ग्रामसभेची मिटिंग चालू होती , विषय होता आपल्या गावचा विकास झाला पाहिजे .
गावातील ग्रामसेवकाने सांगितले की , आपलं गाव भारतातून स्वतंत्र झालं पाहिजे .
यावर गावातील एक सदस्य म्हणाला की , यात आपल्या गावचा विकास कसा होईल ?
लगेच ग्रामसेवक म्हणाला की , आपन भारतातून स्वतंत्र झाल्यानंतर पहिला हल्ला अमेरीकेवर करायचा .
मग एका सदस्याने म्हटलं की , अमेरीकेवर हल्ला करुन काय मिळणार ?
मग तो ग्रामसेवक मोठ्या गर्वाने म्हणाला की , आपण अमेरीकेवर हल्ला करताच अमेरीकाही आपल्यावर हमला करणात . त्यात आपण हरणार आणि अमेरीका आपल्या गावावर कब्जा करणार . मग आपण अमेरिकन नागरिक होणार आणि अमेरीका स्वतः सोबत आपल्या गावाचाही विकास करणार .
आता इतका वेळ गप्प बसलेला पण उपसरपंच लगेच म्हणाला , " च्यायला , मग तर आपल्याला विसा आणि पासपोर्टची पण गरज नाही . आपल्या पैस्यांना डायरेक्ट डॉलरचा भाव मिळणार . आपला विकास होणार , आपण खाडखाड इंग्रजी बोलणार . "
पुढं बसलेले सरपंच इतका वेळ गप्प होते , त्यांना असं गप्प पाहून गावातील सगळ्यांनी त्यांना विचारलं की , सरपंच साहेब , तुम्ही गप्प का ? तुम्हीही काहीतरी बोला याबद्दल .
सरपंच थोडं विचार करून म्हणाले , तुम्ही म्हणताय , ते बरोबर हाय , पण समजा आपण अमेरीकेवर हमला केला आणि त्यात आपण जिंकलो तर ...🫣
😂🤣😂🤣😊
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श,आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारत व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन पक्ष आज आपला २७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
हा प्रवास केवळ वर्षांचा नाही, तर नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, जनसेवेचा आणि देशाला व राज्याला नवी दिशा देणाऱ्या विचारांचा आहे.
या गौरवशाली प्रवासपूर्ती सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
एकत्र येऊयात... वर्धापन दिनाला भेटूयात!
आज आपली लालपरी ७८ वर्षाची झाली.🚌 धन्यवाद @msrtcofficial..
आज आपल्या घरची महिला बिनधास्त एकटी लालपरीने प्रवास करू शकते,त्या कर्मचाऱ्यांनी काय कमवले असेल का नाही माहित नाही पण आया बहिणींचा विश्वास कमवला आहे.
महाराष्ट्रातील पहिली राज्य परिवहनची बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली.
ही बस सेवा बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BSRTC) अंतर्गत सुरू झाली,ज्याला आपण आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणून ओळखले जाते.
बेडफोर्ड कंपनीची ही बस ३० आसनी होती या बसला लाकडी बॉडी आणि बाजूने कापडी कव्हर होते.
या पहिल्या प्रवासाचे भाडे फक्त २.५० रुपये होते,या ऐतिहासिक बसचे पहिले चालक किसन राऊत आणि वाहक लक्ष्मण केवटे होते.
@PratapSarnaik@Dev_Fadnavis
दीनानाथ मंगेशकर यांना मंगेशी मधून ७-८ वर्षाचे असताना हाकलून लावले होते ते ११ वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळी मध्ये जॉईन झाले
त्यावेळी लग्न लवकर होत. बालविवाह म्हणा. पण त्याचे २१ झाले तरी लग्न झाले नव्हते
त्याची धुळ्यात नाटक कंपनी गेली असताना त्याचे मित्र R. N. शिंपी नावाचे मित्र झाले एक दिवस दोघे प्यायला बसल्यावर दिनानाथांनी, त्याची व्यथा बोलून दाखवली .मला लग्न करायचे आहे पण माझे काम आणि माझे घरच्या प्रॉब्लेम माझे लग्न होत नाही आहे
त्यावेळी त्याचे मंगेशकरचे बाबा जिवंत होते
शिंपी चे एक मित्र थाळनेर मध्ये होते त्याचे नाव हरिदास रामदास लाड होते. लाड ह्यांना पण बाहेर दोन गाणाऱ्या बाई कडून मुली होत्या. एक होती नर्मदा आणि दुसरी शेवंती
दोन्ही कडच्या लाड आणि राणे या महिला गायिका .. तिथूनच हे जेनेटिकस आले म्हणायला हरकत नाही
दीनानाथचे लग्न नर्मदा शी झाले पण दुर्दव्याने पहिला बाळाच्या वेळचा मृत्यू झाला.
मग त्यांनी दुसरी बहीण शेवंता शी लग्न केले आणि हे पण लग्न धुळ्यात झाले
लग्न घरात फक्त ४ लोकात झाले
मग त्यांना ५ बाळ झाले.
शेवंता नि लग्न नंतर श्रीमंती नाव घेतले आणि त्यांना उदंड आयुष्य लाभले १९९५ ला त्याचे निधन झाले. श्रीमंतीनि पूर्ण मंगेशकर कुटुंब उभा केले
नावाप्रमाणे तिने श्रीमंती आणली.
पण दीनानाथची आई आणि श्रीमंतीच्या आई आयुष्यभर वंचित राहिल्या
अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत...😭
म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही...!
#AjitdadaPawar
मतांच्या लाचारीसाठी शांतिप्रिय समुदायाची किती चाटावी लागते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जितुद्दीन..!😹
सहर शेखवर प्रश्न विचारल्यावर "मी काहीच बोलणार नाही" म्हणणारा आव्हाड
भिडे गुरुजींना जिभेला धार लावून शिव्या देतोय!
चाटून चाटून पार @Awhadspeaks ची जीभ झडायला लागली..!
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी
https://t.co/3KtVK0a77I या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
महावितरण
वीज बिलावरील नावात बदल / दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, आधार- मोबाईल-ईमेल लिंक करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे
https://t.co/7RDFTIp9OD
महावितरण मधील कोणतीही तक्रार घरबसल्या ऑनलाईन करू शकता
https://t.co/FtfPq3HNUw
☎️ 19120 / 18002333435
रेशनकार्ड
नवीन कार्ड, नावे वगळायची / समाविष्ट करायची, रेशनबाबत कोणतीही तक्रार करायची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे.
30 दिवसात नवीन कार्ड मिळेल.
अर्ज
https://t.co/mvJ0XUPJuP
तक्रार
https://t.co/FhFZChpitd