जादा दर आकारल्यास थेट परवाना रद्द!
NCMC कार्डसाठी अधिकृत दर, नवीन ₹१९९, जुने ₹१४९.
यापेक्षा जास्त रक्कम घेतल्यास संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई केली जाईल.
प्रवाशांनी योग्य दरातच सेवा घ्यावी आणि अनियमितता आढळल्यास तक्रार करावी.
NCMC स्मार्ट कार्ड ची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झाली आहे. तथापि, *एसटी प्रवासात या स्मार्ट कार्ड ची अद्यापी सक्ती करण्यात आलेली नाही.* कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
(रोहन देसाई)
सहा.जनसंपर्क अधिकारी
म.रा.मा.प महामंडळ
प्रसंग कठीण होता...
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
@SunetraA_Pawar
#Maharashtra #OathCeremony
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा #नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि #गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.
पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@cbawankule
#पायाभूतसुविधा
निश्चयी, निर्भीड नेतृत्व आणि हिंदुत्वाच्या विचारांनी कोट्यवधी मनांवर अधिराज्य गाजवणारे, अस्मिता आणि स्वाभिमानाची मशाल पेटवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#BalasahebThackeray#Hinduhrudaysamrat#Maharashtra#MPLodha
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
जैन समाजाचे नेते समाजभूषण गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय भाजपा आमदार श्री प्रशांत जी बंब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@PrashantBumbMLA@cbawankule@BJP4Maharashtra
विदर्भाच्या विकासाला वेग देणारी 'अमृत भारत एक्सप्रेस'!🚉
वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. या गाडीचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार!
@narendramodi@AshwiniVaishnaw
#Maharashtra #AmritBharatExpress #IndianRailways
महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
#Maharashtra #MaharashtraFloods
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आलेल्या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपत्तीच्या या कठीण काळात मदतीचा हात पुढे करणे ही माझी जबाबदारी समजतो.
आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹५१ लाखांचा निधी देऊन मदतकार्याला हातभार लावला. पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत आणि सहाय्य वेळेत मिळावे, यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे, मंत्री श्री आशिष शेलार, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@ShelarAshish@AmeetSatam@CMOMaharashtra #MaharashtraFloods #CMSahayataNidhi #Mumbai
गिरगांव, मंगलवाडी में डागलिया परिवार के आमंत्रण पर पारणा समारोह में शामिल हुआ। 9 उपवास की तपस्या पूर्ण कर रहे सुपुत्र को अपने हाथों से पारणा कराया और इस शुभ अवसर पर डागलिया परिवार को शुभकामनाएँ दीं।
#Paarna#पारणा#MPLodha#Mumbai