आपल्या देशात कायद्यांची अंमलबजावणी हि फक्त शेतकरी विरोधी असतील तेव्हाच कठोरपणे केली जाते पण तेच कायदे जर शेतकरी हिताचे असतील तर सोयिस्करपणे दुर्लक्षित केले जातात
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढावते म्हणजे दुष्काळ, १/
आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा..
राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…!
राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏
#RajarshiShahuMaharaj #Maharashtra
आणि वडापाव खालचा कागद पांढरा झाला.....
ऑफिस तेच खुर्ची तीच टेबल तेच आणि हो नियम अधिनियम राज्यघटना तीच मात्र याच ठिकाणी माणूस इमानदार आल्यावर काय फरक पडतोय हे हॉटेल मधलं पनीर गायब झाल्यावर तुम्हाला कळलंच असेल,... एकूणच काय सिस्टमला दोष देण्यापेक्षा इमानदार माणसं तयार होणे काळाची
#प्रशासकीय_सेवा
प्रशासकीय अधिकारी ज्यांची कामगिरी सदैव लक्षात राहील
मा. गो. रा. खैरनार - अवैध बांधकाम विरोधी कामगिरी
मा.टी.एन.शेषन - आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी
मा. तुकाराम मुंढे - मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार...
तुकाराम मुंडे साहेबांची जर बदली झाली तर मी भाजपचं समर्थन करणं सोडुन देणारं.😎
भ्रष्टाचार सगळीकडचं बोकाळलाय,
आता कोण किती धुतल्या तांदळाचं आहे हे जगालाही कळू द्या.
नुसते व्यावसायिकच भेसळखोर आहेत की मंत्रीही हफ्तेखोर आहे हेही कळू द्या.
धक्कादायक आहे.
गूळ असो की दूध. रोज लागणाऱ्या गोष्टी. लहान लेकरांपासून सगळ्यांना लागणाऱ्या.
मग, एखादा कार्यक्षम अधिकारी येण्याअगोदर काय चालू होतं?
यंत्रणा काय करत होत्या?
ह्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष होतं की नाही?
#महाराष्ट्र#प्रशासन#भेसळ
१२ वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम: देशाला कायम 'रांगेत' ठेवणे!
🔹बँक खाते ते KYC च्या रांगा
🔹नोटबंदीत स्वतःचेच पैसे काढण्याच्या रांगा
🔹खते, पेट्रोल अन् ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा
🔹लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा
🔹कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन ते लॉकडाऊनमध्ये घरी जाण्याच्या रांगा
ज्या देशात थोर विभूतींनी स्वाभिमान शिकवला, तिथे आज एका माणसाभोवती अंधभक्तीने रांगण्याची नवी स्पर्धा सुरू आहे. काहींना तर वाटतंय स्वातंत्र्य १२ वर्षांपूर्वीच मिळालंय!
रांगेत उभे राहा, विकास येतोय! 📉
@BJP4India@BJP4Maharashtra
#12YearsOfLines #Sarcasm #RealityCheck #Masterstroke
तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी कितीही प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहणे आपल्याला सहज शक्य नाही. 😷
कारण आपल्या लोकांच्या रक्तातच "खाबूगिरी" भिनली आहे!
२० लाखांची गाडी घेऊन ५० रुपयांचा टोल वाचवण्यासाठी धडपडणारे, ओळख दाखवणारे, आरडा ओरड करणारे आपण.
रस्ते खराब बनवले तरी आपल्या लाडक्या नेत्याने आणि कॉन्ट्रॅक्टर पाहुणा आहे, म्हणून मूग गिळून गप्प बसणारे आपणच.
१ कोटीचा फ्लॅट घेऊन सोसायटीचा ५०० रुपयांचा मेंटेनन्स वाढला तर आंदोलन करणारे आपण.
हॉटेलमध्ये ५००० रुपयांचे बिल देणारे, पण जीएसटी टाळण्यासाठी "कॅशमध्ये चालेल का?" विचारणारे आपण.
देवाला हजारो रुपयांचा हार वाहणारे, पण कर भरताना मात्र जीवावर येणारे आपण.
विकासावर, महागाईवर बढाया मारण्यात आणि आभाळ हेपलण्यात पुढे असणारे आपण, पण मतदानाच्या दिवशी दोन किलोमीटर जाऊन मतदान करायला कंटाळा करणारे ही आपणच.
सिग्नल तोडून वेळ वाचवणारे, फूटपाथ वर बाईक चालवणारे आणि अपघात झाला की प्रशासनाला दोष देणारे आपण.
रांगेत उभे राहण्याऐवजी ओळख वापरून पुढे जाणारे आपण.
स्वच्छतेवर भाषण करणारे, पण गाडीची काच उघडून कचरा रस्त्यावर फेकणारे किंवा पिचकारी टाकणारे आपणच.
स्वतःच्या मुलासाठी सर्वोत्तम शिक्षण हवे असते,
पण शाळेजवळील अतिक्रमण, गुटखा विक्री किंवा भेसळ याविरोधात आवाज उठवत नाही.
रुग्णालयात चांगले उपचार हवे असतात, पण अस्वच्छता, बनावट औषधांवर कारवाई करणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही.
सरकारी नोकरी पाहिजे पण दवाखाने नको म्हणणारे आपणच.
आपल्याला भ्रष्टाचार नको असतो,
पण आपले काम लवकर व्हावे म्हणून "काहीतरी सेटिंग" शोधत असतो. आणि त्या साठी टेबल खालून हरी पत्ती देणारे आणि काम झालं म्हणून गावभर करणारे आपणच.
आपल्याला भेसळ नको असते,
पण "स्वस्तात मस्त" मिळाले की गुणवत्ता विसरतो.
आपल्याला एखादी गोष्ट चुकीची होत आहे माहित असली तरी गप्प बसणारे आपण...
का तर आपलं काय जातंया! म्हणून परत ते आपल्याच वाट्याला येतं.
ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभेतल्या सदस्यांना प्रश्न किंवा जाब विचारण्या ऐवजी, साहेब-साहेब म्हणून गोंडा घोळत मागे पळणारे आपणच!
आपल्याला प्रामाणिक अधिकारी हवा असतो,
पण तो नियम सर्वांसाठी सारखे लागू करू लागला की अस्वस्थ होतो.
ज्याने बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली तो वाईट...
ज्याने अतिक्रमण काढले तो कठोर.
ज्याने भेसळखोरांवर धाडी टाकल्या तो प्रसिद्धीखोर.
आणि ज्याने काहीच केले नाही तो "चांगला अधिकारी"!
हा आपल्या समाजाचा मोठा विरोधाभास आहे.
तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी म्हणजे आरशासारखे असतात. त्यांच्याकडे पाहिले की व्यवस्थेतील दोषांपेक्षा आपले दोष जास्त दिसू लागतात.
म्हणून अनेकांना ते खटकतात.
भेसळ फक्त दूध, तूप, तेल, मसाले किंवा औषधांमध्ये नाही.
भेसळ आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीतही शिरली आहे.
समाज बदलायचा असेल तर फक्त मुंढे साहेबांची नाही, तर स्वतःचीही मानसिकता बदलावी लागेल. आणि प्रत्येक अधिकाऱ्याने पण त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे, व त्या साठी लोकांना पुढाकार घ्यावा लागेल.
मुंढे साहेबांची २७ वी बदली होऊ नये म्हणून आवाज उठवण्यापेक्षा, आपल्या २७ वाईट सवयी बदलल्या तर समाज अधिक वेगाने बदलेल!
कारण देशाला तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहेच. पण त्याहून जास्त गरज आहे तुकाराम मुंढेंना साथ देणाऱ्या नागरिकांची!
जोपर्यंत प्रामाणिक अधिकारी एकटा लढतो आणि स्वार्थी लोक संघटित राहतात, तोपर्यंत बदल कठीण आहे. ज्या दिवशी सज्जन माणसे एकत्र येतील, त्या दिवशी व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही. 🙏
#तुकाराम #मुंढे #अन्न #भेसळ #cp
अगदी बरोबर!
विकास दिव्यकीर्ती सर यांचं हे वाक्य खूपच reality check आहे.
शिक्षण + रोजगार + तर्कशुद्ध विचार हेच खरे "धर्म रक्षण" आहे. बाकी सगळं नाटक.सरांचे शब्द खूप सुचक आहेत.