माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या 'उद्योग प्रकोष्ठ प्रदेश संयोजक व सह संयोजक' पदी पुढील प्रमाणे नियुक्ती जाहीर केली आहे.
सन्मानीय पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🪷
#BJP#Maharashtra
अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!
आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती व्यक्तिरेखा अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
रंगभूमीपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणारा हा असामान्य कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला.
नाना पाटेकर हे नाव कायमच अभिनयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती
📍 पुणे
सेवेची २५ वर्षे… संकल्प विकसित भारताचा!
२५ वर्षांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारत सुरू झालेला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदीजींच्या सार्वजनिक जीवनातील प्रवास आज राष्ट्रसेवेच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे.
या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या पर्वानिमित्त पुणे शहरात ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न झाली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ, मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नेते मा. श्री. प्रकाशजी जावडेकर, आमदार श्री. सिद्धार्थजी शिरोळे, महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, आमदार सुनीलजी कांबळे, माजी आमदार श्री. जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमालेजी, शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे,सभागृह नेते, पुणे मनपा. गणेशजी मधुकर बिडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“We Will Do It” या आत्मविश्वासपूर्ण संदेशातून २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयासाठी सामूहिक प्रयत्नांची प्रेरणा मिळाली.
सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाच्या या २५ वर्षांच्या प्रवासाला अभिवादन करत, विकसित भारताच्या संकल्पासाठी आपला सहभाग आणि योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
मशाल यात्रेच्या भव्य नियोजनाची पूर्वतयारी!
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ, अशी सलग दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी अखंड आणि निस्वार्थ लोकसेवा केली आहे. त्यांच्या याच ऐतिहासिक विकासपर्वाचा आणि राष्ट्रसमर्पणाचा गौरव करण्यासाठी विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच निमित्ताने येत्या ७ तारखेला शहरातील प्रत्येक प्रभागात भव्य ‘मशाल यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे व याची सांगता शुभारंभ हॉल येथे होणार आहे, याच दिवशी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी सर्वांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज जी घाटे, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, भाजपा प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा मनिषाताई लडकत, सर्व सरचिटणीस, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@narendramodi@ChDadaPatil@DheerajGhate@GaneshBidkarBJP@BJP4Maharashtra
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांना निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! मतदारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निश्चितच विजयी यश संपादन कराल, असा विश्वास आहे.
#BJP #BJP4Maharashtra #VidhanParishadElection #Maharashtra #भाजपा
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@tarunchughbjp@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
काळेपडळ ,होळकरवाडी, महालक्ष्मी वनालिका सोसायटी, हांडेवाडी येथे नागरिकांच्या ड्रेनेज समस्येबाबत संबंधित अधिकारी मा.संजय गायकवाड साहेब, सौ.आशालता साळवे मॅडम व मा. संदेश शिर्केसाहेब यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी केली.
परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेत, ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
@pmccarepune@PMCPune
संस्कृतीचा वारसा, नव्या युगाची ताकद... आपली मायमराठी!
संतांची वाणी आणि शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा जपणाऱ्या आपल्या मायबोलीला मिळालेला 'अभिजात दर्जा' हा प्रत्येक मराठी माणसाचा सन्मान आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्य व अहिंसा या मूल्यांवर आधारित सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.
शांततेचे व अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधींचा देश अशीच आजही भारताची जगभरात ओळख आहे. त्यांच्या शिकवणीचा सर्व देशवासीयांनी अवलंब करणे हेच आजच्या काळात महात्मा गांधींना खरे अभिवादन ठरेल. महात्मा गांधीजी यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
भावपूर्ण श्रध्दांजली
दिवेआगार (रायगड) इथं सहलीसाठी गेलेल्या आळंदी येथील खासगी क्लासच्या ८ विद्यार्थ्यांचा पोहण्यासाठी गेले असताना समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
पुणे-ओकायामा 'सिस्टर सिटी' संबंधांना २० वर्षे पूर्ण होत
असताना, जपान दौऱ्यात ओकायामा प्रीफेक्चरचे गव्हर्नर रियुता इबालागी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुणे आणि ओकायामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासोबतच विविध विकासात्मक विषयांवर चर्चा केली.
जपानी उद्योजकांनी पुण्यात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले. तसेच पुण्यात जपानी भाषा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, स्मार्ट अॅग्रीकल्चर, आयुर्वेद व वेलनेस तसेच उद्योग-गुंतवणुकीच्या नव्या संधींबाबत विचारविनिमय करण्यात आला.
पुणे-जपान मैत्री अधिक दृढ करत पुण्याच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.
अशोकजी म्हणायचे की, हिंदू धर्म जगापर्यंत पोहोचवण्यामागे आपण हिंदू आहोत, या अभिमानाची भावना असण्यासोबतच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची चिंता करणारी विचारधारा हिंदू धर्मात आहे, हा व्यापक विचार जगापर्यंत पोहोचला पाहिजे. - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah जी
मन की बात!
देशाच्या विकासाची दिशा, समाजातील सकारात्मक परिवर्तन आणि देशभरातील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी यशोगाथा यांचा थेट संवाद साधणारा ‘मन की बात’ हा विशेष कार्यक्रम.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आज मनापासून ऐकला. देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत होत असलेल्या सकारात्मक प्रयत्नांची प्रेरणा यावेळी मिळाली.
नवा भारत घडविण्याच्या या प्रवासात प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे.
देशहित, जनसेवा आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अधिक दृढ करून विकासाच्या या वाटचालीत आपले योगदान देऊया!
#mankibaat #narendramodi
गणेशोत्सवाच्या भक्तिमय पर्वाची सांगता करताना श्री गणेश विसर्जन होदामध्ये नागरिकांनी भक्तिभावाने व पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणरायाचे विसर्जन केले.
नागरिकांना गणेश विसर्जनासाठी सुरक्षित, सुलभ आणि व्यवस्थित सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विसर्जन होदाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने श्री गणरायाला निरोप दिला.
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!८
॥ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ॥
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो, हीच प्रार्थना।