Here is an update - All three satellite-tagged Amur Falcons Apapang (male), Alang (young female) and Ahu (female) are now undertaking their daring Arabian Sea crossing. Apapang has already flown nonstop for 76 hours, covering 3100 km at an average of 1000 km per day, aided by strong easterly tailwinds. From here, the journey becomes even more extraordinary as they head towards Somalia on their epic 3000 km oceanic flight @sureshwii@wii_india #Amurfalcons
Third pass through Melissa. GoPro in side window as different camera looking forward shooting in ultra high res 8k. Not sure when that might get processed as the file turned out ridiculous. Barely had HD space for it and MacBook Pro promptly chocked when I tried to edit it
This is the most iconic Test series in history — one for the ages! The craze for Test cricket has never been this wild. 🔥🏏
Great cinematic visuals by Sony.
#TestCricket#CricketHistory#INDvsEND
ताकदवान होण्यासाठी सोपे तंत्र -
आपल्या मेंदूला कल्पना व वास्तव यातला फरक समजत नाही. त्याच्यासाठी या दोन्हीही फक्त अंमलबजावणीसाठीच्या सूचना असतात. आपण जी वाक्य स्वतःशी बोलतो त्याची मेंदु थंडपणे आपल्या शरीराकडून अंमलबजावणी करून घेतो. आपले व्यक्तिमत्व तसे बनत जाते. याची अनुभूती आपण दररोज घेत असतो पण आपल्या हे लक्षात येत नाही.
वाईट स्वप्न. आपण वाईट स्वप्न पाहतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, भीतीच्या भावना निर्माण होतात. वास्तविकता ते झोपेत पडलेले स्वप्न असते पण मेंदूला ते खरे वाटते, त्याला मेंदु इनपुट्स म्हणुन घेतो म्हणुन मेंदूद्वारे त्याप्रमाणे बदल शरीरात घडवून आणले जातात.
हॉरर चित्रपट पाहतेवेळी सुद्धा आपल्या शरीरात आपोआप तसेच बदल घडतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडी वेगवान होते, घाम येतो, अंगावर केस उभे राहतात, शहारे येतात इत्यादी. त्याचे सुद्धा कारण मेंदूला हे वास्तव नाही याची जाणीव होत नाही. त्याच्या दृष्टीने ते फक्त इनपुट्स असतात.
मैथुन क्रियेमध्ये सुद्धा कल्पना व वास्तव याची गल्लत मेंदू करतो व त्याचा हार्मोन्स रिलिटेड परिणाम साधला, जातो स्खलन होते.
पण ही बाब आपण आपल्या फायद्यासाठी वापरून घेऊ शकतो. आपण सातत्याने सकारात्मक स्वयं सूचना मेंदूला देत राहिल्यास मेंदू त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करून सकारात्मक परिणाम साध्य करायला मदत करतो. यामध्ये आपल्याला जसे व्हायचे आहे तसे आपण ऑलरेडी आहोत अशा प्रकारच्या सूचना, विचार सातत्याने करत राहिल्यास आपोआप तसे बनून जातो. नव्हे मेंदु आपल्याला आपोआप तसे बनवून टाकतो. पण आपल्याला वाटते की असे विचार मी कसे निर्माण करू ? मला शक्य नाही वगैरे. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की अशा सूचना अथवा विचार म्हणजे फक्त वाक्य असतात. अशी वाक्य तयार करून त्याची उजळणी करत राहायची आहे. यात अवघड काहीही नाही. आपल्या स्वतःबद्दल काय धारणा अस्तित्वात आहेत हे साफ डोक्यातून काढून टाकायचे. कारण त्या धारणा काही आपल्याला जन्मजात प्राप्त झालेल्या नाहीत. आपण त्या स्वतः आयुष्य जगताना अनेक बाबींचा अर्थ लावून निर्माण केल्या आहेत. म्हणुन पाटी कोरी करावी व खालील कृती कराव्यात.
आपल्याला शिस्तबद्ध व्हायचे असेल तर मी प्रचंड शिस्तबद्ध असून अधिकाधिक शिस्तबद्ध शिस्तप्रिय होत चाललो आहे.
मी अत्यंत अभ्यासु असून अधिकाधिक अभ्यासु होत चाललो आहे.
मी अत्यंत धैर्यवान असून अधिकाधिक धीट होत चाललो आहे.
मी अत्यंत हुशार असुन अधिकाधिक हुशार होत चाललो आहे.
मी अत्यंत निर्भीड असुन अधिकाधिक निर्भीड होत चाललो आहे.
याप्रकारे आपल्याला जसे व्हायचे आहे तसे आपण ऑलरेडी आहोतच व त्या गुणात, वृत्तीत क्षणोक्षणी वाढ होते आहे अशा अर्थाची वाक्ये तयार करून त्याची सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी करत राहावी.
हेच तंत्र आपण आपल्या घरातील विशेषत्वाने लहान मुले, विद्यार्थी यांचेशी बोलताना वापरावे. कारण आपण त्यांच्याबद्दल उच्चारत असलेली वाक्ये ही नकळत त्यांच्या स्वतःबद्दलच्या धारणांचा भाग बनुन जातात.
उदा आपल्या घरातील मुल, विद्यार्थी, व्यक्ती हे अपेक्षित यश मिळवत नाही असे आपल्याला वाटत असेल तर तुला काही जमतच नाही, तु निर्बुद्ध आहेस, बैल आहेस, तुला अक्कल नाही, निव्वळ ओझं आहेस वगैरे सहसा बोलले जाते. त्याऐवजी तुझ्यात प्रयत्न करण्याची प्रचंड क्षमता आहे, तु कायम परत जोमाने कामास लागतोस, तु अजिबात दडपणात, भीतीत येत नाही, तुझ्या या गुणामुळे तुला आता अधिकाधिक यश मिळेल अशा अर्थाचे सकारात्मक इनपुट्सवाले वाक्य त्यांना बोलत रहावे. बघा त्यांच्या प्रतिसादात व वागण्यात कसा गुणात्मक बदल आपोआप होत जातो.
सर्व काही भाषेत असते. आपण स्वतःशी जो संवाद साधतो त्यावर सर्व अवलंबून असते. हेलन केलर या आयुष्याची काही वर्ष अंध, मूक, कर्णबधिर होत्या. त्यांना दिसत नसल्याने, बोलता, ऐकू येत नसल्याने ( कारण त्यावेळी या तीन संवेदनशिवाय कोणतीही भाषा शिकणे अशक्य होते. ) त्यांना कोणत्याही भाषा येत नव्हत्या, शून्य संवाद अवस्थेत त्या होत्या. त्यांना भाषा शिकविण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने मिळुन ब्रेल लिपी शोधली तेव्हा कुठे त्यांना भाषा, शब्द, वाक्य अवगत झालीत. हेलन केलर यांनी त्यांच्या भाषाविहीन कालखंडाचा अनुभव एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. जेव्हा त्यांना कोणत्याही भाषा अवगत नव्हत्या तेव्हा त्यांना राग, लोभ, भीती, आनंद, दुःख व इतर कोणत्याही भावना नव्हत्या, त्या निर्माणच होत नव्हत्या. त्या त्यांच्यात निर्माण होऊ लागल्या जेव्हा त्यांना भाषा, शब्द अवगत झाले.
आयुष्यातील अभ्यास, करिअर, आरोग्य, संपत्ती व्यवस्थापन, लोकांमधील वावर, व्यवसाय अशा अनेक व प्रत्येक क्षेत्रात हे तंत्र वापरून तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला सकारात्मक व ताकदवान बदल घडविता येतील.
डॉ प्रशांत भामरे.