✍️#जंगल प्राणी पक्षी हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत,मला ह्यावर चर्चा करायला बोलायला खूप आवडतं,ट्विटरवर तसे मित्रदेखील आहेत,काही नवीन भेटले,इच्छा झाली की थोडक्यात माझी ह्या क्षेत्रातील ओळख, #अनुभव,आवड ह्यावर (नेहमीचे तांत्रिक विषय सोडून) एक थोडा वेगळा🧵
#म#मराठी#भावनिक
👇
AI च्या वेगवान जगात लवकरच नोकरीच्या ॲाफरमधे पैशाबरोबर
"किती Token मिळतील"
"कोणत्या #AI software चे परवाने मिळतील"
हे देखील विचारले जाणार
"फुकट ते पौष्टिक" तत्वानुसार प्रत्येक जण खच्चून साधने वापरतोय आणि token उडवतोय
कंपन्या भरतायेत बिलं पण त्यांना आता परवडत नाहीये😅
#म#नोकरी
१०-१५ वर्षांपूर्वी command prompt ला टाकणारे किंवा लांब पळणारे,आज सकाळ ते संध्याकाळ तेच terminal लावून बसतात,कारण
"AI साधनांचा उदय"
फक्त command द्या आणि काम करवून घ्या✅
Code ते ppt सर्व पटकन बनवून मिळतंय,दिसायला भारी दिसतंय😎
नाव देखील होतंय,प्रसिद्धी मिळतीय 🙌🏻
#म#नोकरी
@rhtbapat Surprisingly for past many years, that state is somehow doing well in terms of many development indexes such as
Transportation, Roads, Healthcare, Infrastructure, Business Development, Production etc.
@Himanshutyg_ifs Rightly said sir. I know it's fascinating but inbreeding can make them vulnerable, I would celebrate Tigress relocated from Tadoba and her cubs more than these tigers. Something similar about Lions of Gir. They are so endemic to Gir and nowhere else in India to diverse.
हतबलता काय ते गेल्या शुक्रवारी पाहिले
#नोकरी कपात झाल्याने एक जण ॲाफिसच्या प्रत्येक मजल्यावरील डेस्कवर resume ठेवत फिरत होता
विसावर आहे,बायको/पोरं आहेत,मोठं घर घेतलंय, टेस्लातर हवीच
कधीही अर्थिक परिस्थिती कितीही सुधारली तरी मध्यमवर्गीय विचारसरणी सोडू नये (१/२)
#म#मराठी
@ChuckDeo तेच तर त्यांची मानसिकता ही नोकरी कमी आणि व्यापार जास्त अशी असते, माझा मारवाडी मित्र इंजिनिअरिंग करून बाहेर राहतो पण त्याला माहिती आहे की ४०-४५ नंतर दुकान सांभाळायचे आहे. आणि त्यात बदल नाही. तसेच लग्न लवकर होतात मग पुढची पिढी लवकर हाताशी येते.
@ChuckDeo त्यांच्यात पिढीजात चालतं,ते खरंतर शैक्षणिक गुंतवणूक करतात,हे पंजाबी व्यापारी जे इथे आले अनेक वर्षांपूर्वी त्यांच्यात पण पाहतो. आपल्यात तसं दिसत नाही. आपण नोकरीच्या मानसिकतेत जास्त असतो,ते चुकीचं नाही कारण मराठी समाज पूर्वीपासूनच जास्त शिकलेला असल्याने नोकरीचे साधनच प्रथम मानतो.
@ChuckDeo शिक्षण महाग झालंय, आणि पुढेही अजून होत जाणार. ते संपल्यावर काही जणांना नोकरी/इंटर्नशीप लागते काही ना नाही. नोकरी लागूनही अनेकजण पहिले काही वर्ष अर्थिक गुंतवणूक, सेविंगकडे लक्ष देत नाहीत(मी तेच केलं😓), तर ते न करता पहिल्या पगारापासूनच नियोजनाची सोय करत राहणे असा माझा विचार होता
@ipc2k15@iagricos इथे कोणत्याही कामाला कमी/जास्त मानत नाहीत,कोणी प्रामाणिकपणे करत असेल तर त्या कामाला तेवढीच किंमत असते त्यामुळे तुम्ही म्हणता ते पटणारं नाही
शिवाय हे सर्व विसावर असताना करू शकत नाही त्यासाठी GC किंवा नागरिकत्व लागते त्यामुळे ते घेतल्यावर कोणी का परत येतील हा ही मुद्दा आहे
@digitalfoxbat Agreed up to certain extent. It won't be just "how well you use AI" it will be "how optimally you use it for work and financially optimal it will be for consumers". This is going to get to peak and then stay stagnant ( same pattern with another technology)
१०-१५ वर्षांपूर्वी command prompt ला टाकणारे किंवा लांब पळणारे,आज सकाळ ते संध्याकाळ तेच terminal लावून बसतात,कारण
"AI साधनांचा उदय"
फक्त command द्या आणि काम करवून घ्या✅
Code ते ppt सर्व पटकन बनवून मिळतंय,दिसायला भारी दिसतंय😎
नाव देखील होतंय,प्रसिद्धी मिळतीय 🙌🏻
#म#नोकरी
@iagricos खरंय,मला पण नाही कळत. पण एक आहे जी लोकं "काही वाटेल ते हो पण परत जायचं नाही" हे ठरवून येतात ते बिनधास्त धाडस करतात. मी F1 वरून H1B वर मग नंतर H4 EAD वर पण गेलेले पाहिलेत. अगतिकता बऱ्याचदा सारासार विचार मागे टाकते. ज्यांचे चालतं त्यांचं चालतं पण आडलं तर मग भयंकर ताण तणाव येतो
अर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे
पुर्वी "३० नंतर,लग्न/पोरंबाळ होऊदे" चालत होतं
आज शिक्षण संपल्यावर हे लगेच चालू केलं पाहिजे
१०-१५ वर्षांपूर्वी नोकऱ्या गेल्या तरी #अनुभव /कौशल्यांवर नवीन मिळत होत्या,तुम्हाला पर्याय होते. आज ती परिस्थिती नाही,नोकरीसाठी AI मुळे आपण पर्याय झालोत
(२/२)
. @Waymo ह्या प्रसिद्ध कंपनीच्या स्वयंचलित गाड्या खूप दिसू लागल्या आहेत
मी अजून #अनुभव घेतला नाही पण आत्तापर्यंत
"चालत्या गाडीत एकटाच प्रवासी"
हे दृश्य फक्त आपल्या सिनेमातच पाहिलं आहे😬
लवकरच हे #तंत्रज्ञान कसं आहे ते एकदा स्वतः बसून बघितलं पाहिजे🙌🏻
#म#मराठी
काल @Meta त काम करणाऱ्या मित्राला भेटलो,तंत्रज्ञानाबद्दल वाचतो पण उपकरणं विकत घेतोच असे नाही
पहिल्यांदा त्याचा #RayBanMeta पाहिला
भारीच #तंत्रज्ञान आहे,अनेक गोष्टी डोळ्यापुढे करू शकतो,त्यात 🔊🎤📸 असल्याने पूर्ण व्हिडीओ घेऊ शकतो
घेईन न घेईन माहिती नाही पण हे आवडलं नक्की #म#मराठी
@k_shree96 मुद्दे बरोबर पण विषय मराठी/अमराठीच्या नाही,अमराठी लोकं वाढलेत आणि १५-२० वर्षांपूर्वी त्यांच्या आणि आपल्या जीवनशैलीत फरक होता पण आज परिस्थिती वेगळी आहे,सर्वसामान्य तरूण लोकांची जीवनशैली एकाच प्रकारची झालीय,अशा मुद्यात मराठी/अमराठी घेऊन आपण फक्त आपल्या मनाची समजूत घालतो