Carried out the bhoomipujan for the construction of a shed at Gavdevi Rahivasi Mandal in Gazdhar Bandh area, to be carried out through my MLA funds, in Ward No. 99 of Vandre West Assembly constituency.
Ward President Prasad Jadhav, party office bearers, karyakartas and residents were present on the occasion.
........
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९९ मधील गजधर बांध परिसरातील गावदेवी रहिवासी मंडळ येथील शेड दुरुस्ती माझ्या आमदार निधीतून होत असून, आज त्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी वॉर्ड अध्यक्ष प्रसाद जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र.९८ मधील नागरिकांनी त्यांच्या समस्यांच्या संदर्भात आज कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
#AshishShelar
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे ‘डिजिटल लर्निंग’ हे कार्यकर्त्यांच्या ज्ञानवृद्धीचे आणि वैचारिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत मीही माझे प्रशिक्षण पूर्ण केले. सर्व कार्यकर्त्यांनी ‘सरल ॲप’द्वारे या उपक्रमात सहभागी व्हावे!
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra
#BJP #ViksitBharat #DigitalLearning #SaralApp #PanditDeendayalUpadhyay #EmpoweredKaryakarta
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जी यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक विविध प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहिलो.
यावेळी लोकार्पण करण्यात आलेले विविध प्रकल्प :
•महाडीबीटी 2.0 पोर्टल
•सेवा केंद्र मानकीकरण (Standardisation)
•डिजिटल लाइफ सर्टिफिकेट प्रणाली
•महा AI प्रोजेक्ट
.........
Attended a high-level meeting on electronics, information technology and artificial intelligence projects chaired by Hon’ble Chief Minister Devendra Fadnavis Ji, along with Hon’ble Deputy Chief Minister Sunetratai Pawar.
Key initiatives launched today included:
•MahaDBT 2.0 Portal
•Service Centre Standardization
•Digital Life Certificate System
•Maha AI project
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
#Maharashtra #AshishShelar
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९७ मधील खोतवाडी, शास्त्री नगर, नवजीवन सोसायटी, पोलीस लाईन येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. सलग २१ व्या वर्षी हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत.
यावेळी कार्यक्रम प्रमुख नवल शेवाळे, उद्यान आणि मैदान समितीच्या अध्यक्षा, नगरसेविका हेतल गाला, वॉर्ड अध्यक्ष सचिन मंडलिक, अजित गुरव, तृणाल वाघ, सुरेंद्र सिंग, शिला सिंग, दीपाली बोवलेकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#AshishShelar
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ मधील कचरनाथ नगर, गझदर बांध येथील चोपडेकर चाळ, साखरकर चाळ, पाटील चाळ, झिंकु चाळ, शिवशक्ती चाळ, बल्लाळेश्वर चाळ, पवार चाळ, पाष्टे चाळ, सुभद्राबाई चाळ येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. सलग २१ व्या वर्षी हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत.
यावेळी कार्यक्रम प्रमुख नवल शेवाळे, वॉर्ड अध्यक्ष डॉ. दिव्येश वानखेडकर, गजेंद्र घोडके, अजित मन्याल, अनाजी गुरव, तृणाल वाघ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
भावपूर्ण श्रद्धांजली!
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंद कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. संघटन बांधणी, पक्षकार्य आणि समाजसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. तसेच कुलकर्णी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माउंट मेरी परिसरातील कमल ज्वेलर्स या दुकानाचे उद्घाटन केले. यावेळी किशन माली आणि त्यांच्या परिवारास शुभेच्छा दिल्या.
#Maharashtra#AshishShelar
"पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६" अंतर्गत आयोजित नागपूर महानगर नगरसेवक प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सत्रात सहभागी झालो. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
यावेळी रेखाताई महाजन, भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार संजय उपाध्याय, नागपूरच्या उपमहापौर लीलाताई हाथीबेड, नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या 'प्रवेशोत्सव' उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी घाटकोपर पूर्व, पंतनगर परिसरातील मनपा शाळा क्र. ३ येथील विद्यार्थ्यांचे नवीन दप्तर, पुस्तके व लेखन साहित्य देऊन उत्साहात स्वागत केले.
यावेळी आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, नगरसेविका राखी जाधव, मुख्याध्यापिका मीना आढव, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@ParagShahBJP@TawdeRitu
#प्रवेशोत्सव #Maharashtra #AshishShelar
मुंबईकरांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा अनेकदा भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत समोर येत असतात. या समस्यांचे गांभीर्याने आकलन करून त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या निर्देशानुसार 'पालक प्रवास' हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आज ईशान्य मुंबई जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवेदने स्वीकारली. तसेच काही निवेदनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्देश दिले.
यावेळी आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, नगरसेविका राखी जाधव उपस्थित होत्या.
#पालक_प्रवास #Maharashtra #AshishShelar
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित ज्येष्ठ नाटककार कै. गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झालो. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, नियामक मंडळ सदस्य विजय केंकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
Felicitated meritorious SSC and HSC students at the annual prize distribution function in Santacruz. Congratulations to all the students and their parents.
#AshishShelar
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची १२ वर्षे 'तपपूर्ती'निमित्त भाजपा उत्तर मध्य जिल्हा आयोजित विकसित भारत संकल्प संमेलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
यावेळी आमदार पराग अळवणी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष महेश पारकर, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#तपपूर्ती #LongestServingElectedPMModi
#AshishShelar
मुंबई उपनगरातील आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी वांद्रे कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
#AshishShelar
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील खारदांडा येथील शिव मंदिरास भेट देऊन पूजा आरती केली. तसेच या मंदिराच्या कार्यालयास भेट देऊन येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#AshishShelar