NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आणि संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बारामतीच्या कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिचा आज सत्कार केला.
तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्रावणी, तिचे पालक आणि शिक्षकांचं अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
श्रावणीने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
आज आदरणीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदात्यांची भेट घेतली. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करत मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.
रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक दायित्व असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं. अधिकाधिक नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी होत रक्तदान करून मानवतेच्या सेवेत आपलं योगदान द्यावं, असं आवाहन यावेळी केलं.
इंग्रजांविरोधात क्रांतीचे पहिले पाऊल उचलणारे, १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील वीरयोद्धा, अत्यंत निर्णायक वेळी देशभक्तीची ठिणगी पेटवणारे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#mangalpandey#मंगल_पांडे
पुणे जिल्ह्याच्या पायाभूत विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आज शुभारंभ झाला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पुणे–शिरूर जलद दुर्तगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत महामार्ग तसेच तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं भूमिपूजन संपन्न झालं.
पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उभारले जाणारे हे तिन्ही महामार्ग भविष्यातील दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करतील. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, व्यापार, मालवाहतूक आणि रोजगाराच्या नव्या संधींना मोठी चालना मिळून पुणे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आदरणीय अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा करत केंद्र आणि राज्य शासनाशी प्रभावी समन्वय साधला. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या या महामार्गांची उभारणी ही त्यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीची साक्ष देणारी असून, भविष्यातील पायाभूत सुविधांना बळकटी देणारं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं.
तसेच केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशभरात आधुनिक रस्ते आणि दळणवळण सुविधांचं सक्षम जाळं उभं राहत असल्याचं, तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व वेग मिळत असल्याचंही यावेळी सांगितलं.
या तिन्ही प्रकल्पांची कामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालावधीत पूर्ण होऊन पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, उद्योगांना चालना मिळेल, नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी हे तिन्ही महामार्ग निश्चितच मैलाचा दगड ठरतील, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी नाशिक फाटा–राजगुरुनगर उन्नत महामार्गाचा मुद्दाही आवर्जून मांडत या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले १३० कोटी रुपये येत्या १५ दिवसांत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. याचबरोबर भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढाव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे नाशिक फाटा–राजगुरुनगर उन्नत महामार्गाच्या कामालाही लवकरच गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वारगेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.
यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मातंग समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजवला. त्यांचे विचार आणि कार्य समाजाला कायम प्रेरणा देत राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जिवंत व प्रवाहित साहित्यातून वंचित, उपेक्षितांच्या व्यथा मांडल्या. आपल्या शाहिरी बाण्यातून सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
#annabhausathe
आज बारामती इथं स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान नामकरण समारंभ आणि "देवगिरी ते देवराई" राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ झाला. हा केवळ एका उद्यानाच्या नामकरणाचा किंवा वृक्षसंवर्धन अभियानाच्या प्रारंभाचा सोहळा नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करणारा आणि स्वर्गीय मा. अजितदादांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा अविस्मरणीय क्षण ठरला.
या प्रसंगी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, देशी वृक्षांची लागवड आणि वनसंपदेच्या जतनासाठी त्यांचा नेहमीच विशेष आग्रह असायचा. त्यांच्या नावानं उभारण्यात आलेलं हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारं, पर्यावरण शिक्षण देणारं आणि भावी पिढीला प्रेरणा देणारं केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कन्हेरी पर्यटन उद्यानाची संकल्पना, नियोजन आणि उभारणीत आदरणीय अजितदादांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळं कन्हेरी येथील राखीव वनाच्या ५५ हेक्टर क्षेत्रासाठी ₹८ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून Pathways, Suspension Bridge, Solar Lights, Adventure Activity Tools, Rock Garden आणि Butterfly Garden विकसित करण्यात आले आहेत.
"देवगिरी ते देवराई" हे अभियान केवळ वृक्षलागवडीचे नाही, तर पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट राज्य शासनानं निश्चित केलं असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी केलं.
या अभियानासाठी सहकार्य करणारे वनमंत्री श्री. गणेश नाईक, ज्येष्ठ अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सयाजी शिंदे, तसेच वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Mumbai Port Authority, सह्याद्री देवराई फाउंडेशन, Environmental Forum of India, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, विविध CSR भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि सर्व स्वयंसेवकांचं अभिनंदन केलं.
कार्यक्रम सुरू असतानाच पडलेल्या पावसाने वातावरण आणखी भावूक झालं. उपस्थित प्रत्येकाच्या मनात दादा आजही आपल्या आशीर्वादाच्या रूपानं सोबत असल्याची भावना दाटून आली.
आदरणीय अजितदादांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा जपत, हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.
जागतिक युवा कौशल्य दिन !
युवा वर्गामध्ये इच्छाशक्तीची प्रचंड मोठी ऊर्जा असते याला जर कौशल्याची जोड मिळाली तर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर होतो ही जाणीव करून देणारा आजचा दिवस. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिक_युवा_कौशल्य_दिन#WorldYouthSkillDay
'काळाघोडा आर्ट अव्हेन्यू'च्या सौंदर्यीकरण व आकर्षक रोषणाईच्या कामांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं लोकार्पण केलं.
काळाघोडा आर्ट अव्हेन्यूमुळे मुंबईकरांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाचा, सुरक्षित, आनंददायी आणि संस्मरणीय अनुभव मिळणार असून हा परिसर पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरेल.
आज देवगिरी या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध समस्या, सूचना आणि मागण्या जाणून घेतल्या. संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करत त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
📍मुंबई
जातीभेद, कर्मकांड, अस्पृश्यता या विरोधात आपल्या लेखणीतून आवाज उठवणारे, ' इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' या तत्त्वानुसार जीवनभर समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणारे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#GopalGaneshAgarkar#गोपाळ_गणेश_आगरकर
जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाच्या विचारांना नवी दिशा देणारे दूरदर्शी नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#शंकरराव_चव्हाण#ShankarraoChavan
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे अमर वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे शौर्य, निष्ठा आणि बलिदान प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
जय भवानी! जय शिवराय!
#BajiprabhuDeshpande#बाजीप्रभू_देशपांडे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. प्रमोद हिंदूराव यांनी आयोजित केलेल्या 'आई महोत्सव – २०२६' व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून मातृशक्तीला कृतज्ञ अभिवादन केले.
यावेळी बोलताना श्रीमती. सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या की, "आई ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याचा सर्वात भक्कम पाया असते. तिचे संस्कार, तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्टच मुलांच्या यशाला दिशा देतात. समाज घडविणाऱ्या प्रत्येक आईचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार आणि सामान्य कुटुंबांच्या प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या विचारांचा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेताना मातृशक्तीचा सन्मान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ही समाजाप्रती आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच मातृशक्तीचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा त्याग यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगत त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी मा. आ. श्री. दौलत दरोडा, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. नजीब मुल्ला, सौ. ज्योती हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस श्री. किसनराव तारमळे, प्रदेश सरचिटणीस श्री. संजय तिवरे, ठाणे ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष श्री. प्रतिक हिंदूराव, यांच्यासह मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार, जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय आणि पक्षाचं संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं हे कार्यालय कार्यरत राहील. बदलापूर व परिसरातील नागरिकांसाठी हे कार्यालय लोकसेवेचं प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
प्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो!
#जागतिक_लोकसंख्या_दिन#worldpopulationday
लोकसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो हिच सदिच्छा!
@SunilTatkare#happybirthday#ncp#ThaneNCP
आज देवगिरी या निवासस्थानी 'आदिशक्ती अभियान' संदर्भात सकारात्मक आणि फलदायी बैठक पार पडली. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव, आयुक्त तसंच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिलांचं आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आर्थिक सक्षमीकरण, नेतृत्व विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रभावी समन्वय साधून महिला सक्षमीकरण अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत महाराष्ट्र शासनासोबत एसएनडीटी महिला विद्यापीठ, फिक्की फ्लो मुंबई, ॲमेझॉन, इन्स्टिट्यूट फॉर विमेन एम्पॉवरमेंट (IWE) आणि MISCP यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
शासन, उद्योग, विद्यापीठं आणि सामाजिक संस्थांमध्ये प्रभावी अभिसरण निर्माण करून विद्यमान शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करणं, तसंच तळागाळापर्यंत परिणामकारक आणि मोजता येतील असे बदल घडवून आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
'आदिशक्ती अभियान' हे महाराष्ट्रातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी प्रभावी आणि परिणामकारक अभियान म्हणून विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.