जयंत पवारांनी एकदा तुला विचारलं, तुमच्या कादंबरीचे नायक स्त्रियांना तुच्छ मानतात. त्यावर तू उत्तर दिलेस, मी समाजात काय आहे ते लिहितो, काय असावं ते लिहीत नाही.
तू जग आणखी हजार वर्षे. खणून काढ इथल्या मूळ पुरुषाची पालमुळं आणि बांध कादंबऱ्यांचे थरावर थर. तुलाच जमेल ते.
खंडेराव असे कड्यावर उभं राहायचे प्रसंग आयुष्यात फार येत नाहीत. तू घरी जाशील तो कड्यावरून उडी घेण्याचा तुझ्या आयुष्यातला पहिला, कदाचित शेवटचाच प्रसंग. आता तू घराचा एकुलता एक वारसदार. उडी घेण्याआधी नीट बघ. समतोल राख, नाहीतर उडी घेण्याअधीच कोसळशील. खंडू, दोन्ही पाय झोकून तर माणसानं कधीही कुटू नये. चित्तात जिथे विचार उत्पन्न होतात, तिथेच क्षोभही निर्माण होतो. म्हणून अक्षोभकारक विचार येऊ दे. खंडेराव, ध्यान कर. समाधी लाव.
- भालचंद्र नेमाडे
आज जिथं पोहोचलोय, ते पुस्तकांशिवाय अशक्य होतं. पुस्तकांनी जगाकडे-जगण्याकडे पाहण्याचा स्वतंत्र परस्पेक्टिव्ह दिलाच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात आत्मविश्वास भरला. पुस्तकं माझ्यासाठी सतत एखाद्या खंबीर सपोर्टरची भूमिका निभावत आलेत. #WorldBookDay#GratitudeForBooks
हा तसा निवांत काळ..रब्बीतील धान्य खळ्यावरून घरात आलेलं असतं..नव्या हंगामाची चाहूल निसर्ग पालवीच्या तयारीने देत असतो..चैत्रवैशाख उन्ह डोक्यावर चढत असतात..वसंताची लगबग सबंध वृक्षवल्लीत सुरू असते..खरी नव्याची सुरवात म्हणतात ती हीच..हे नवं सर्वांगी नवं होवो या शुभेच्छा..❤️
#गुढीपाडवा
I still find each day too short for all the thoughts I want to think, all the walks I want to take, all the books I want to read, and all the friends I want to see.
— John Burroughs
"यादवी माजणे" हा प्रकार इथल्या मातीसाठी नवीन नाही. अगदी महाभारतापासून ते पानिपतच्या लढायांपर्यंत राजा /सेनापती धारातीर्थी झाल्यानंतर अंतर्गत कलहात बुरूजच ढासळून लावणे आमच्या रक्तात भिनलेलं आहे.
#politics