🚨 WHAT A SCENE...!!!
- Right after the news of Ben Stokes's retirement appeared on the big screen in the stadium, he took a wicket on the very next ball.💥
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
खूप लोकांचे मला डीएम आले आणि कमेंट आले म्हणून किल्ले वासोटा ट्रेकिंग कसा करायचा याबद्दल थोडक्यात!👇👇👇
हा थ्रेड वाचा.
पुण्यावरून थेट सातारला जायचं. साताऱ्यापासून साधारणता दीड तासावर कास पठार रस्ता धरून बामनोली गाव येथे कॅम्पिंग साठी तुम्ही जाऊ शकता. बामनोली गाव... आणि परिसरात
गोव्याला फिरायचा असेल तर गोंगाट वाला उत्तर गोवा पेक्षा दक्षिण गोवा स्वर्ग आहे.मुंबई वरुन मडगाव तिथून काणकोण ल उतरा . हात वर करा ,लांब श्वास घ्या आपण गोव्यात आहोत ही फिलिंग दोन मिनिट एन्जॉय करा. पलोलेम लाच रहा .हॉटेल चुकून सुद्धा online बुक करू नका, तिथेच beach कॉटेज घ्या.
"गांधीहत्या किंवा खून"....
ज्याला काही लोकं वध म्हणतात, त्यांचं त्यामागे स्पष्टीकरण खालील मुद्दयांवर असतं.
1. गांधीजीनी पाकिस्तान निर्मिती केली.
2. गांधीजीनी पाकिस्तान ला पंचावन कोटी दिले.
तर, मुळात गांधीजीना गोडसे ने मारले 1948 मधे, तो त्यांच्यावर झालेला पहिला प्रयत्न नव्हता.
मित्रहो, हा फोटो राज्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील आहे. मुलाच्या अंगात दिसतोय तो महाराष्ट्र सरकारने मुलांना दिलेला गणवेश आहे, तर शेजारी मुलींच्या अंगात ड्रेस दिसतोय तो गेल्या वर्षीचा गणवेश आहे. नवीन कपडे मिळाले नसल्याने विद्यार्थांना जुनेच कपडे घालून शाळेत यावे लागत आहे. सहामाही परीक्षा जवळ आल्या, दिवाळी आली पण अजून राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना शालेय गणवेशच मिळाला नाही.
तुम्हाला हे सगळं खोटं वाटतं असेल तर आपल्या जवळच्या सरकारी शाळेत जाऊन खात्री करून पहा. गणवेश का मिळाला नाही ? कारण गणवेशात १७०० कोटींचा घोटाळा झाला आहे ? मुलांची ओळख जाहीर नको व्हायला म्हणून चेहरे ब्लर केले आहेत. नेमका हा घोटाळा तरी काय ? चला त्या बद्दल थोडे सविस्तर सांगतो.
महाराष्ट्र सरकारने एक राज्य एक गणवेश पुरवायचा म्हणून नवीन योजना आणली, राज्य पातळीवरून शाळांना कापड पुरवले जाईल, शिलाई ठरवली जाईल. पण योजनेचे योग्य ते नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले नाही. एका मोठ्या व्यापाऱ्याला जो पेशाने कापड व्यावसायिक ही नाही, त्याला पूर्ण राज्याचे कापड पुरवण्याचे टेंडर देण्यात आले. कापड पुरवण्याची वर्क ऑर्डर त्याला 29 फेब्रुवारीला मिळाली, पण त्यानं त्यानंतर तब्ब्ल चार महिन्यांनी ते कापड डिस्ट्रिब्युट करायला सुरुवात केली.
हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आलं आणि तिथून जिल्हानिहाय वितरित करण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापड वितरित व्हायला सुरुवात झाली. तरी मंत्री महोदयांनी सभागृहात 15 ऑगस्ट रोजी मुलांना गणवेश मिळतील असं सांगितलं होतं, परंतु गणवेशाचे कापडच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करायला सुरुवात केली.
महिला आर्थिक विकास महामंडळा तर्फे हे काम महाराष्ट्रातील महिला बचत गटाकडून करून घेण्यात येईल, त्यातून महिला सक्षमिकरण करण्यात येईल असा शासन निर्णय होता. हा विषय सभागृहात पण मांडण्यात आला असताना ते थेट स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांना काम देण्यात आलं आहे.
ग्रामीण भाग व गाव पातळीवर असे अत्यंत कमी बचत गट आहेत जे शिवणकाम किंवा शिलाईचे काम करतात. त्यांची संख्या मुळात अत्यल्प आहे. त्यामध्ये सुद्धा फक्त शिवण कामाची मशीन त्यांच्या कडे आहे, त्या व्यतिरिक्त कोणतीही मशीन अथवा यंत्रणा त्यांच्याकडे नाही. गणवेश शिवण्याच्या संदर्भात जे विशिष्ट कौशल्य, प्रशिक्षण तसेच यंत्रणा लागते ती त्या बचत गटाकडे उपलब्ध नाहीत. यंत्रामध्ये गणवेश शिवण्या करिता ज्या मशीन लागतात त्यात ओव्हरलॉकची मशीन लागते, काजेबटनची मशीन असणे हे गरजेचं आहे. हे त्या बचत गटाकडे उपलब्ध नाही. गणवेशाचे पूर्ण काम फक्त एका शिलाई मशीन वर करूच शकत नाही. त्यामुळे त्याप्रकारचे कामगार उपलब्ध नाहीत म्हणून हे कामं पुन्हा स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांना देण्यात आलं.
गणवेशा करिता जे कापड व्यापाऱ्या कडून आले आहे, ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कटिंग चुकीची आहे. कपडाच्या शेड वेगवेगळ्या आहेत. कटिंग मध्ये प्रचंड घोळ आहे. शर्टची पुढची बाजू मोठी तर मागची बाजू लहान आहे. एक भायी छोटी तर एक भायी मोठी अश्या प्रकारचे कापड पुरवण्यात आलं आहे.
शासनाने शिलाई साठी जो रेट ठरवला आहे त्या रेट मध्ये कोणताही शिलाई कामगार शिलाई करू शकत नाही. त्याला ते परवडणारे नाही इतका अत्यल्प रेट शासनाने ठरवला आहे. 33.50 पैश्यात मुलांची पॅन्ट. एवढा कमी रेट शासनाचा आहे. कापड व्यापाऱ्याला शासनाने बाजार भावापेक्षा जास्त रेट देऊन कापड विकत घेतले आहे. जे कापड 75 रुपये किमतीचे आहे, ते कापड शासनाना 128.28 पैसे ह्या भावाने देण्यात आले ? 75 रुपयांचे कापड 128 रुपयांना देऊन एका कापडात 58 रुपयांचा भ्रष्टाचार झालाय ? शालेय शिक्षणमंत्र्यांनी यात आपल्या जवळच्या व्यक्तिच भलं केल्याची चर्चा आहे. एकाच व्यापाऱ्याला राज्यभर कापड पुरवण्याचे कंत्राट का दिलं ?
गणवेशाचा दर्जा निकृष्ट असतानाही, आजवर कोणतीच कारवाई का झाली नाही? अनेक शाळांमध्ये अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. याची जबाबदारी कोण घेणार?
विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या कापडाच्या दर्जाची लॅबमध्ये तपासणी व्हावी, कापडाची किंमत अन पुरवलेले कापडाच्या दर्जात प्रचंड तफावत आहे.
हे कंत्राट ज्या व्यक्तीला देण्यात आले,त्या संबंधित लोकांचे बँक तपशील तपासावेत,तसेच गेल्या सहा महिन्यातील त्यांचे कॉल रेकॉर्ड ही तपासावेत.१७०० कोटी रुपयांचा घोटाळा मंत्र्याच्या आशीर्वादाने व्यापाऱ्याने केला आहे.या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी.
शिक्षकांनी काल-परवा राज्यभर मुलांना चांगले ड्रेस मिळावेत या मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले, एवढी दुर्दैवी वेळ ? गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गणवेशात पैसे खाणाऱ्यानो जनता तुम्हाला कधीच सोडणार नाही. @CMOMaharashtra
🔴 ऑपरेशन पोलो - गोष्ट मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शेवटच्या ४ दिवसांची !!
स्वातंत्र्यानंतर हैदराबाद आणि एकदोन संस्थाने सोडली तर इतर संस्थाने भारतात विलीनीकरणाच्या करारानुसार सहभागी झाली होती.
हैदराबाद मात्र समजुतीने भारतात सामील होणे तर दूरच..उलट त्याच्या हालचाली वेगळा देश कसा निर्माण होईल त्यानं दिशेने होत होत्या.
भारताला स्वातंत्र्या मिळण्याआधीच निजामाने दोन फर्माने काढून १५ ऑगस्ट १९४७ पासून हैदराबाद हा स्वतंत्र देश असेल हे जाहीर केले होते.
पण निजामाला भारतापासून धोका वाटतं होता. आणि म्हणूनच निजामाला आपले लष्करी बळ वाढवणे गरजेचे वाटू लागले.
१/n + 👇
#म #Live_Thread
आधार, पॅनकार्ड प्रिंट...
आधार, पॅनकार्ड हरवले / खराब झाले असेल तर घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करु शकता. त्यासाठी कोणत्याही दलालकडे जाऊन दोनशे-पाचशे द्यायची गरज नाही
शुल्क 50 रु
8 दिवसात कार्ड घरपोच मिळेल
आधारला मोबाईल लिंक नसेल तरी मागवू शकता
आधार
https://t.co/iUN6x4yCjR
पॅनकार्ड
https://t.co/bvMx709haD
YouTube Premium ने भारतात सबस्क्रिप्शन शुल्क वाढवले, YouTube Premium घेण्यापेक्षा Brave Browser डाऊनलोड करा, कोणत्याही जाहिराती येत नाहीत, आणि बॅकग्राऊंड ऑडियो पण प्ले करता येतो, सर्व YT Premium फिचर्स मोफत मिळतात.
#youtubepremium
स्मार्ट मतदान कार्ड...
तुमच्याकडे जुने ब्लॅक अँड व्हाईट मतदार कार्ड असेल / नसेल, तुमचे मतदान कार्ड हरवले / खराब झाले असेल तर निवडणूक आयोग तुम्हाला निःशुल्क नवीन PVC स्वरुपात कार्ड देत आहे.
मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या लोकांना या निःशुल्क सेवेचा लाभ घेण्यास नक्की मदत करा.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच तुमचे स्मार्ट मतदान कार्ड घरपोच मिळेल.
https://t.co/nLf2Lq5c9x
📝 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म कसा भरायचा, आज पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
टप्पा 1: नारी शक्ती दूत अॅप इन्स्टॉल करा
1. प्ले स्टोअरला भेट द्या.
2. अॅप इन्स्टॉल करा: नारी शक्ती दूत अॅपचा लोगो शोधा आणि डाऊनलोड करा.
3. अॅप उघडा: इन्स्टॉल झाल्यावर अॅप उघडा
#Marathi
16 years ago, Afghanistan were in Division 5 of ICC World Cricket League and were playing against the likes of Japan, Singapore, Botswana etc.
Today, they are in the semi-final of ICC T20 World Cup ahead of the likes of Australia, New Zealand, Pakistan, West Indies etc.