजही आहेत. तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती, भारतातील पहिली मुलींची शाळा असे बरेच काही या पेठेत आहे. इथे जागोजागी इतिहास आहे. परंतु बुधवार पेठ म्हटलं की फक्त वेश्यावस्ती आठवते. ही पेठ त्यामुळे थट्टेचा विषय राहिली आहे आणि या पेठेची बदनामी झालेली आहे.
बुधवार पेठेवर लागलेला हा चुकीचा शिक्का पुसण्यासाठी हे पुस्तक आहे. ऐतिहासिक, वारसासंपन्न, अनेक दृष्टीने समृद्ध असलेल्या या पेठेच्या नाण्याची दुसरी बाजू पुस्तकरूपी समोर घेऊन येत आहे @SuprasadPuranik
अभिनंदन !! Much needed
स्थळ : रिगातेह इराणी चहा,हॉटेल विश्व शेजारी,पुणे
@SuprasadPuranik या आमच्या लेखक आणि चहाप्रेमी मित्रानी याची सवय लावली.
नेहमीच वर्दळ असलेल्या या ठिकाणी स्वस्तात मस्त इराणी चहा मिळतो.सोबत बन मस्का,पट्टी सामोसा,पॅटीस इ. पदार्थ,चहा व कॉफीचे पर्याय ही मिळतात.
#खादाड_पुणेकर#पुणे
@prahappy@mai_maalunga लक्ष्मी रस्ता नाव कसे पडले याबद्दल २ वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळतात - दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावाने किंवा या रस्त्यावरील दुकानांमुळे लक्ष्मीचे आगमन होईल म्हणून...
१८१० साली पुण्यात जवळपास ४०० मंदिरे होती. मंदिरांची पेठवार यादी दुसरे बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशीमध्ये आहे. या मंदिरांच्या यादीत गणपती मंदिरे लक्षणीय होती. पुणेकरांमध्ये गणपती देवता लाडकी असून मोठ्या श्रद्धेने कमीतकमी ५०० वर्षांहून अधिक काळ पुजली जात आहे.
#पुणे#Pune#Ganesha
पुण्यात तालमींना पेशवाईत उर्जितावस्था प्राप्त झाली होती. इंग्रजांच्या काळात देखील अनेक तालमी निर्माण झाल्या. लहुजी वस्ताद साळवे यांनी याच तालमीत अनेक देशप्रेमी युवक व क्रांतिकारक घडविले. पुण्यात अनेक गणपती मल्लांच्या रुपात आहेत.
छायाचित्र - बनकर तालीम, पुणे
#Pune#History
"ज्ञात अज्ञात पुणे" आणि "Pune Ganesh Festival" ही पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी Sahyadribooks, Flipkart, Amazon, Bookganga, Akshardhara येथे उपलब्ध आहेत.
ज्ञात अज्ञात पुणे - Amazon link
https://t.co/kyJMP6eEc2
Pune Ganesh Festival - Amazon link
https://t.co/II4dx21pKr
#Pune#ganpati
ज्ञात-अज्ञात पुणे(थ्रेड)
कालच प्रकाशित झालेलं वरील नावाचं पुस्तक आज वाचून काढलं.
पुण्याचा जाज्वल्य अभिमान असलेले माझ्यासारखे चिक्कार लोक भेटतील पण संशोधन करुन या शहराचा इतिहास बहुत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास हाती घेऊन खऱ्या अर्थाने जाज्वल्य अभिमान मिरवू शकणारा, 1/4
सुप्रसाद पुराणिक लिखित "ज्ञात अज्ञात पुणे" व माझे आणि स्वप्नील लिखित 'पुण्याचे सुखकर्ता' आता इंग्रजीत "Pune Ganesh Festival" नावाने. लवकरच ही दोनही पुस्तकं तुमच्या भेटीला... प्रकाशन समारंभ या रविवारी १७ सप्टेंबर रोजी. कार्यक्रमाचे तपशील २ दिवसात कळवेन.
#pune
आज घोरपडे घाट येथे @SuprasadPuranik व स्वप्नील नहार याच्या Heritage walk गेलो असता एक गोष्ट जाणवली की पुण्यात राहून हे ऐतिहासिक ठिकाण माहित नसलेले माझ्यासारखे असंख्य लोक आहेत.श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान समितीसोबत सुप्रसाद व स्वप्नील यांनी अत्यंत चांगला उपक्रम चालू केलाय.👏🏼👏🏼
Spend this Sunday morning with us..
Learning about our *Heritage* and also *Sketching* on the banks of Mutha river!
September 3rd, Sunday : 7.30 am-10 am
Heritage Walk with Swapnil Nahar & Suprasad Puranik at Ghorpade Ghat
https://t.co/SByTaAZTHF
#पुणे#घोरपडे_घाट#वारसा
नानासाहेब समाधीच्या संवर्धनाचे काम @Jhunj_Org आणि @panchaajanya ह्यांचा बरोबर करताना असंख्य अस्सल लोकं भेटली त्यातलेच 2 हिरे म्हणजे स्वप्नील नहार आणि प्रसाद पुराणिक , अशक्य उर्जा असलेल्या ह्या दोघांनी आता एक महत्वाचा उपक्रम हाती घेतलाय - पुण्याचा मोरेश्वर ह्यांना अशीच ऊर्जा देत राहो हीच प्रार्थना.
पुणेकरांना जसं जमेल तसं ह्यांना हातभार लावूया ही नम्र विनंती 🙏🏻
#pune #पुणे