लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली..
हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान
कार्यकर्ता म्हणजे केवळ पक्षाचा झेंडा वाहणारा माणूस नसतो, तर तो एखाद्या नेत्याचा श्वास असतो. आणि त्या कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात धावून जाणारा नेता म्हणजे अमित ठाकरे.
सोलापूर येथे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या क्षुल्लक वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्यावर निर्घृण, प्राणघातक हल्ला करण्यात आला. या अमानुष हल्ल्यात एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा दुर्दैवी अंत झाला.
सत्तेची हाव आणि सत्तेची चटक लागलेल्या सत्ताधारी पक्षातील लोकांनी केलेली ही केवळ मारहाण नव्हे, तर ती एक थंड डोक्याने आखलेली राजकीय हत्या होती. एका कुटुंबाचा आधार हिरावून घेण्यात आला, दोन कोवळ्या मुलींच्या डोळ्यांत कायमचं दुःख ठेवलं गेलं.
ही बातमी समजताच, निवडणुकीचा गोंगाट, सभा, प्रचार सर्व बाजूला सारत मनसे नेते अमित ठाकरे तात्काळ सोलापूरला पोहोचले. दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांसमोर ते केवळ नेता म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून उभे राहिले.
या वेदनेच्या क्षणी अमित ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च स्वतः उचलण्याची जबाबदारी घेतली. “बाळासाहेब गेले असतील, पण त्यांच्या मुलींचं भविष्य अंधारात जाऊ देणार नाही,” हा शब्द त्यांनी कृतीतून दिला.
निवडणूक जिंकण्यासाठी जर एखाद्याचा जीव घ्यावा लागत असेल, तर अशा रक्तरंजित निवडणुकांचा अर्थ काय? लोकशाहीची ही कोणती किंमत आहे? हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात उभा आहे.
#AmitThackeray #MNS #सोलापूर #Solapur #MaharashtraPolitics
जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने… याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे, हे तुम्हीच या फोटोंमध्ये बघा.. गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपाने विविध पदे दिली.… आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं!
@Dev_Fadnavis
तोंड झाकायचं असेल तर ते इथल्या सरकारने आणि शासन व्यवस्थेने झाकाव.. लाज बाळगायची असेल तर शासनकर्त्यांनी आपल्या नाकर्तेपणाची लाज बाळगावी...
ज्या लेकरावर अन्याय झाला त्याच्या आई-वडिलांनी तोंड झाकायची गरज नाही...
#चलोफलटण3नोव्हेंबर