वरुण सुखराज यांचा ‘द ग्रेट इंडियन इल्यूजन’ हा माहितीपट भारताच��या बँकिंग व्यवस्थेतील काळ्या वास्तवाचा एक अस्वस्थ करणारा प्रवास आहे. कर्ज, सत्ता आणि विशेषाधिकारांच्या अदृश्य खेळाचे चित्रण यात पाहायला मिळते. पोकळ विकासाच्या गप्पा आणि बँक घोटाळे, जनतेचा तुटणारा विश्वास व वाढती दरी यांमुळे आधुनिक भारताच्या पायाशी असलेला एक भ्रम हा माहितीपट अत्यंत बारकाईने मांडतो.
पुर्ण माहितीपट बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/CmK5JWTpxR
#TheGreatIndianIllusion
Join us today (20-May-2026) at 8:00 PM IST / 2:30 PM UTC for TradFi & Bitcoin Club
Topic : The Great Indian Illusion by @thevarrun — a deep dive into India’s banking system, debt, trust, and power.
We'll cover:
• Trust in banking systems
• Rules vs reality for citizens and institutions
• Deposits, write-offs, bailouts, and risks
• Bitcoin as a trust-minimized alternative
• Self-custody vs bank custody
• Whether Bitcoin is a true solution or just part of one
Balanced discussion — not “banks bad, Bitcoin good.”
Join us in lounge of Bitshala discord server: https://t.co/D8AyUv27Ql
The Great Indian Illusion, Documentary: https://t.co/TJDUaq2mdx
With the GD’s warnings on the international stage sending shivers down everyone’s spine, this feels like the right moment to watch @thevarrun's The Great Indian Illusion and resist the convenient narrative that the Iran crisis alone is responsible for the decline we are heading towards.
This disaster has been years in the making. We simply chose to look away because we loved that illusion, till it is now threatening to burst and kill our reality.
PS: The visuals of PMC Bank’s devastated customers were genuinely heartbreaking. And the footage of demonetisation queues only deepens the resentment towards Dhurandhar movies for attempting to justify what was, for many, a national tragedy. The final song was painful and haunting.
https://t.co/aZMKdFlt0K
आत्ताच कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा फोन झाला; ते पोलिसांच्या गाडीत होते!
बुलढाण्यात प्रचंड पोलिस फौजफाटा वापरून ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं वाचन करायला गेलेल्या अनेकांना अटक करून नेलं आहे.
‘शिवराळ गुंडाची’ अब्रू वाचवण्यासाठी ‘पुस्तक वाचणाऱ्या डॉक्टरांना’ अटक करण्यात आली आहे!
महाराष्ट्रधर्माची लक्तरं आपल्या अंगावर शोभून दिसत आहेत!!
- वरूण
आराम करण्याची गरज असली तरी मुभा नाहीय��, असं दिसतंय…
उद्या संध्याकाळी ६ वाजता कोल्हापूरातील कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांच्या स्मारकावर भेटूया… ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचं जाहीर वाचन करूया.
देशाच्या राजकारणातील सर्वोच्च ‘नाना पाटेकरांचं’ थोडंसं भाषण ऐकून ‘खरे नाना’ सुद्धा खरंच ‘खरे’ आहेत की काय, अशी शंका यायला लागली आहे !
बापरे.
लवकर झोपायला हवं होतं. 😣
- वरूण
#LateNightThoughts
Respected sir maybe there was a communication issue but the way I remmeber the last 3 questions of my cross examination this evening -
Do you feel remorse - No
Are you sorry about what you said- No
If you tender an unconditional apology this matter will be looked at differently - No I can’t as the apology would not be sincere. Also it would set a terrible precedent for other artists & their freedom.
From building the civilisation we take pride in,
to becoming the very force that now allows a maniac who threatens to destroy it…
we’ve come a long way.
Congratulations, humans.
Perhaps doom was always part of the design.
Cheers !
- V
‘बरबटलेल्या' महाराष्ट्राला आणि 'भेदरलेल्या' देशाला तुमची गरज होती, सर…
'आम्हाला' तुमची गरज होती.
“काम करत राहू” असा तुम्हाला शब्द दिलाय...
डोळे पुसून, ‘पेन-पेपर' घेऊन बसलोय...
जमेल तशी गढी सांभाळू.
तुमचा,
- वरूण
“इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा अखेरचा ऋषी !”
‘मार्मिक’
२ एप्रिल २०२६.
लोटे परिसरातील PFAS प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर प���्यावरणवादी कार्यकर्ते @thevarrun यांचा महत्त्वपूर्ण संदेश 👇
हा लढा कोणाविरुद्ध नाही, तो आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हक्कांसाठी आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे.
भारतीय संविधान आपल्याला शांततामय आंदोलनाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. चला, संविधानाच्या मार्गाने, शांततेने आणि शिस्तीत हा लढा लढूया.
जय भारत, जय संविधान! 🇮🇳
#StopTheDump #SaveKonkan #CleanWaterRights #PFAS
@DGPMaharashtra @RatnagiriPolice @CMOMaharashtra
@thevarrun@SATYAJIT Chavan @Dhananjay4INC
या आणि अशा अनेक मित्रांच्या पुढाकाराने आणि सहभागाने सोमवारी होणाऱ्या या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
एकीकडे कोकणच्या जमिनी परप्रांतियांना विकायच्या, तथाकथित इन्फ्रा प्रकल्पांच्या नावाखाली संसाधनांची लूट करायची आणि सर्व आर्थिक गैरव्यवहार करणारे,पर्यावरणाची नासधूस करणारे मुक्त राहतील याची सोय करायची या षड्यंत्राला होणारा विरोध हेही व्यापक मराठीकारणच आहे.
कोकणातील विषाची फॅक्टरी !!!
आपल्या कोकणातील लोटे MIDC (जिल्हा रत्नागिरी) मधील पीफास (PFAS) विरोधात महाराष्ट्राने एकत्र येणे का गरजेचे आहे?
महाराष्ट्र आज एका गंभीर पर्यावरणीय वळणावर उभा आहे. आपल्याला औद्योगिक महासत्ता असल्याचा अभिमान असला, तरी "पीफास (PFAS - Per and Polyfluoroalkyl Substances)" सारखा एक मूक आणि अदृश्य शत्रू आपल्या कोकण पट्ट्यातील सुपीक जमीन आणि औद्योगिक क्षेत्रांना विकसित देशांनी नाकारलेल्या घातक तंत्रज्ञानाचे "डंपिंग ग्राउंड" बनवू पाहत आहे.
सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी, कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थ रत्नागीरीतील "लोटे एमआयडीसी" येथील "लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स" कंपनीत होणाऱ्या पीफास उत्पादनांविरुद्ध एक भव्य मोर्चा काढत आहेत. एक पर्यावरण कार्यकर्ता म्ह��ून, मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, हा केवळ एका भागाचा प्रश्न नसून, भारतीय संविधानाच्या "कलम २१" अंतर्गत आपल्याला मिळालेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची ही लढाई आहे.
पीफास (PFAS) म्हणजे काय आणि आपण काळजी का करावी?
पीफास रसायनांना जगभरात "फॉरेव्हर केमिकल्स" (कधीही नष्ट न होणारी रसायने) म्हणून ओळखले जाते, कारण ती निसर्गात कधीही विघटित होत नाहीत. ही रसायने आपले पाणी, माती आणि सर्वात भयानक म्हणजे मानवी रक्तात साचून राहतात. आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार, या रसायनांचा संबंध कर्करोग, यकृताचे आजार आणि पुढच्या पिढ्यांमधील जन्मजात व्यंगांशी जोडला गेला आहे.
विकसित देशांमध्ये या रसायनांवर कडक निर्बंध लादले जात असताना, भारत सध्या "धोरणात्मक शून्यतेमध्ये" वावरत आहे. संसदेतील प्रश्नांना मिळ��लेली उत्तरे, आणि आरटीआय (RTI) ला प्रदूषण मंडळाकडून मिळालेल्या उत्तरातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे: भारतात सध्या पीफासवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही विशिष्ट धोरण किंवा बंदी अस्तित्वात नाही. या कायदेशीर त्रुटींचा फायदा घेऊन घातक उद्योग आपल्या भूमीवर स्थलांतरित होत आहेत.
लोटे एमआयडीसीमधील "विषाचे" संकट..
सोमवार दिनांक ६ मार्च ला निघणाऱ्या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील आणि देशातील जनतेचे काही गंभीर वास्तवांकडे लक्ष वेधणे आहे:
* नियामक त्रुटी: पीफासवर बंदी घालण्याबाबत किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे प्रदूषण मंडळाने मान्य केले आहे, त्यामुळे नागरिक असुरक्षित आहेत.
* "डंपिंग ग्राउंड"चा धोका: प्रगत देशांत बंदी असलेले घातक औद्योगिक तंत्रज्ञान आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्���े स्थान मिळवत असल्याचे पुरावे समोर येत आहेत.
* पायाभूत सुविधांचे अपयश: आपल्या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडे (CETP) या "फॉरेव्हर केमिकल्स"वर प्रक्रिया करण्याची तांत्रिक क्षमता आहे का, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह आहे.
* पारदर्शकतेचा अभाव: हे नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, महाराष्ट्रातील सर्व पीफास उत्पादन युनिट्सचा तपशील मागवणारा आमचा RTI अर्ज सध्या प्रदूषण मंडळाकड��� प्रलंबित आहे, त्यामुळे या रसायनांच्या प्रसाराची खरी व्याप्ती जनतेपासून लपून राहिली आहे.
विषमुक्त कोकणच्या भविष्यासाठी मुख्य मागण्या:
१. तात्काळ उत्पादन बंदी: लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पीफासचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.
२. राष्ट्रीय धोरण: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत पीफासला "धोकादायक पदार्थ" म्हणून अधिसूचित करावे.
३. कठोर मानके: भारताने पिण्याच्या पाण्यातील पीफाससाठी युरोपियन युनियनच्या (०.१ मायक्रोग्राम प्रति लिटर) मानकांचा स्वीकार करावा.
४. ���ंत्रज्ञान ऑडिट: देशात आयात केलेल्या सर्व यंत्रसामग्रीचे स्वतंत्र ऑडिट अनिवार्य करावे, जेणेकरून आपण दुसऱ्या देशांतील जुने आणि प्रदूषकारी तंत्रज्ञान स्वीकारणार नाही.
आवाहन
ही लढाई केवळ एका कंपनीपुरती मर्यादित नाही; ही "Precautionary Principle" (सावधगिरीचे तत्व) जपण्याची लढाई आहे -म्हणजेच पर्यावरणाची हानी होण्यापूर्वीच सरकारने ती रोखली पाहिजे. जर आपण लोटे-परशुराम भागातील भूगर्भातील प���णी दूषित होऊ दिले, तर हे विष भविष्यात अन्नातून आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतील.
इटली देशातील माता त्यांच्या लेकरांना झालेलं आजार रत्नागिरीतील लेकरांना होऊ नयेत म्हणून "मम्मे नो PFAS" च्या माध्यमातून या लढ्याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेने या विषाच्या फॅक्टरी च्या विरोधात उभे राहायला हवं. ६ एप्रिल, २०२६ रोजी एक दिवस आमच्यासोबत या. तुम्ही विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कामगार किंवा पालक असाल, तुमचा पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आपल्या पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या जीवावर होता कामा नये.
हा "महाराष्ट्र धर्म" वाचवण्याच्या लढाईतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.
लढूया आणि जिंकूया !
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे (मोबाइल ९८६७६ ९३५८८) (X : @Dhananjay4INC)
#StopTheDump #SaveKonkan #CleanWaterRights #PFAS