प्रेम कदाचित अपूर्णतेचे घोतक असावं.. ज्या दिवशी जगातील प्रेम पूर्णत्वेला जाईल त्या दिवशी ते संपलेलं असेल कदाचित...!
माधवा प्रेम त्रास देत नसतं..त्रास देते ती गतकाळातील प्रेमातील सुखावह आठवण...!
जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, तेव्हा जनतेची समस्या मांडणाऱ्यांनाच अटक केली जाते. आपलं नेतृत्वच पत्रकारांना बघून पळ काढणारे असल्यावर, या लुंग्या सुंग्या नेत्यांकडून तरी जनतेने समाधानकारक उत्तराची अपेक्षा का करावी.!?
#संतोष_पंडित
काळ थोडा असतो सौंदर्याचा,पुढचा प्रवास स्वभावाने पुर्ण केला जातो,
म्हणून माणसाचा चांगला स्वभाव,त्याचे बोलणे आणि वागणूक आयुष्यभर लोकांच्या मनात टिकून राहते.!😊🙌
खरंतर ती माझ्या आयुष्याचा भाग नसतानाच, मी तिच्या इतका जास्त आहारी गेलो होतो की, कालांतराने ती जेव्हा खरोखरच माझ्या आयुष्याचा भाग झाली, तेव्हा माझ्याकडे मी तिला द्यावं असं काहीच उरलं नव्हतं. माझं सर्वस्व मी ती माझ्या आयुष्यात येण्याआधीच तिच्या नावावर करून बसलो होतो. 👇