सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे ���िर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. दुरुस्ती व देखभाल कामांचे नियोजन करताना पर्यटक आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देऊन नागरिक व महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
बैठकीस आमदार दीपकजी केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेशजी राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृ��्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @meNeeleshNRane
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशन व पाणीटंचाईच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वि��िरींची कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, उपलब्ध निधीचा योग्य वापर करावा तसेच कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
पाऊस लांबणार असल्याने ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे तसेच ज्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा किंवा बोअरवेलची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.
शासनाच्या सूचनांनुसार प्रभावी नियोजन करून जल जीवन मिशनची उद्दिष्टे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.
बैठकीस आमदार दीपकजी केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेशजी राणे, सिं��ुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @meNeeleshNRane @dvkesarkar
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार श्री. अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल ��ेला. याप्रसंगी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे अत्यंत योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून केलेले काम उल्लेखनीय राहिले आहे. भविष्यातही ते अधिक प्रभावीपणे काम करतील. ही निवडणूक महायुती म्हणून एकदिलाने लढवणार आहे. आजचे महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता भासू नये, अशी परिस्थिती आहे. २२ जून रोज��� होणाऱ्या निकालात भाजपचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी खासदार सुनीलजी तटकरे, मंत्री उदयजी सामंत, मंत्री आदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्���क्ष प्रशांत यादव यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @SunilTatkare @ATatkare @samant_uday @iAditiTatkare
The inauguration of the beautification and modernization works carried out at the Versova Passenger Terminal, Mandavi Galli, Vesave Village, Versova, by the Maharashtra Maritime Board was conducted at the hands of former Chief Minister of Maharashtra and current Member of Parliament Narayan Rane.
Due to poor sanitation and inadequate facilities in and around the Versova Passenger Terminal and jetty area, passengers, tourists, members of the fishing community, and local residents were facing various difficulties. After these issues were brought to attention, a site inspection was conducted and the concerned officials were instructed to immediately undertake beautification and modernization works. Accordingly, the project was completed within just 45 days, and the newly developed terminal was inaugurated today.
The Mahayuti Government is committed to the comprehensive development of the state's water transport sector. Under the visionary leadership of Hon'ble Chief Minister Devendra Fadnavis, the Maharashtra Maritime Board is implementing various initiatives, including the development of modern passenger terminals, safe and well-equipped jetties, digital facilities, the expansion of the Mumbai Water Metro, and water transport services based on green technologies. Through these efforts, the government aims to provide passengers with safer, more convenient, and modern transportation services.
The event was attended by actress Archana Puran Singh, Maharashtra Maritime Board Chief Executive Officer Mr. P. Pradeep, non-official member Mr. Balasaheb Desai, other dignitaries, and a large number of local residents.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MeNarayanRane@mahamaritime1
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने वर्सोवा प्रवासी टर्मिनल, मांडवी गल्ली, विसावे गाव, वर्सोवा येथे करण्यात आलेल्या सुशोभीकरण व आधुनिकीकरण कामांचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. ��ारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
वर्सोवा प्रवासी टर्मिनल आणि जेट्टी परिसरातील अस्वच्छता व गैरसोयींमुळे प्रवासी, पर्यटक, मच्छीमार बांधव आणि स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुशोभीकरण व आधुनिकीकरणाची कामे ��ाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या ४५ दिवसांत कामे पूर्ण करून आज या नव्याने विकसित करण्यात आलेल्या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले.
महायुती सरकार राज्यातील जलवाहतूक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, सुरक्षित व सुसज्ज जेट्ट्या, डिजिटल सुविधा, मुंबई वॉटर मेट्रो तसेच हरित तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक सेवांचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमास अभिनेत्री अर्चना पूरणसिंग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. प्रदीप, अशासकीय सदस्य श्री. बाळासाहेब देसाई तसेच इतर मान्यवर आ��ि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeNarayanRane @mahamaritime1
गूँजे अंबर, धरा सजे, अब जल में भी जयगान है,
हर दम शान से लहराता, भारत ये महान है।
अंदमानच्या समुद्रात राधानगर बीचजवळ जगातील सर्वात मोठा अंडरवाॅटर (पा���्याखालील) तिरंगा फडकला. भारताने आणखी एक 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' रचला.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत मोठी स्वप्नं बघतो आणि ती चिकाटीने पूर्ण करतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या विश्वविक्रमाबद्दल भारतीय नौदलातील वीर जवान आणि सहभागी स्कुबा डायव्हर्सचे मनःपूर्वक अभिनंदन !
#AndamanNicobar #GuinnessWorldRecord #NationalPride
पुणे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
पुणे मामले को फास्ट ट्रैक न्यायालय में ले जाने की प्रक्रिया शुरू है और अपराधी को कठोर सजा मिले, इसके लिए राज्य सरकार प्रयासरत है।
(नागपूर | 3-5-2026)
#Maharashtra #Nagpur #Pune
📍२ मे २०२६ | कणकवली
कणकवली येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी केलेले पत्रकार बांधव, यशस्वी उद्योजक, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते तसेच अवयव दान केलेल्या कुटुंबियांचा विशेष सत्कार केला.
कणकवली तालुक्यातील पत्रकारसंघाचे कार्य उल्लेखनीय आहे. पत्रकारिता करतांना पत्रकार ���ांधवांचा नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिंधुदुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर 3 महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओरोस येथे दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरे माफक दरात उपलब्ध केली जातील, अशी घोषणा यावेळी केली.
यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सभापती हर्षदा वाळके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषद प्र��िनीधी गणेश जेठे, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तालुकाध्यक्ष भगवान लोके, जिल्हा उप��ध्यक्ष संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे, सचिव संजय सावंत यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
#कणकवली_पत्रकार_संघ #सत्कार_सोहळा #कणकवली
📍२८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई
श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यवसायिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्या, डिझेल परतावा तसेच जेट्टी संदर्भातील विविध कामांबाबत दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत मत्स्यव्यवसायिकांच्या विविध अडचणींचा आढावा घेतला व या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
या बैठकीस खासदार श्री. सुनील तटकरे जी यांसह मच्छिमार प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunilTatkare
पुण्यातील भैरवनगर येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भगवामय वातावरणात पार पडले. या संमेलनास उपस्थित राहून उपस्थित हिंदू बांधवांना संबोधित केले. यावेळी टिपलेले काही क्षण!
#पक्षप्रवेश
उबाठा युवा सेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख देवगड तालुक्यातील निनाद देशपांडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यां���े भाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते.
देवगड येथील उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख, बूथप्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये शाखाप्रमुख राजेंद्र शिरोडकर, बूथप्रमुख घननीळ कणेरकर, शाखाप्रमुख प्रदीप पडेलकर, बूथप्रमुख भालचंद्र पारकर, शाखाप्रमुख गणपत जाधव, बूथप्रमुख प्रवीण जाधव, शाखाप्रमुख ओंकार लाड, बूथप्रमुख गणपत लाड, बूथप्रमुख सुरज भिडे, शाखाप्रमुख दिनेश परब, बूथप्रमुख जनार्दन कोयंडे, तसेच बबन केवळ यांसह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेशकर्त्यांमध्ये समावेश आहे.
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
आमदार श्री. सतेज (बंटी) डी. पाटील यांचे सुपुत्र चि. तेजस आणि चि.सौ.कां. स्नेहा यांचा शुभविवाह स���हळा निमित्त आज आयोजित स्वागत समारंभास खासदार श्री. नारायणराव राणे व आई सौ. निलम राणे, आमदार श्री. निलेशजी राणे यांच्यासह उपस्थित राहून नवंदाम्पत्याचे अभिनंदन केले व त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या !
राम नवमीच्या निमित्त ओशिवरे, अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदू बांधवांना संबोधित केले. यावेळचे काही भक्तिमय क्षण!
#राम_नवमी#श्रीराम#अंधेरी
📍गडहिंग्लज | विराट हिंदू संमेलन
सकल हिंदू समाज, गडहिंग्लज यांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलनात उपस्थित राहून हिंदू बांधवांना संबोधित करण्याची संधी लाभली. या संमेलनात दिसलेली हिंदू एकतेची ऊर्जा आणि धर्माभिमान खरोखर प्रेरणादायी होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शं��र वर्षांची व्यक्ती निर्माण आणि राष्ट्रनिर्माणाची अखंड यात्रा आजही समाजाला दिशा देणारी आहे. संघाने दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रप्रेम यामुळे हिंदू समाज अधिक सक्षम व संघटित होत आहे.
राज��याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे ठाम हिंदुत्ववादी नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागू झालेला धर्मांतर विरोधी कायदा आपल्या माता-भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी एक मजबूत कवच ठरत आहे.
चला, हिंदू एकतेच्या या शक्तीला अधिक बळकट करूया आणि आपल्या धर्म, संस्कृती व राष्ट्रासाठी संघटित होऊया. 🚩
#विराट_हिंदू #हिंदू_एकता #हिंदुत्व #गडहिंग्लज #कोल्हापूर
📍२४-०३-२०२६ | मंत्रालय, मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज समूहाच्या माध्यमातून पहिले ५ स्टार हॉटेल उभारण्याच्या प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मा.पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि इंडियन हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे प्रतिनिधी ��� ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीसंदर्भात यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन तो पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच अंतिम मसुदा लवकरात लवकर तयार करून या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.
या बैठकीस सिं��ुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), दि इंडियन हॉटेल लिमिटेडचे प्रतिनिधी श्री.बिजल देसाई, श्रीमती सिंथिया नोरोन्हा, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
@CMOMaharashtra