Nationalist || स्वयंसेवक || ABVPian || भारत माता की जय || वंदे मातरम् || Qualified MBA (Finance), Pune || Post Graduate Diploma in Banking, Bangalore ||
आज मुंबईतील अंधेरी पूर्वच्या विजयनगर वस्तीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात वक्ते म्हणून सहभागी झालो होतो. परम पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन करून गुरुदक्षिणा अर्पण केली.
अनेक वर्षांनी जुन्या मित्रांसोबत, स्वयंसेवकांसोबत चहा घेताना जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
@RSSorg
माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) आज स्थापना दिवस, विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त भारत भरातील सर्व कार्यकर्त्यांना व पूर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 🚩
#ABVP#ABVP76#ABVPFoundationDay
*संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो । भला हो जिसमें देश का, वह काम सब किये चलो ।।
यही भाव से आप सबको अभाविप स्थापना दिन की बहुत बहुत शुभकामनायें - देवदत्त जोशी
अभाविप
महाराष्ट्र सर करणं महायुतीला का जड जातंय?
(गेल्या 2 महिन्यात मी 12 लोकसभा मतदारसंघ फिरलो आणि बऱ्याच पत्रकार, राजकीय विश्लेषक, नागरिक,स्थानिक, मित्र, नेते, शेतकरी यांच्याशी बोलल्यानंतर माझं निरीक्षण लिहिलंय.)
राज्यातली वरवरची स्थिती महायुतीसाठी प्रतिकूल दिसतेय. उद्धव ठाकरे जेव्हा जनमत धूडकवून राष्ट्रवादी-काँग्रेसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले तेव्हा ते पचवणं कोणालाच सोपं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी जनतेचं मँडेट धुकडकवून भाजपसोबत दगा फटका केला असं थोड फार पर्सेप्शन होतं. त्यामुळे साहजिकच सहानुभुती मिळाली होती ती देवेंद्र फडणविसांना. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी हे केलं हा नरेटिव्ह भाजपकडून बऱ्यापैकी सेट होऊ लागला.
सत्तेसाठी कधी कधी सत्तेच्या दूर पण राहावं लागतं. पण फडणवीस हेच सहन करू शकले नाही आणि यात पहिली चूक त्यांनी केली अजित दादांसोबत शपथ घेण्याची. त्यानंतर लगेच हे सरकार कोसळण्याची नामुष्की ही त्यांच्यावर ओढवली. आणि सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते हा नरेटिव्ह तयार करण्यात पवार यशस्वी झाले आणि उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतच्या 'अनैसर्गिक' आघाडी करण्याचाही मुद्दा मागे पडला.
त्यानंतर फडणवीसांनी जोरदार कमबॅक केलं. सरकारवर टीका करून प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आणि महाविकास आघाडीत सगळं आलबेल नाही.. यांचं आपापसात पटत नाही अशी जनमताची भावना तयार केली. ज्यात काही अंशी तथ्य ही होतं.
त्यानंतर एकनाथ शिंदेंच बंड झालं. यात सुरुवातीपासून भाजपने हात झटकले. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही म्हणणारे भाजप नेते आता उद्धव ठाकरेंना कसा धडा शिकवला अश्या वल्गना करतायत. त्यात चौकश्या मागे असलेले, भाजप नेत्यांनी सतत आरोप केलेले सगळे नेते शिंदेंसोबत आले आणि भाजपनेही त्यांना पवित्र करून घेतलं. त्यामुळे ही भाजपचीच साम दाम दंड भेद खेळी असल्याचं सिद्ध झालं.
शिंदे यांना वैचारिक ally म्हणणं सोपं होतं. काहींना ते पटलही पण संजय राठोड, भावना गवळी, सरनाईक, यामिनी जाधव यासारख्याना सोबत घेणं हा अनेकांसाठी एक moral शॉक होता.
त्यानंतर ज्यांच्यावर आरोप केले अश्यांना पक्षात सोबत घेणं, अजितदादांना शरद पवारांविरोधात बंड करायला लावणं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अश्या चव्हाणांसारख्या नेत्यांना गालिचे टाकून खासदार करणं हार्डकोर भाजपवाल्यांसाठी धक्कादायक होतं.
सत्तेसाठी तडजोडी कराव्या लागतात हे खरं आहे पण सत्ता असतानाही ही तडजोड कश्यासाठी याबाबत अजूनही संभ्रम आहे.
मोदी, फडणवीस आणि इतर भाजप नेते जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आक्रमकपणे बोलायचे तेव्हा त्याला निष्कलंकतेच एक अधिष्ठान होतं. म्हणून जनता त्यावर विश्वास ठेवायची . भाजपने केलेले आरोप खरे असणार अशी धारणा (2011-2017) त्यातूनच तयार झाली. पण नंतर ज्यांच्यावर आरोप केले अश्यानाच सोबत घेतल्यामुळे मग पूर्वीच्या भाजपने केलेल्या आरोपांच काय?
ते खोटे होते की खरे?
खोटे असतील तर आरोप का केलेत?
खरे असतील तर मग याना सोबत का घेतलंय?
अश्या द्विधा मनस्थितीत राज्यातली जनता सापडली. कुठल्याही गोष्टीत हिंदुत्व जबरदस्ती आणणं, मूळ प्रश्नांना बगल देत प्रत्येक वेळी राष्ट्रवाद मध्ये आणन्याबद्दल नाराजी आहे.
ज्यांच्यावर चौकश्या आणि घोटाळ्याचे आरोप आहेत अश्याना सोबत घेऊन अभय देणं आणि त्यात देशातल्या 2 मुख्यमंत्र्यांना यंत्रणांना हाताशी धरून थेट जेल मध्ये टाकलं जातं. हे लोकांनी लक्षात ठेवलं. त्यामुळे ज्यांना केजरीवलांविषयी सहानुभूती नव्हती त्यांनाही सरकारबद्दल रोष तयार झाला. या बद्दल भाजप नेत्यांना योग्य प्रतिवाद करताच आला नाही. ज्यामुळे सोमय्यांसारखी अनेकांची वारंवार गोची होते.
भाजपचा मतदार आणि भाजपविषयी सहानुभूती बाळगून असलेला मतदार यामुळे दूर होत गेला. जर 2019 नंतरची फोडाफोडी नसती झाली तर आज भाजप well positioned असती. कुठल्याही टेकू शिवाय भाजपची बाजू भक्कम राहिली असती. पण स्वतःच्या प्रतिमेला स्वतःच छेद दिल्यामुळे कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित होतायत ज्याची उत्तर कोणाकडेच नाहीत.
त्यात जरांगेंचं आंदोलन, obc पोलराईज न होणं, 400पार -संविधान बदलाच नरेटिव्ह खालपर्यंत झिरपनं,पूर्वी अजेंडा मोदी शाह सेट करायचे पण आता विरोधकांच्या अजेंड्या मागे मोदी शाह यांचं फरफटत जाणं, , राम मंदिर Encash न होणं, शेतकऱ्यांचे प्रश्न, मध्येच पवार ठाकरेंना साद घालणं, इलेक्टोरल बॉण्ड हे सगळे मुद्दे आहेच.पक्ष फोडणाऱ्या अजस्त्र व्यवस्थेसमोर उद्धव -पवार उभे आहे या धारनेमुळे सहानुभूती तयार झालीये. ज्याची जाणीव मोदींना पण आहे. त्यामुळे लढाई निकराची आहे. म्हणूनच मोडी स्वतः मैदानात आहेत.
- सौरभ कोरटकर
@saurabhkoratkar
10 वर्षों तक एक सांसद के रूप में मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्र की सेवा का मौक़ा देने के लिए @BJP4India और प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का धन्यवाद।
मुझे एक सांसद ही नहीं बल्कि एक बेटी की तरह भी स्नेह देने के लिए मैं क्षेत्र की परिवार समान जनता की सदैव ऋणी रहूँगी, और यही आशा करूंगी कि यह रिश्ता हमेशा बना रहेगा।
मेरे आदर्श, मेरे पिता स्वर्गीय प्रमोद महाजन जी ने मुझे ‘राष्ट्र प्रथम, फिर हम’ का जो मार्ग दिखाया, मैं ईश्वर से यही प्रार्थना करती हूं कि आजीवन उसी मार्ग पर चल सकूं।
मेरे जीवन का प्रत्येक क्षण सदैव इस देश की सेवा को समर्पित रहेगा।
जय हिंद, जय महाराष्ट्र!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त @MyHomeIndia ने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करुन बाबासाहेबांना पुष्पांजली दिली.
या वेळी @BJP4Delhi चे प्रवक्ते व @Delhicsd चे अध्यक्ष @rajfalwariabjp जी, @NCWIndia च्या सदस्या सौ. @DKhongdupr जी, संस्थेचे दिल्ली NCR शाखेचे अध्यक्ष @BaldevRajSachd5 जी उपस्थित होते.
#AmbedkarJayanti
पुण्यात @MyHomeIndia ने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्पांजली वाहून नमन केले.
याप्रसंगी पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, @RSSorg पुणे महानगराचे मा. संघचालक रवींद्र वंजारवाडकर,ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र ननावरे आणि पूजा सोनावणे उपस्थित होत्या.
उपस्थितांना संबोधित करत असताना महात्मा फुलेंनी १९व्या शतकामध्ये कश्याप्रकारे प्रचंड विरोध सहन करुन, जुनाट चालीरितींना मोडीत काढून समाज प्रबोधनाचे काम केले हे समजावून सांगितले.