Biggest . Hon'ble Shri.@SharadPawar_NCP Fans Club On Twitter || Latest Information & News & Updates Future PMO,India | Former Union Minister’s || Fan Account ||
आज पुण्यातील 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'ला भेट दिली. आर. के. लक्ष्मण हे भारतातील सुप्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यंगचित्रकार होते. ज्यांची व्यंगचित्र देशातल्या राजकीय आणि सामाजि��� व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करायची. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकदा आम्हा राजकीय क्षेत्रातील लोकांनाही अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. टाइम्स ऑफ इंडियातील 'यू सेड इट' या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रातून त्यांनी उभा केलेला 'कॉमन मॅन' जनमानसाचं प्रतिनिधित्व करायचा. त्यांच्या कलाविष्काराच्या प्रेरणेतून आज देशात अनेक व्यंगचित्रकार उभे राहिले आहेत. अशा प्रतिभावंत व्यंगचित्रकाराच्या कलासामुग्रीचं, व्यंगचित्रांचं यथोचित प्रदर्शन 'आर. के. लक्ष्मण म्युझिअम'मध्ये आहे हे पाहून आनंद वाटला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री, आमदार श्री. अनिल देशमुख, माजी आमदार, कोषाध्यक्ष श्री. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस श्री. रवींद्र पवार व युवक प्रदेशाध्यक्ष श्री. महेबुब शेख हे उपस्थित होते.
• बिल्कीस बानो यांच्या केस संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो निकाल झाला, ज्यात ७ व्यक्तींची हत्या आणि एका भगिनीवर अत्याचार याची सर्व पार्श्वभूमी ही गुजरातची आहे. निकालासाठी उशीर झाला पण, सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य घेतला. स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याचे काम कालच्या निकालातून सिद्ध झाले आहे. गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता आणि सुप्रीम कोर्टाने असे सांगितले की, हा निकाल महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि ही केस महाराष्ट्रात चालू झाली.
• राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर व इतर पक्ष यांची संयुक्त बैठक आज दिल्लीमध्ये होणार आहे या बैठकीत साधारणतः आगामी निवडणुका संदर्भात एकत्रित काम कसे करावे यासंबंधीची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीकडून या चर्चेला श्री. जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत, त्यांना मी सल्ला दिलेला आहे की, पक्षाच्या वतीने तुम्ही भूमिका मांडावी. यानंतरही बैठका होतील तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी असतील.
• महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. प्रत्येक पक्षाची मागणी ही असतेच, पण निकाल हा प्रायोगिकच घ्यावा लागतो.
• प्रकाश आंबेडकर यांना युतीत सामील करून घेण्याची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये पक्षाकडून गेलेले नेते मांडतीलच, परंतु इंडियाच्या मीटिंगमध्ये मी स्वतः असेलच तिथेह��� आम्ही भूमिका मांडू.
• लोकसभेत आज काँग्रेसच्या जागा जास्त आहेत; काँग्रेस जास्त जागांवर जिंकूही शकते.
• दिल्लीतले सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ईडीच्या धाडी या चालतच राहतील. रवींद्र वायकर असो किंवा रोहित पवार असो यांच्यावर धाडी पडल्यात हे होत असतं, कारण की, सत्तेत बसलेल्या लोकांना हे करून घ्यायचेच असते.
• इलेक्शन कमिशन समोर EVM मशीन संदर्भातला प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, त्या प्��स्तावात EVM संदर्भात आमचा काही अनुभव आणि यासंबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचं मत ऐकून घ्यावं आणि त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती, पण इलेक्शन कमिशनने वेळ देणे, चर्चा करणे या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत.
• ज्यांच्याकडे केस आहे आणि ते गृहस्थ त्यांच्याकडे जात असतील, तर यातून संशयाला चिंता वाटावी अशी जागा निर्माण होते, नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले नसते, तर त्यांच्या पदाची प्रतिष्ठा अजून वाढली असती.
• पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही.
• ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे.
• शिंदेंकडे बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे, तसे एका पक्षाला स्पष्ट बहुमत आहे अशी स्थिती नव्हती भाजप आणि नंतर शिंदे साहेबांचा पक्ष एकत्र आल्यानंतर ते बहुमत झालेले आहे आणि त्यामुळे स्वच्छ, निर्मळ बहुमत आहे अशी क्लेम करायची परिस्थिती नाही, परंतु जर नंबर पाहिले तर ते त्यांच्याकडे आहेत त्यामुळे त्यांनी काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
• इलेक्शन जवळ आलेले आहेत. चिन्ह आ��ि नावाची अडचण आहे, त्यामुळे आम्हीही इलेक्शन कमिशनकडून निकालाची प्रतीक्षा करत आहोत.
• वयाचा मुद्दा त्यांनी काढणं हे त्यांना योग्य वाटत असेल, तर त्यांनी तो काढला त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही. आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर मी संसदेत १९६७ साली आलो. कधी विधी मंडळ, तर कधी देशाचे संसद त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सत्तेबद्दल, काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनीही फार टीका केली नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांबद्दल मला सांगता येईल. उदा. मोरारजी देसाई; प्राईम मिनिस्टर होते, संसदेत काम करत होते, त्यांच्या मागे लोकांचे बहुमत होते आणि त्यामुळे अशा गोष्टींवर बोलावे असे मला वाटत नाही.
• पार्लमेंटचा कालावधी माझा एक किंवा दीड वर्षात संपेल. लोकांनी मला निवडून दिलेले आहे, त्यामुळे मला त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणं स्वाभाविक आहे. माझा कालावधी संपल्यानंतर मी Conscious नाही करणार हे मी अनेक वेळा प्रसारमाध्यमांसमोर हे बोललेलो आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आयोजित १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०२४ येथे उपस्थितांना संबोधित केले.
संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, संमेलनाचे निमंत्रक आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, तंजावर येथील ९९ व्या संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, निमंत्रक श्री भाऊसाहेब भोईर, डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष श्री. नरेश गडेकर, नाट्य परिषदेचे विश्वस्त, पदाधिकारी, नाट्य कलाकार, नाट्�� क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्श��, निर्माते, लेखक-नाटककार मंडळी आणि रंगभूमीवर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी, संसदेचे आमचे सहकारी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सभासद आणि बंधू-भगिनींनो आणि मित्रांनो..!
आज सुरू होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचे सूप दोन-एक वर्षांपासून वाजत होते. कोरोनाच्या नकारघंटेमुळे म्हणा अथवा नाट्य परिषदेच्या निवडणुका म्हणा प्रत्यक्ष नाट्यसं��ेलन साजरे होण्यास उशीर होत गेला, परंतू श्री गणरायाच्या कृपेने या संमेलनाचे निर्विघ्न दूर झाले आणि आज हा सोहळा मोरया गोसावींची संजिवन समाधी असलेले आणि चिंतामणी गणपतीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले स्थान चिंचवड येथे होत आहे. हा विलक्षण योग तर आहेच, परंतू चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या चिंतामणीची आपल्यावर विशेष कृपादृष्टी आहे असे मला वाटते.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी फेसबुक अकाउंटवर उपलब्ध आहे.
शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानला भेट देऊन श्री साईबाबांची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. याप्रसंगी देशा���ल्या आणि राज्यातल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आणि इतर प्रश्नांवर लढण्याची ताकद मला सदैव मिळो ही प्रार्थना केली.