एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव आणि शरद पवार गटाचे उमेदवार श्री.अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली.भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती.मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.या निवडणुकीसाठी 335 सभासदांनी मतदान केलं.पैकी 224 मते घेत अजिंक्य नाईक यांनी घवघवीत यश मिळवले.
MCA अध्यक्ष श्री.अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
अजिंक्य नाईक यांचं मन:पूर्वक अभिनंदन..!
शिका आणि संघटीत व्हा!
गरीबांना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे भ्रष्टाचारी आणि खोट्या सरकारचे मनसुबे हाणून पाडा.
राज्य सरकारच्या अधिसूचनेला हायकोर्टानं रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आरटीईच्या माध्यमातून खासगी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजच्या निर्णयासाठी मुंबई हायकोर्टाचे मन:पूर्वक आभार!
मी निवडून आलेलो आमदार आहे.फक्त राजकीय द्वेषातून माझ्या मतदार संघाला निधी न देण्याचा हिणकस प्रकार हे सरकार करत आहे.माझ्या मतदार संघाला निधी न देता तेथील "आपल्या लोकांना" निधी देण्याचा प्रकार हे सरकार करत आहे
अचानक मुंब्र्याचे पाणी का कमी झाले.
मुंबऱ्यात ह्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) की नेता मर्जिया पठाण के नेतृत्व मे धरणा आंदोलन किया #Mumbra
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था,नाशिक संचलित टी.एस दिघोळे महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा नूतन खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते आज सिन्नर (नाशिक)
येथे पार पडला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त,संचालक उपस्थित होते.