Biggest Fans Page For Future PMO India 🇮🇳 Hon’ble Shri.Sharad Pawar Ji Saheb || Account Managed By @PawarForIndia || @SharadPawar_NCP || Fan Account ||
‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’चे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे जी आपला आज वाढदिवस. भारतीय विचारधारा संक्रमणाच्या अवस्थेतून जात असताना एखाद्या ज्येष्ठ राजकीय नेत्याने जी प्रगल्भता दाखवायला हवी, जो समन्वय साधायला हवा त्यात आपण आम्हा सर्वांसमवेत बजावत असलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. भारतीय लोकशाही प्रवाही राहावी म्हणून आपणा सर्वांना असंच योगदान देत राहावं लागेल. आपल्या जन्मदिनी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ह्याच मन:पूर्वक शुभेच्छा !
नेल्सन मंडेला यांनी ब्रिटिश सरकारच्या वर्णभेदी धोरणाचा कडाडून विरोध केला. साम्राज्यवाद व गरिबी विरोधातही त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष केला. जगभरात समानता व एकता प्रस्थापित करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेले, भारतरत्न नेल्सन मंडेला यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
डिसेंबर महिन्यात लागोपाठचे हे दोन दिवस मोठे आनंदाचे असतात. बाबांचा काल वाढदिवस झाला त्यानंतर आज आईचा वाढदिवस आहे.
आई बाबांपेक्षा खंबीर आहे. त्यांच्या संघर्षात ती पाठीशी ठामपणे उभी असते. बाबा आपल्या आयुष्यात राजकारण व समाजकारणातील एक एक पदे चढत राहिले पण आईने आम्हाला नेहमीच जमीनीवर रहायला शिकवले. आम्हाला आई म्हणून तिने काहीही कमी पडू दिले नाही.आईने दिलेले हे साधेपणाचे संस्कार खुप मोलाचे आहेत.
आई, तु आम्हा सर्वांसाठी 'पॉवरहाऊस' आहेस. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.