A great start to the day with colleagues cutting across party lines! While everyone else tucked into breakfast, I stuck to my intermittent fast. More MPs joining us later today,
माझगांव येथील कॉन्टिनेंटल हाईट्सच्या वतीने दीपोत्सव निमीत्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेला उपस्थित राहून रहिवाशांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाखाप्रमुख राजा म्हात्रे, शाखा समन्वयक गौरव कासले, युवासेना पदाधिकारी ओंकार पवार, उपशाखाप्रमुख उमेश वेंगुर्लेकर, अतुल शिंदे आणि साईराज परब आदी उपस्थित होते. 🙏🌸
#दीपावली #दीपोत्सव #Diwali #dipotstav
@Shivsenaofc
On behalf of all Mumbaikars and my party, I reiterate my demand that Captain Smit Machchhar be awarded the Ashoka Chakra. To those who called it a psyop or conspiracy theory: shame on you.
🚩 शिवसेना दसरा मेळावा – विचार महाराष्ट्राचा, निर्धार महाराष्ट्राच्या विकासाचा!
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा वारसा आणि मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे खंबीर नेतृत्व! शिवसेनेचा ६१ वा दसरा मेळावा म्हणजे भगव्या विचारांचा बुलंद हुंकार आणि महाराष्ट्राच्या हितासाठीचा निर्धार!
“भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर!” या गर्जनेतून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश देत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी धान्य व जीवनावश्यक साहित्याचे १०० हून अधिक ट्रक रवाना करून शिवसेनेने कृतीतून समाजसेवेचा भगवा फडकवला!
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने उसळलेला भगवा सागर म्हणजे शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनसेवेच्या बांधिलकीचा बुलंद आविष्कार!
विचार बाळासाहेबांचे…
नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांचे…
आणि ध्यास एकच — समर्थ, समृद्ध आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा!
🚩 शिवसेना म्हणजे संघर्ष, सेवा आणि जनतेच्या विश्वासाची ताकद!
जय महाराष्ट्र! 🚩
@mieknathshinde@DrSEShinde@milinddeora@iYashwantJadhav@meNeeleshNRane@YaminiYJadhav@Shivsenaofc
पनामा सिटीच्या दौऱ्यादरम्यान, मूळच्या मुंबईकर आणि पनामातील भारताच्या नवनियुक्त राजदूत श्रीमती प्रतिभा पारकर यांची भेट झाली. त्यांचे पतीही मराठी असून सध्या पेरूमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
या मराठमोळ्या राजनैतिक दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना मनापासून आनंद झाला.
@mieknathshinde@IndiainPanama@eoilima
काही व्यक्ती काळाच्या प्रवाहासोबत पुढे जातात, तर काही व्यक्तींच्या नेतृत्वामुळे काळालाच नवी दिशा मिळते. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा २५ वर्षांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास हा अशाच परिवर्तनकारी नेतृत्वाचा प्रेरणादायी अध्याय आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या या नेतृत्वाने पुढे देशाच्या राजकारणाला, विकासाच्या संकल्पनेला आणि भारताच्या जागतिक भूमिकेला एक नवा आयाम दिला. २०१४ मध्ये खासदार म्हणून संसदेत प्रवेश केल्यापासून मोदीजींचे नेतृत्व जवळून पाहण्याची आणि त्यांच्या कार्यपद्धतीतून शिकण्याची संधी मला मिळाली. एखाद्या ध्येयावर अढळ विश्वास ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची दृष्टी आणि राष्ट्रहिताला प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी ठेवण्याची वृत्ती, हे त्यांच्या नेतृत्वातून मला सातत्याने जाणवलेले प्रेरणादायी पैलू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विकासाची नवी स्वप्ने पाहिली नाहीत, तर ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा आत्मविश्वासही मिळवला.
आज ‘नवा भारत’ आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे, हीच त्यांच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेची मोठी साक्ष आहे. नरेंद्र मोदीजींच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवापर्वाला मनःपूर्वक सलाम आणि हार्दिक अभिनंदन. आगामी काळातही त्यांच्या दूरदृष्टीला आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला अधिक बळ मिळो, भारताला सामर्थ्यवान, समृद्ध आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून नव्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #NarendraModi #India #PublicLeader
मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी आईही महाराष्ट्राची लेक आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी माझं नातं हे केवळ ओळखीपुरतं नाही, तर जिव्हाळ्याचं आणि अभिमानाचं आहे.
समृद्ध साहित्यपरंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपणाऱ्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा क्षण आहे.
मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मराठीअभिजातभाषादिन #मराठी #मायमराठी #मराठीभाषा #महाराष्ट्र #अभिजातमराठी
मुंबईचा सुपुत्र कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगात दाखवलेल्या अदम्य साहस, धैर्याला आणि विलक्षण प्रसंगावधानाला सलाम.
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानप्रवासादरम्यान घडलेल्या या गंभीर प्रसंगात स्मित स्वतः गंभीर जखमी झाले होते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी न डगमगता दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि समयसूचकता निश्चितच असामान्य आहे. त्यांच्या धाडसी कृतीमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची मदत झाली. संकटाच्या त्या क्षणी सर्व प्रवाशांनीही एकजुटीने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मनापासून सलाम. कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची ही भावना खरोखरच प्रेरणादायी आहे.
कॅप्टन स्मित, आपल्या शौर्याला मनापासून सलाम. आपण लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधान लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला आपला अभिमान आहे.
📍 युनायटेड किंग्डम |
'यूके एशियन बिझनेस कौन्सिल' आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ लॉर्डस'मध्ये आज ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मला गौरवण्यात आले.
यावेळी या ऐतिहासिक सभागृहात 'जय हिंद... जय महाराष्ट्र...' म्हणत मराठी भाषेचा एकच गजर झाला.
ज्या मातीतून मी इथवर आलो त्या महाराष्ट्राच्या विकासाची कहाणी मी मांडलीच, मात्र आई -पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे जेव्हा मी नमूद केले, तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
#मुंबई आणि #लंडन ही दोन्ही जगातील अत्यंत महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात #महाराष्ट्र - #ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी या सोहळ्याला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.
#London #HouseofLords #EknathShinde #Maharashtra
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मराठी मातीचा सुगंध आता थेट ब्रिटनच्या संसदेपर्यंत दुमदुमला आहे! उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सर्वसामान्यांच्या दारात जाऊन शासन उभे करणारी ‘शासन आपल्या दारी’ असो किंवा माता-भगिनींना आर्थिक बळ देणारी ‘लाडकी बहीण योजना’, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाने संवेदनशील आणि गतिमान प्रशासनाची नवी परिभाषा लिहिली आहे. ग्राउंड लेव्हलच्या या कामाची आज जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे, जी आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
‘नमस्कार… जय महाराष्ट्र’ या तीन शब्दांनी ब्रिटनच्या ऐतिहासिक सभागृहाला दिलेली साहेबांची साद म्हणजे मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जगभर झालेला जयघोष होता. हा पुरस्कार केवळ एका नेत्याचा नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी जनता, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाची पावती आहे.
महाराष्ट्राचा मान जगात उंचावल्याबद्दल साहेबांना मनःपूर्वक सलाम आणि हार्दिक अभिनंदन!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #london #PublicLeader #HouseofLords #Congratulations
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
📍 #मुंबई |
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. आज या हॉस्पिटलमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉ.गौतम भन्साळी यांच्याकडून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली.
अण्णांच्या विचारांची आणि मार्गदर्शनाची समाजाला नितांत गरज असून, त्यांनी लवकरच पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा समाजकार्यात सहभागी व्हावे असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ.गौतम भन्साळी आणि राळेगणसिद्धी मधील अण्णांचे अनुयायी उपस्थित होते.
#AnnaHajare #Mumbai #EknathShinde #Maharashtra
@ChivateMangesh