चैत्राच्या सोनेरी किरणांसोबत, तुमच्या कर्तृत्वाची गुढी यशाच्या नभी अशीच दिमाखात फडकत राहो. हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अखंड ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.
मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. कणखर नेतृत्व, स्पष्ट निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे जी ह्यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या 'दीपोत्सव २०२५' चा शुभारंभ आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते झाले.
दीपोत्सवसाठी करण्यात आलेल्या रोषणाईमुळे हा परिसर अतिशय सुंदर आणि देखणा दिसत आहे.
राज्यभरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी निघालेत.
पण रस्त्यांची दयनीय अवस्था, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी,
तिकिटासाठी बारा-बारा तास ताटकळत रांगेत उभं राहणं,
ही नागरिकांना दिलेली शिक्षाच?
गणराया...
कोकणवासीय तुझ्या भेटीसाठी आतुरतेने गावी निघाले आहेत. त्यांचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होऊ दे!
आणि
दरवर्षी कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणारे हे विघ्न दूर होऊ दे! 🙏
Today, I visited the Koliwada in Dharavi.
In the garb of “redevelopment”, those staying in Dharavi for generations will be pushed out of their habitations and employment, and the land will be handed over to the vested interests that want to gulp down Mumbai.
This is a fight for the rights of the people. They want redevelopment, they want a better life, but not by being pushed out of Dharavi.
Just like my visit to Kumbharwada last month, I assured them full support in this fight and asked for unity across all sects of society, for strength!
आज माझ्या वरळी मतदारसंघात माझ्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.
सुरुवात हिरा कापर पाटील जमात वास्तूच्या उद्घाटनाने केली.
आज मी धारावीतील कोळीवाड्याला भेट दिली.
पुनर्विकासाच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या धारावीत राहणाऱ्या लोकांना धारावीतून बाहेर काढण्याचा आणि त्यांचा रोजगार हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे.
तसेच, धारावीला एका उद्योगपतीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
हा लोकांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. धारावीकरांना पुनर्विकास हवा आहे. त्यांना चांगले जीवन हवे आहे. पण धारावी आणि मुंबई लुटून नाही!
मागच्या महिन्यात मी कुंभारवाड्याला दिलेल्या भेटीप्रमाणेच, आज कोळीवाड्यातही धारावीकरांना ह्या लढ्यात पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे.
कारण एकतेतच शक्ती आहे!
हा लढा मुंबईचा आहे!