@kondespeaks उगाच सोशल मिडिया वर आलेली माहिती COPY पेस्ट नका करत जाउ...
आयफोन साठी नाही झाल .. नीट माहिती घ्या...नंतर पोस्ट करा.. जबाबदार नागरिक आहोत आपण.
गडचिरोली येथील आदिवासी आश्रमशाळेतील मृत पावलेल्या तीन मुलींची वये १३, ११ आणि ८ वर्षे होती...
घरापासून दूर... शिक्षणासाठी दूरवर राहिलेल्या या मुलींना रात्री झोपेतच सर्पदंश झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील विरोधक झोपले आहेत की सगळे त्या एका कॉकरोचच्या मागे लागले आहेत?
अरे, विरोधी पक्ष जर जिवंत असेल ना, तर या गोष्टींवर विरोध करा! प्रश्न विचारा! सरकारला जाब विचारा! गरीबाच्या पोरी आहेत म्हणून त्यांच्या जीवाला किंमत नाही का? त्यांच्यासाठी आवाज उठवणार कोणी आहे की नाही?
अशा आश्रमशाळेचा परवाना फक्त रद्द करून चालणार आहे का?
ज्या व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप मुलींचा जीव गेला, त्या व्यवस्थेला जबाबदार कोण? कारवाई कुठे आहे? उत्तरं कोण देणार?
लाज वाटायला हवी या सगळ्याची..
विरोधी पक्षाने थोडं त्या कॉकरोचच्या सावलीतून बाहेर निघा. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा. थोडे कष्ट घ्या. आवाज उठवा. आंदोलन करा. सरकारला धारेवर धरा.
सत्ता हवी ना? सत्ता फुकट मिळत नाही! जनतेसाठी संघर्ष करावा लागतो, प्रश्नांवर उभं राहावं लागतं आणि अन्यायाविरुद्ध लढावं लागतं...