समाजात खरे काम करणारे लोक फार कमी असतात. बहुतेक लोक फक्त स्वतःच्या सुख-सुविधांमध्ये मग्न असतात. सुशिक्षित माणसाने अशा लोकांना जागृत करणे आणि त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे असे परमपूज्य, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जुलै 1954 मध्ये मुंबई येथील भाषणात सांगताना म्हणतात,
" आज पर्वताला देखील मुंग्या भोके पाडू लागल्या आहेत व आता पुढेही पाडीत राहातील याची तुम्हाला फारशी जाणीव नाही. तेव्हा आज तुमची ही स्थिती आहे, पुढे काय होणार ? तुमचा भावी काळ काय आहे ? तुमचे भवितव्य काय आहे ? ह्याची अजून कल्पना नाही. तुमच्या पुढील काळाची जरी कल्पना असली तरी आज मी तुम्हाला त्याबद्दल काही बोलत नाही. असा एखादा दिवस येईल की, ज्या दिवशी मी तुम्हा साऱ्यांना एकत्र जमा करून पुढे काय होणार आहे व त्याकरिता काय करावयास पाहिजे, हे सर्व काही सांगेन निदान आजतरी या बाबतीत मी काही बोलू इच्छीत नाही. परंतु तुमच्या भविष्यकाळाकडे नीट नजर द्या.
समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. कार्याची कळकळ फार थोड्या माणसांना असते. सर्वजण कार्यकर्ते असते तर इमारत फंडासाठी एवढा आटापिटा करावयास लागलाच नसता. सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो. बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा माणसाला टोचून' तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे."
Sahil Wakode was twenty years old. On 18 September 2026, the Dalit student at IIT Bombay died by suicide after alleged caste-based humiliation, ten years after the death of Rohith Vemula. Yesterday, at the 19th Session of the UN Forum on Minority Issues at the Palais des Nations in Geneva, I spoke his name before the United Nations.
Speaking on behalf of Ambedkar International Mission, Australia, under this year's theme, "Advancing minority rights through regional initiatives and cooperation", I raised the total absence of any regional human rights mechanism in South Asia, which is home to most of the world's communities discriminated on work and descent. India has one of the most comprehensive sets of formal legal measures against caste-based discrimination, and yet Dalit students continue to die in the very institutions meant to deliver equality, while accountability remains elusive.
I called on the Government of India to ensure an independent and time-bound investigation into the death of Sahil Wakode, prosecution under the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, and concrete steps to address systemic caste discrimination in educational institutions. I asked the Forum to recommend that South Asian States begin building a regional human rights mechanism with an express mandate on discrimination based on caste, work and descent, because when domestic remedies fail, a Dalit family today has no regional commission, court or rapporteur to turn to.
Watch my intervention on UN Web TV:
https://t.co/7wi566Ouhz
Today at 13:00 in Room III, I take this argument further at the side event "Regional momentum for global standards: Discrimination based on work and descent".
#SahilWakode #RohithVemula #JusticeForDalits #CasteDiscrimination #WorkAndDescent #CDWD #UNForumOnMinorityIssues #MinorityRights #HumanRights #Ambedkar #Geneva
Meet Jaya Dofe a dalit woman who has Phd in Electrical & Computer Engineering who teaches at Califronia State University in India she would have not been able to reach such great heights due to caste discrimination that is why she left the country
परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील लोकशाही बद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केलेले होते.त्यापैकी पुणे येथील डिसेंबर १९५२ मधल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात,
" सभ्य गृहस्थहो, आणि महिलांनो , या ठिकाणी मला निमंत्रण देण्यापाठीमागे आपला काय हेतू किंवा प्रेरणा होती याची मला कल्पना नाही. मला या गोष्टीची शंका नाही की ज्या विषयासंबंधी मी आपणासमोर बोललो आहे तो विषय या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटिश निघन गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच, आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे ? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजून आपण आता विश्रांती घेतली पाहिजे, संविधान तयार झालेले असल्यामुळे आपला कार्यभाग संपलेला आहे अशा प्रकारच्या 'शिष्टपणाच्या' भावनेविरूद्ध मला आपणास ताकीद देणे भाग आहे. कर्तव्य संपलेले नाही, त्याला आता कुठे सुरूवात झाली आहे.
तुम्हाला याचे स्मरण ठेवावे लागेल की, लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. ते अमेरिकेत वाढले, ते इंग्लंडमध्ये वाढले.
खरोखरच इतर ठिकाणी काय घडले हे पाहाण्यासाठी ह्या उदाहरणातून आपणास काही प्रमाणात धैर्य प्राप्त होईल. तसेच आपणापैकी काही लोकांना हे स्मरण असेल की, पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आणि ऑस्ट्रिया-हंगेरिया आम्राज्याचे विभाजन म्हणून विल्सनने स्वयंनिर्णयाच्या आधारावर ऑस्ट्रियापासून स्वतंत्र असे वेगवेगळे छोटे देश निर्माण केले. त्याची सुरवात लोकशाही संविधानाने व लोकशाही शासनाने झाली. आणि त्यांच्या संविधानात मूलभूत अधिकारांचा समावेश देखील होता. हे मूलभूत अधिकार व्हरसाइल्सच्या शांतता तहाने त्यांच्यावर बंधनकारक केले होते.
माझ्या मित्रांनो. त्या लोकशाहीचे काय झाले हे आपणास ठाऊक आहे काय ? लोकशाहीचा अंश तरी त्या ठिकाणी पाहावयास मिळतो काय ? त्या सर्व संपलेल्या आहेत. त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत.
काही दुसरी विद्यमान उदाहरणे विचारात घ्या. सिरियामध्ये लोकशाही शासन होते. फारच थोड्या वर्षानंतर तेथे लष्कराची क्रांती झाली. सिरियाचा प्रमुख कमांडर येथील राजा झाला व लोकशाही लोप पावली.
दुसरे उदाहरण घ्या. इजिप्तमध्ये काय घडले? तेथे सुद्धा सन १९२२ पासून सतत ३० वर्षे लोकशाही शासन व्यवस्था होती. परंतु एकाच रात्रीत फरूकला राज्यसत्ता सोडावी लागली व नजीब इजिप्तचा हुकूमशहा झाला. त्याने लगेच तेथील संविधान नष्ट केले.
येथे ही सर्व उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत आणि म्हणून मला असे वाटते की, आपल्या भवितव्यासंबंधी आपण फारच सावध आणि फारच समजुतदार राहिले पाहिजे. आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे व शिला दूर करण्याच्या कामी आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहोत किंवा नाही याचा आपणास गंभीरपणे विचार करावा लागेल.
मी आपणासमोर मांडलेल्या काही विचारांमुळे आपणामध्ये जर काही जागृती निर्माण झाली असेल व या समस्यांबाबत आपण गाफील राहून चालणार नाही असे आपणास वाटत असेल तर माझे कर्तव्य भी पार पाडले आहे असे मला वाटते."
#संविधानदिवस
परमपूज बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातील धोके यापूर्वीच सांगून टाकलेले आहेत पण आपण त्यांना वाचलेलं नाही . संघटनेवर जोर का द्यावा हे सांगताना बाबासाहेब आपल्या १४ एप्रिल १९४७ ( वाढदिवसाच्या निमित्त ) केलेल्या भाषणात सांगतात,
" आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास जे राजकीय हक्क प्राप्त होतील ते फक्त एका विवक्षित काल मर्यादेपर्यंतच अबाधित राहातील हे तुम्ही लक्षात ठेवा.
हिंदुस्थानात असा एक काळ येईल की ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे तर सर्व समाजाचे राखीव हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही.
शेवटी सवाँना सुबुद्धी आठवून या गोष्टीची जाणीव होईल व आपणास जे साध्य करावयाचे आहे ते हस्तगत करता येईल अशी मला आशा आहे. यासाठी आपणास फक्त संघटनेची गरज आहे
जेव्हा असे घडेल तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून राहावे लागेल. म्हणून अभेद्य संघटना निर्माण करावयाचा दृढ निश्चय करा."
आता आहे आपल्याकडे, संघटना आहे , पक्ष सुद्धा आहे आणि वर्तमानपत्र सुद्धा आहे. एक अभिमानास्पद इतिहास आहे . फक्त गरज आहे ती त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना आर्थिक आणि शारीरिक बळाची मदत करणे.
"देश का संविधान बनाते समय मेरी भूमिका प्रमुख थी। बहुत से लोग कहते हैं कि इस संविधान का मसौदा कुछ क्लर्कों ने तैयार किया और मैंने केवल हस्ताक्षर कर दिए! (हँसी)
मेरे साथ ड्राफ्टिंग कमिटी में जो सदस्य थे, वे कितने दिन उपस्थित रहे और कितने दिन गायब रहे, यह मैं आपको बता सकता हूँ। अंत में मैं और मेरी मुख्य सचिव रह गए। कुछ की कहीं नियुक्तियाँ हो गईं! जब मुझे अपनी आत्मकथा लिखने का समय मिलेगा, तब इन मज़ेदार बातों को विस्तार से लिखूँगा।
जब मैंने संविधान सभा में अंतिम भाषण दिया था, तब यह जानकारी इकट्ठी की थी और उसमें उपस्थिति लेने वाला था, परंतु अपने सहयोगियों पर आरोप लगाना असभ्य बात होती, इसलिए भाषण से वह अंश मैंने हटा दिया।"
- BAWS.VOL 18,(3). (MARATHI).
बौद्ध धर्माला आधुनिक भारताचे खरे तत्त्वज्ञान, राष्ट्रीय प्रतीकांचा आधार आणि ज्ञानाचा स्रोत म्हणून सादर करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मे १९५० मध्ये सांगतात,
" आपण बुद्ध जयंती साजरी करीत आहोत आणि तुम्हास मी सांगू इच्छितो की जरी सध्या हिंदू धर्माइतका बौद्ध धर्माचा प्रसार भारतात नसला तरी स्वातंत्र्य प्राप्तीपासून जनतेची मते बौद्ध धर्माकडे अधिक झुकत आहेत.
तुम्ही घटकाभर विचार करा, जवळ जवळ २,५०० वर्षांनी बुद्ध जयंती येथे साजरी केली जात आहे. बौद्ध धर्माकडे आजपावेतो दुर्लक्ष केले तरी बुद्ध जयंती साजरी होते, ही गोष्ट असामान्य नव्हे असे कोण म्हणेल ?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर' आपले' म्हणता येईल, अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे. हिंदू संस्कृतीत आपण पुष्कळ शोधून पाहिले पण त्यात विशेष काहीच सापडत नाही. फक्त बौद्ध धर्मामधूनच खऱ्या ज्ञानाचे किरण दिसतात आणि बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान असल्याचे आपण जगाला सांगू शकतो.
आपल्या राष्ट्रध्वजावर बुद्धाचे चक्र आहे. आपली राजमुद्रा बौद्ध तत्त्वज्ञानावर अधिष्ठित आहे. शिवाय, नवीन भारतीय घटनेप्रमाणे आपल्या राष्ट्राध्यक्षास जेव्हा अभिषेक करण्यात आला तेव्हा बुद्धाची मूर्तीच सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली."
प्रसिध्द विद्वान, बहुभाषाविद आणि जगप्रसिद्ध इतिहास तज्ञ डॉ एल एम जोशी आंग्लविद्याविभूषित, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन करताना म्हणतात,
“सर्व सरंजामी- राजेशाही आणि देशाच्या विनाशाला कारणीभूत ठरलेली मनुस्मृति प्रणित समाज व्यवस्थेला नाकारून+
#Father_Of_Indian_Constitution
या माणसापासून तरी आंबेडकरी जनतेने सावध रहावे.अशी माणसे चळवळीला प्रस्थापितांच्या दावणीला बांधत असतात.
अशाच लोकांबद्दल बाबासाहेब आपल्या जानेवारी १९४९ मधील भाषणात म्हणतात,
" वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहीत आहे की आपण कळपाने राहिले पाहिजे.
आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहाणार नाही. ब्राह्मणेतर पक्षाची काय दुर्दशा झाली ? १९३२ सालपर्यंत आम्ही संगनमताने काम करीत होतो. त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसबाहेर राहून उपयोग नाही. आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल. बाहेरून किल्ला फोडता येणार नाही. ह्या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले. मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले. परंतु शिरलो ती भयंकर चूक झाली वाटत आहे.
आज ब्राह्मणेतर त्यांनी माझे ऐकले नाही. आपण आत असे आज ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांना पक्ष नामशेष झाला आहे. ते आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे.
आम्ही झोपडी मोडून समझौता करावयाचा हे मला बिलकूल पसंत नाही. झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही. "
Disclaimer - यावेळी काँग्रेस हाच मुख्य पक्ष होता. आणि काँग्रेस हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे. कुणाच्या भावना आहत करून घेऊ नका ही विनंती.
Paid my tribute to the great Dr. Babasaheb Ambedkar at Deekshabhoomi, Nagpur, on Constitution Day.
संविधान दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
#JaiBhim
परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतील नागवंशीय लोकांचा इतिहास सांगताना म्हणतात,
" बौद्ध धर्माच्या उत्पत्तिसंबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.
सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले, एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्यांच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग पायदळी लढत. आर्य-नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला.
महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्ठन दूर केले तर या आर्य-नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे Scorched earth policy ची कृत्ये करून नागांची ससेहोलपट चालविली. या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचविले, अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते.
पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी द्वेष वसत होता. परिक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता.
आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून, कर्ण व अनंत यांच्या कर्णार्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आपण अर्जुनाविरूद्ध साध्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले साहय नाकारले. कारण, कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता.आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे साहय घेणे निषिद्ध होते.
बौद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण-क्षत्रियांमधला. या लढ्याची इतने पुढे पुराणातून आली आहेत. त्याप्रमाणेच मनुने आपल्या स्मृतीत, क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे त्याची कारणे देताना, पूर्वकालीन ब्राह्मण क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे.
आर्य व नाग, ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसुक्तांचा अंतर्भाव केला असावा. पुरुषसुक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरुषसुक्ताने उच्चनीचतेचे तत्त्व समाजात आणले.
या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाहीप्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांतांचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे.
बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बव्हंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यत हीन समजल्या जाणाऱ्या वर्णांपैकी होते. नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते. परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला. बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शुद्रादिशुद्रांनी त्याचा बहुसंख्येने केलेला स्वीकार, बौद्ध वाड्मय व विशेषतः थेर व थेरीगाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल."
शिवाजी पार्कवर गाव गाड्यातील, श्रमिक, कष्टकरी, यांचा जमलेला हा बहुजनांचा मेळा!
रस्त्यावर जगण्याचा लढा लढणारे असोत वा, बिल्डिंगमध्ये पंचतारांकित आयुष्य जगणारे या सर्वांचे मुक्तीचे साधन म्हणजे भारतीय संविधान!❤️
#संविधान_सन्मान_महासभा#PrakashAmbedkar#ShivajiPark
भारताचे संविधान हाच आमचा अभिमान!
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. अनेक चर्चा, विचारमंथन आणि आवश्यक सुधारणांच्या प्रक्रियेनंतर २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशभर लागू करण्यात आले. जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून भारतीय संविधानाने भारताच्या लोकशाही प्रवासाला एक नवी दिशा दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या या संविधानाने देशाला केवळ राज्यकारभार चालवण्याची व्यवस्था दिली नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या महान मानवी मूल्यांचा भक्कम पाया दिला. प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी संविधानाने दिली आहे.
संविधानाने दिलेले अधिकार सुरक्षित ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणेही आपले कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम आणि टिकाऊ करण्यासाठी प्रत्येक संविधानप्रेमी नागरिकाने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा सजगपणे आणि विवेकबुद्धीने वापर केला पाहिजे. संविधानाची मूल्ये मानणाऱ्या नेतृत्वाला प्रतिनिधित्वाची संधी दिली, तरच आपले मूलभूत अधिकार आणि हक्क सुरक्षित ठेवण्याचा सामूहिक लढा अधिक बळकट होऊ शकतो.
आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी 'आम्ही भारताचे लोक' या भावनेतून लोकशाहीचे संरक्षण, सामाजिक समतेची स्थापना आणि न्यायपूर्ण समाजनिर्मिती करण्याचा संकल्प करूया. संविधान केवळ पुस्तकात किंवा शासकीय कार्यालयात मर्यादित न राहता ते प्रत्येक घरात, प्रत्येक माणसाच्या विचारात आणि आचरणात पोहोचवूया. कारण समताधिष्ठित, न्याय्य, प्रगत आणि मानवतावादी भारताच्या निर्मितीचा मार्ग संविधानातूनच जातो.
हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूल्यांनुसारच चालेल !
सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय भीम! जय संविधान!
#ConstitutionDay #संविधानदिन #जयभीम #जयसंविधान