मिस्टर अम्बेडकर!
तुम्हारी किताब में
ये काफ़ी
खतरनाक विचार हैं
कि
पूरी आदम जात का एक आधार है।
कि
कोई किसी पे
जुल्म न करे,
जो जिससे मर्जी
प्रेम करे-
कि
हक मिले हर
हकदार को-
खेत मिले
हर हलदार को।
जड़ और जंगल मिले
वहाँ के वासी को-
रोटी मिले
हर निवासी को।
ऐसा कैसे होगा?
जो कहीं नहीं हुआ-
वो कैसे होगा?
मानव सभ्यता तो
मालिकों की सभ्यता रही ही है
अम्बेडकर
मजदूरों की कहानियां
अब तलक तो मौन है
काफ़ी खतरनाक है मंसूबे
तुम्हारे
मिस्टर अम्बेडकर-
बताओ
तुम्हारे गुलाबी खयालों में
पलता
ये जादुई मुल्क कौन है?
#BaaghiIndia #babasaheb💙
परमपूज बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातील धोके यापूर्वीच सांगून टाकलेले आहेत पण आपण त्यांना वाचलेलं नाही . संघटनेवर जोर का द्यावा हे सांगताना बाबासाहेब आपल्या १४ एप्रिल १९४७ ( वाढदिवसाच्या निमित्त ) केलेल्या भाषणात सांगतात,
" आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास जे राजकीय हक्क प्राप्त होतील ते फक्त एका विवक्षित काल मर्यादेपर्यंतच अबाधित राहातील हे तुम्ही लक्षात ठेवा.
हिंदुस्थानात असा एक काळ येईल की ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे तर सर्व समाजाचे राखीव हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही.
शेवटी सवाँना सुबुद्धी आठवून या गोष्टीची जाणीव होईल व आपणास जे साध्य करावयाचे आहे ते हस्तगत करता येईल अशी मला आशा आहे. यासाठी आपणास फक्त संघटनेची गरज आहे
जेव्हा असे घडेल तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून राहावे लागेल. म्हणून अभेद्य संघटना निर्माण करावयाचा दृढ निश्चय करा."
आता आहे आपल्याकडे, संघटना आहे , पक्ष सुद्धा आहे आणि वर्तमानपत्र सुद्धा आहे. एक अभिमानास्पद इतिहास आहे . फक्त गरज आहे ती त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना आर्थिक आणि शारीरिक बळाची मदत करणे.
कधी कधी वाटतं कोरोना लॉकडाउन खरंच चांगलं होतं, ते तसंच राहायला पाहिजे होतं. ❤️
कमी अपेक्षा, जवळची लोकं, स्वच्छ हवा, घरचं जेवण, घरून असलेलं काम, कुठेही नसलेलं ट्रॅफिक. या सगळ्यातून मिळणारं सुख आणि शांतता. ☺️🙏🏻
परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही बद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केलेले होते.त्यापैकी पुणे येथील डिसेंबर १९५२ मधल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात,
" सभ्य गृहस्थहो, आणि महिलांनो , या ठिकाणी मला निमंत्रण देण्यापाठीमागे आपला काय हेतू किंवा प्रेरणा होती याची मला कल्पना नाही. मला या गोष्टीची शंका नाही की ज्या विषयासंबंधी मी आपणासमोर बोललो आहे तो विषय या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटिश निघन गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच, आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे ? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजून आपण आता विश्रांती घेतली पाहिजे, संविधान तयार झालेले असल्यामुळे आपला कार्यभाग संपलेला आहे अशा प्रकारच्या 'शिष्टपणाच्या' भावनेविरूद्ध मला आपणास ताकीद देणे भाग आहे. कर्तव्य संपलेले नाही, त्याला आता कुठे सुरूवात झाली आहे.
तुम्हाला याचे स्मरण ठेवावे लागेल की, लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. ते अमेरिकेत वाढले, ते इंग्लंडमध्ये वाढले.
खरोखरच इतर ठिकाणी काय घडले हे पाहाण्यासाठी ह्या उदाहरणातून आपणास काही प्रमाणात धैर्य प्राप्त होईल. तसेच आपणापैकी काही लोकांना हे स्मरण असेल की, पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आणि ऑस्ट्रिया-हंगेरिया आम्राज्याचे विभाजन म्हणून विल्सनने स्वयंनिर्णयाच्या आधारावर ऑस्ट्रियापासून स्वतंत्र असे वेगवेगळे छोटे देश निर्माण केले. त्याची सुरवात लोकशाही संविधानाने व लोकशाही शासनाने झाली. आणि त्यांच्या संविधानात मूलभूत अधिकारांचा समावेश देखील होता. हे मूलभूत अधिकार व्हरसाइल्सच्या शांतता तहाने त्यांच्यावर बंधनकारक केले होते.
माझ्या मित्रांनो. त्या लोकशाहीचे काय झाले हे आपणास ठाऊक आहे काय ? लोकशाहीचा अंश तरी त्या ठिकाणी पाहावयास मिळतो काय ? त्या सर्व संपलेल्या आहेत. त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत.
काही दुसरी विद्यमान उदाहरणे विचारात घ्या. सिरियामध्ये लोकशाही शासन होते. फारच थोड्या वर्षानंतर तेथे लष्कराची क्रांती झाली. सिरियाचा प्रमुख कमांडर येथील राजा झाला व लोकशाही लोप पावली.
दुसरे उदाहरण घ्या. इजिप्तमध्ये काय घडले? तेथे सुद्धा सन १९२२ पासून सतत ३० वर्षे लोकशाही शासन व्यवस्था होती. परंतु एकाच रात्रीत फरूकला राज्यसत्ता सोडावी लागली व नजीब इजिप्तचा हुकूमशहा झाला. त्याने लगेच तेथील संविधान नष्ट केले.
येथे ही सर्व उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत आणि म्हणून मला असे वाटते की, आपल्या भवितव्यासंबंधी आपण फारच सावध आणि फारच समजुतदार राहिले पाहिजे. आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे व शिला दूर करण्याच्या कामी आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहोत किंवा नाही याचा आपणास गंभीरपणे विचार करावा लागेल.
मी आपणासमोर मांडलेल्या काही विचारांमुळे आपणामध्ये जर काही जागृती निर्माण झाली असेल व या समस्यांबाबत आपण गाफील राहून चालणार नाही असे आपणास वाटत असेल तर माझे कर्तव्य भी पार पाडले आहे असे मला वाटते."
#संविधानदिवस
परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी १९५१ रोजी मुंबई मध्ये बौद्ध धर्माविषयी मोलाचे विचार मांडलेले आहेत.
बाबासाहेब म्हणतात,
"बुद्ध या देशात ८० वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची ४५ वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्या जवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश कल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला. १२०० वर्षापर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खऱ्याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. १२०० वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे. (प्रचंड टाळ्या)
येथील भिक्षुमित्राने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे.
बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर युद्ध है चालणार नाही. शिवाय ज्या हिंदुलोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या उफयांचा त्याग केला पाहिजे.
जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मुळच नाहीसे करतात. सर्व वाईट घाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.
ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईंची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही.
हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील.
मी आज २० वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे, असे माझे मत झाले आहे."
💙💙
" मी खरोखरच महार लोकांचा अतिशय ऋणी आहे. महार लोकांच्या बळावरच मी हे करू शकलो. हा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे. महार रणशूर आहेत, लढू शकतात, त्याग करू शकतात. इतर कोणतीही जात हे करू शकत नाही. तेव्हा माझ्यादृष्टीने त्यांचे माझ्यावर अनेक उपकार झाले आहेत. मी येथे जातीवाचक उच्चार करतो याबद्दल कोणी आरोप करील, पण मी या जातीत जन्मलो याबद्दल मला मोठा अभिमान आहे.
या स्थितीला अस्पृश्य समाज आला त्याचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरूषांना आहे. त्यात स्त्रियांचाही मोठा भाग आहे. ३० वर्षापूर्वीच्या स्त्रिया फार वेडगळ आणि गलिच्छ राहात. मला त्यावेळी स्त्रिया' बामण' आहे असं म्हणत आम्हाला नाही बामण व्हायचं ' असं त्या म्हणत.
आजची तशी स्थिती नाही. परंतु अजून आपण शिखरावर पोहोचलो नाही. मध्यावर आलो आहोत. कठडा चढत आहोत. कधी पाय घसरेल सांगता येत नाही.
अजूनही संकटस्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटविले पाहिजे. सार्वजनिक कार्याला मदत करा. हजारो प्रकारच्या संस्था दानधर्म करून जातीचा उद्धार करतात. कोकणस्थ ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, प्रभू इ. ब्राह्मणांच्या संस्था आहेत. त्यांनी आपल्या जातीच्या विद्यार्थ्यांना विलायतेला पाठविले आहे. मोठ्या हुद्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्या गोष्टी ध्यानात घेऊन महिन्याला एक रुपया द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठी कितीतरी कार्य होईल.
माझी आता म्हटली तर आठ दहा वर्षच राहिली आहेत. बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही. मी आता राजकारणापासून अलिप्त होणार आहे. तुमचं जीवन तुम्हीच उज्ज्वल करायचं आहे. त्याग, चिकाटी, निस्वार्थीपणा, बल एकवटून कार्य करा.
मला माझ्या हयातीत तुम्ही आपलं काय करता ते पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कळणार कसं ? हे माझं तुम्हाला निक्षून सांगण आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मुंबई. (ऑक्टोबर १९५४)
संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर 2024ला उर बडवत शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला मतदान द्या म्हणून बोंब मारणारे व वंचित श.प.यांच्या राजकीय धूर्ततेला वारंवार ओरडू ओरडू सांगत असताना वंचितलाच B-टीम म्हणून लेबल लावणारे,
आता SIR पेक्षाही घातक delimitation बिलासाठी भाजपाला पाठिंबा देऊ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर सर्व मनुपुरोगामी, निर्भय न बनू शकलेले आणि पवा्रांनीच पोसलेले स्वतःला विचारवंत म्हणणारे ‘बैल’ तोंडाला ‘मुस्कं’ लावल्याप्रमाणे गप्प आहेत, का?
@AnjaliMaydeo ताई यांच्या पोस्ट ने नुसते शरद पवार नी राष्ट्रवादी उघडी पडलेली नाहीये तर सगळे पुरोगामी, विचारवंत, भित्रे टघे उघडे पडलेत एवढं नक्की.
आयुष्यभर @Prksh_Ambedkar यांनी शरद पवारांचं बेगडी पुरोगामी राजकारण देशासमोर मांडलं पण पवार म्हणजे जाणता राजा, पवार म्हणजे कसलेला पैलवान वगैरे वगैरे म्हणत उलट सत्य सांगणाऱ्या आंबेडकरांनाच कायम टिकेचं धनी केलं गेलं. सत्ता होती तोपर्यंत ह्यांची सगळी पापं, सगळ्या फसव्या भूमिका झाकल्या गेल्या. आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर जे पेरलं तेच उगवलंय. पण अफसोस, आंबेडकरांच्या राजकीय उभारीला मात्र कायम राजकीय अस्पृश्यातच मिळाली..
#delimitationbill
@DrVishwam@waglenikhil@AsimSarode@rajuparulekar@TusharG@DrMungekar@VBAforIndia@rajpatode101@URupwate
बौद्ध धर्माने भारतात सामाजिक समता, गणराज्य विचार, कला-संस्कृती आणि उच्च शिक्षणाचा पाया घातला. यामुळे तो फ्रेंच राज्यक्रांतीसारखाच महत्त्वाचा आणि क्रांतिकारी टप्पा ठरला.
याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जून १९५० मध्ये दिलेल्या भाषणात सांगतात,
"बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोनही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत, असे मला म्हणावयाचे आहे. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्धधर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे.
भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. पू. २७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते.
बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी नानाप्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील स्त्रियांवर केलेले उपकार अनंत आहेत स्त्रियांनी देवांना पुजण्यापेक्षा बाबासाहेबांना वाचायला पाहिजे. स्त्री जातीच्या कल्याणाची एवढी तळमळ भारतीय इतिहासात कुणालाच दिसून येत नाही.
तारीख २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकराना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात स्त्रियांना कोणकोणते हक्क दिले होते व काय तरतुदी केल्या होत्या याविषयी थोडक्यात पण सुबोध रीतीने दिवेचन केले. या समारंभास असंख्य स्त्रिया व कित्येक पुरुषही हजर होते.या सभेत बाबासाहेब म्हणतात,
" स्त्रियांच्या सर्वस्वी हिताचे हे बिल मंजूर करण्यासाठी
स्त्रियांनी काहीच हालचाल केली नाही ही खेदपूर्वक बाब आहे. मी पुरूष असून देखिल स्त्रियांचा हितासाठी भांडलो, पण स्त्रियांनी का उत्सुकता दाखविली नाही हे समजत नाही. या बिलाला पाठिंबा देण्याची गोष्ट तर बाजूलाच राहो, पण काही स्त्रियांनी माझ्याकडे येऊन ते बिल चांगले नाही असे मला सांगण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीत असताना तर काही प्रमुख स्त्रियांचे शिष्टमंडळच माझ्याकडे आले. त्यांना मी 'ते बिल वाचले का?' म्हणून विचारले तर त्यांनी से वाचले नाही असे सांगितले, न वाचताच का विरोध करता असे त्यातील मुख्य स्त्रीला बोलावून विचारता ती म्हणाली 'माझ्या नवऱ्याने मला सांगितले की, तू त्या बिलाला विरोध कर, नाही तर मी दुसरी बायको करून घेतो.' म्हणून सवत पत्करण्यापेक्षा बिलालाच विरोध करणे मला भाग आहे. पण स्त्रियांची मानसिक दुर्बलता आहे. त्यांच्या या दुर्बलतेमुळेच या बिलाचा घात झाला. स्त्रियांच्या पायात ताकद असती तर ते बिल बारगळले नसते.
पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांनी देखील या बिलाबाबत काही जागरूकता दाखविली नाही. त्या स्त्री-सभासदांचे सारे लक्ष युनो, आय. एल. ओ.. कोरिया या गोष्टीकडेच लागलेले असायचे! माझ्या बिलाला पाठिंबा देण्यास त्या तयार दिसल्या नाहीत. कारण त्यामुळे पंतप्रधान नाखुष होतील व आपल्याला युनोत किंवा दुसरीकडे कोठे जाण्यास संधी मिळणार नाही याची त्यांना भीती वाटते. अशा प्रकारच्या लोभी वृत्तीनेच आपल्या देशाचे नुकसान होत आहे.
सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारा हरेक मनुष्य आज आपल्याला कमिश्नर होता येईल काय किंवा अमुक जागा मिळेल काय या लोभाने धडपडत असतो. स्त्रियात हा दोष मला फार दिसतो. स्त्रियांच्या मनावर परंपरेचा पगडा जास्त असतो. त्यामुळे त्यांच्यात हे मनोदौर्बल्य आहे हे त्यानी काढून टाकले पाहिजे.
इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी चळवळी केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांना आपली सुधारणा होण्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर हे बिल यावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी चळवळ केली पाहिजे. त्याखेरीज स्त्रीवर जुलूम करणारा पुरुष तिची सुधारणा करणार नाही.
इंग्लंडमधील स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेऊन स्वतंत्र जीवन जगू शकतात. याचे मूळ कारण त्यांना संपत्तीचा वारसा हक्क असतो हे आहे. तसेच मलबारी समाजात गेल्या ५०-६० वर्षापासून घटस्फोट फारसे होतच नाहीत याचे कारण तेथे स्त्रीलाही वारसा हक्क आहे. त्यामुळेच पुरुष तिच्याशी चांगल्या प्रकारे वागतो. म्हणून पुरूषांप्रमाणेच आपल्यालाही वारसा हक्क मिळावा यासाठी स्त्रियांनी चळवळ सुरू करावी, घरात बसून किंवा सभा, संमेलने व ठराव करून या गोष्टी होणार नाहीत. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः चळवळ करण्यास पुढे यावे.
हिंदु कोड बिलाची मुहूर्तमेढ १९३९ साली रोवली गेली व तेव्हापासून गेली अकरा वर्षे त्या बिलाच्या स्वरूपावर चर्चा चालू असताना पुनः त्या बिलाचे विभाग पाडून जनतेपुढे त्याच्या वावड्या का उडविल्या जात आहेत हे समजत नाही.
आपण येणाऱ्या बिलातील प्रत्येक कलम नीट तपासून पाहा. निव्वळ आंतरजातीय विवाहाचे कलम पाहून चालणार नाही. तेवढेच कलम नवे व बाकीचे कायदे जुनेच राहिले तर अनर्थ ओढवतील. आंतरजातीत स्त्री-पुरुषापासून झालेल्या संततीस आपल्या जुन्या शास्त्राप्रमाणे संपत्तीची मालकी मिळत नाही, म्हणून अशी संतती कायदेशीर ठरवून तिला मालकी देण्याची तरतूदही कायद्यात करून घेतली पाहिजे."
या बिलासाठी स्त्रियांना कळकळीचा पुन्हा एकवार आदेश देऊन त्यांनी आपले भाषण संपविले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाचणे म्हणजे वेगळाच अनुभव आहे.एकदम थरार आहे. वाचताना एकदम डोळ्यापुढे दृश्य निर्माण होते.
ऑक्टोबर १९५६ मधील एका भाषणात बाबासाहेब सांगतात,
" मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकावर मोठी गदा आल्याप्रमाणे त्याना वाटत होते. त्यानी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय ? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही?
त्यावेळी कोणीतरी मनुष्य' केसरी' मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची मिलावी हाडाची, मांसाची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किमत होईल व मृत मास सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार यावेळी ' केसरी ' मधून होतो त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय?.
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता. दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे, शिंगाचे, मासांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ?"
मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले. " एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या."
मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत. भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत, आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते गाझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला," पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता?" मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणाचे कोणा इतराचे किती अर्ज येतात ! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?
आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते. लाभ प्यारा नसतो. .
आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही.
या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे, आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन."
coming from Maharashtra, growing up on Babasaheb’s legacy and now hearing a Tibetan girl call Bodhisattva Babasaheb her inspiration just made my day...🥹
Babasaheb isn't just a leader for us.
He is the global symbol of dignity and humanity...☸️ #JaiBhim
बौद्ध धर्म दुनिया एकलौता ऐसा धर्म है जो साइंटिफिक टेम्परामेंट की बात करता है।
आपको खुद अपना दीपक बनने के लिए कहता है।
बुद्ध भी कहते है कि मैं सिर्फ मार्गदाता हूँ, मोक्षदाता नही।
बुद्ध कभी कोई चमत्कार का दावा नही करते, कभी किसी के सपने में नही आते, कभी किसी के शरीर मे नही आते।
बुद्ध कहते है कि किसी भी चीज पर इसलिए यकीन मत करो कि वह किसी ने आपको बताई, या फिर किसी किताब में लिखी है, हर चीज की जांच करो। खुद के विवेक का इस्तेमाल करो।
#buddha
Brahma : I'm the creator of the universe.
God : I'm the creator of the universe.
Allah : I'm the creator of the universe.
Lord Budhha : There is no creator God; the universe is eternal.