समस्त पुरुष जातीसाठी धक्कादायक-
माझ्या मित्राचं 2 वर्ष आधी लग्न झालं. पण घरी आल्यापासून मुलगी थोडी विचित्र वागायला लागली. मग लगेच माहेरी गेली. तिथून लवकर यायलाच तयार नाही. मग कसबस तिला परत सासरी आणलं पण मग ती एका खोलीतच राहायला लागली. थोडं बाहेर ये सगळ्यांशी बोल अस जरी म्हंटल तर मग वाद- भांडण करून दाराची कडी लावून 10 - 15 तास खोलीत बंद करून घ्यायला लागली. हे सगळं लग्नानंतर महिनाभरातच. मग ती पुन्हा माहेरी गेली आणि नंतर आलीच नाही.
मित्राकडचे तिला वारंवार आणायला गेले. तरीही ती नांदायला तयार नाही. तिने अट टाकली की आई बाबांपासून वेगळं आपण दुसऱ्या शहरात राहू. मित्र त्यालाही तयार झाला तरीही ती आली नाही. शेवटी प्रकरण डिव्होर्स पर्यंत गेलं आणि आता कोर्टाने मित्रालाच बायकोला 30 लाख रुपये पोटगी म्हणून द्यायला सांगितले.
हा खरच न्याय आहे?
- 100 वर्षा आधी असलेली स्त्रियांची स्थिती, आर्थिक पत, संधी, सामाजिक स्थान हे खूप बदललं आहे. पोटगी देताना या बाबी कोर्टाने विचारात घेऊ नयेत का?
- एकीकडे स्त्री पुरुष समान म्हणायचं आणि मग मुलगी कमावती, श्रीमंत घरातली असली तरी पोटगी पुरुषाच्या माथी मारायची हा न्याय झाला का?
- पुरुष हा दोषींच आहे आरोपी आहे हेच आपली न्यायव्यवस्था गृहीत धरते का?
@saurabhkoratkar
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा न मोजता येणारा हा आनंद !
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधा देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, अकलकुवा, जुन्नर अशा विविध भागांमध्ये शिधा देण्यात आला. दुष्काळासारखं भयाण संकट असताना शिवसेनेने दिलेला हा मदतीचा हात आज शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची करणारा ठरत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी मा. एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले.
मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण असून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे…
#Shivsena #EknathShinde #farmers #बळीराजा #drought
भविष्यातही समाजसेवेची ही अखंड ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित राहो! आणि संस्थेच्या हातून उत्तरोत्तर विधायक कार्य घडत राहो हीच सदिच्छा..!
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@liparevijay
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव...!
समाजसेवेचे व्रत हाती घेऊन, निःस्वार्थ भावनेने सामाजिक बांधिलकी जपत अविरत कार्य करणाऱ्या आपल्या ऊर्जा फाउंडेशनला सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वोक्हार्ट रुग्णालय (@WockhardtHosp) यांच्यावतीने सन्मानित करण्यात आले,
#ऊर्जा#urja
या सन्मानामागे संस्थेचे अध्यक्ष विजय (दाऊ) लिपारे, सेक्रेटरी नितीन केरकर आणि पदाधिकारी, महिला सदस्य आणि हितचिंतक यांचे अथक परिश्रम, निःस्वार्थ सेवाभाव व समाजाप्रती असलेली आत्मीयता दडलेली आहे.
ऊर्जा फाउंडेशनच्या या गौरवशाली यशाबद्दल संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
🚩 शिवसेना दसरा मेळावा – विचार महाराष्ट्राचा, निर्धार महाराष्ट्राच्या विकासाचा!
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा वारसा आणि मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे खंबीर नेतृत्व! शिवसेनेचा ६१ वा दसरा मेळावा म्हणजे भगव्या विचारांचा बुलंद हुंकार आणि महाराष्ट्राच्या हितासाठीचा निर्धार!
“भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर!” या गर्जनेतून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश देत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य व जीवनावश्यक साहित्याचे १०० हून अधिक ट्रक रवाना करून शिवसेनेने कृतीतून समाजसेवेचा भगवा फडकवला!
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने उसळलेला भगवा सागर म्हणजे शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनसेवेच्या बांधिलकीचा बुलंद आविष्कार!
विचार बाळासाहेबांचे…
नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांचे…
आणि ध्यास एकच — समर्थ, समृद्ध आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा!
🚩 शिवसेना म्हणजे संघर्ष, सेवा आणि जनतेच्या विश्वासाची ताकद!
जय महाराष्ट्र! 🚩
@mieknathshinde@DrSEShinde@milinddeora@iYashwantJadhav@meNeeleshNRane@YaminiYJadhav@Shivsenaofc
“मुरली देवरा नेत्र रुग्णालयासाठी लढा — रुग्णसेवा थांबणार नाही!”
इमारत धोकादायक असली तरी नागपाडा-भायखळा परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची रुग्णसेवा एका दिवसासाठीही थांबणार नाही! रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर याच विभागात असलेल्या 'ओझोन रिहॅबिलिटेशन सेंटर' (Ozone Rehabilitation Centre) येथेच करण्यात यावे, यासाठी माननीय खासदार श्री. @milinddeora जी यांनी महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्र देत प्रशासनाकडे आक्रमक भूमिका मांडली आहे.
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. पुनर्विकास नक्की करा, पण नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही! जोपर्यंत रुग्णालयाचे याच परिसरात तात्पुरते पुनर्वसन होऊन सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हा लढा आणि पाठपुरावा असाच सुरू राहील.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करण्यात यावे, या मागणीच्या अनुषंगाने आज
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नामांतर संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले.
यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांच्या उपस्थितीत संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित होतो. या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी लोकभावनांचा आदर राखत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. तर सरकार देखील सकारात्मक राहून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, निलेश लंके, बजरंग सोनवणे, धैर्यशील पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत मुंबईच्या दिशेने शिवसेना–महायुती सरकारचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
#Shivsena #EknathShinde #development #maharashtra
माझगाव, ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ क्र. ४ मधील आमचे जिवलग स्नेही श्री. व सौ. लतिका लहू शेटगे यांची सुकन्या सौ. प्राजक्ता आणि श्री. तुषार दांडेकर यांच्या कन्यारत्न कु. कलाश्री हिच्या शुभ नामकरण सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय भवानी, जय शिवाजी! 🚩
आमच्या लाडक्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन काल मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला! हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.
आमचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दमदार आणि प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. साहेबांच्या शब्दाशब्दातून शिवसेनेचा विचार आणि तळागाळातील सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
यावेळी साहेबांनी कार्यकर्त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र दिला आहे;
"आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त शिवसेनाच वसवायची आहे!"
हा केवळ एक विचार नसून, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक नवी जबाबदारी आणि संकल्प आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आता पूर्ण ताकदीने कामाला लागूया.
वातावरणात असलेला हा उत्साह, हा जल्लोष आणि हा दृढ निश्चय पाहून खात्री वाटते की, शिवसेनेची घोडदौड अशीच अविरत आणि अधिक वेगाने सुरू राहील.
जय महाराष्ट्र! 🚩
#शिवसेना #वर्धापनदिन #बाळासाहेबठाकरे #एकनाथशिंदे #महाराष्ट्र #शिवसैनिक #जयमहाराष्ट्र #Shivsena
@mieknathshinde@DrSEShinde@milinddeora@iYashwantJadhav@YaminiYJadhav@Shivsenaofc
नरसापूरचा नरकासूर…
कालपासून मन अक्षरशः सुन्न झालंय… ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या त्या अमानुष अत्याचाराची बातमी ऐकून शब्दच हरवले. त्या लेकराच्या वेदना, तिची भीती, तिचा आक्रोश… हे सगळं डोळ्यांसमोरून जातच नाही. एखाद्या फुलासारख्या निष्पाप जीवावर इतका क्रूर अत्याचार करणारा माणूस नाहीच, ती एक राक्षसी प्रवृत्तीच आहे.
याआधीही अशा अनेक गुन्ह्यांत नाव असलेला हा नराधम… समाजाच्या भीतीने, बदनामीच्या धास्तीने दडपले गेलेले गुन्हे… आणि आपण सगळे कुठेतरी शांत राहिलो… कदाचित म्हणूनच आज एका निष्पाप जीवाचा बळी गेला. ही फक्त एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची हार आहे.
आता वेळ आली आहे, फक्त गुन्हेगारांना नाही, तर अशा विकृत प्रवृत्तींनाच संपवण्याची. प्रत्येकाने हे आपलं कर्तव्य समजून पुढे यायला हवं. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, आवाज उठवणं, आणि अशा राक्षसी कृत्यांना मुळापासून थांबवणं हिच त्या चिमुरडीसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
पुढे जाऊन कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे अशा कृत्याचा विचार करण्याचीसुद्धा… इतकी कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे. आणि एक निडर, सक्षम आणि जागरूक समाजव्यवस्था आपण उभी करायला हवी.
त्या लेकराने कोणत्या यातना सहन केल्या असतील, हे विचार करूनच हृदय पिळवटून जातं… देवाने तिला आपल्या कुशीत स्थान द्यावं आणि तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही मनापासून प्रार्थना… 🙏
#JusticeForHer #StopCrimesAgainstChildren
बारामतीच्या जनतेने दाखवलेला प्रचंड विश्वास, विकासावरची ठाम भूमिका आणि दिवंगत अजितदादांच्या कार्याचा मजबूत वारसा या सर्वांची साक्ष देणारा हा ऐतिहासिक विजय!
मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
जनतेचा विश्वास, कामाचा ध्यास आणि नेतृत्वाची ताकद, यांच्या बळावर आपण पुढील काळातही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावाल, याची खात्री आहे.
#अभिनंदन @SunetraA_Pawar