आज राजकारण पाहून आत्मा हादरला
मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे.
मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही.
ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले:
संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट)
भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट)
याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
मतदारांनी कोणाला मत दिले?
* एका चिन्हाला
* एका विचारधारेला
* खासदारांवर विश्वास ठेऊन
आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराचा ‘विश्वास’ विकला जात आहे.
“विरोधी पक्ष बँड वाजवून डांस करावा”. हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजप ने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये, फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह !
महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३% (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डांस करेल.
#PractiseWhatYouPreach
Dhurandhar 2
चित्रपटातील प्रत्येक पात्र मी तपासले:
1.हमझा – 2004 (काँग्रेस सरकार)
2.रेहमान डकैत – मृत्यू 2009 (काँग्रेस सरकार)
3.अर्शद पप्पू – मृत्यू 2013 (काँग्रेस सरकार)
4.SP अस्लम खान – मृत्यू 2014 (काँग्रेस सरकार)
5.जमील जमाली (नाबील गाबोल यांच्यावरून प्रेरित) – 45 वर्षांपूर्वी शिक्षा (काँग्रेस सरकार)
या सर्व व्यक्ती मरण पावल्यानंतर नोटाबंदी झाली. तरीही ती चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आली आहे , हे उघडपणे एका वादग्रस्त निर्णयाला न्याय्य ठरवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
मी काँग्रेसची कडवी टीकाकार होते. त्यामुळेच मी India Against Corruption चा भाग होते.
पण आज मी BJP चीही तितकीच टीकाकार आहे.
सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही.
एक सैनिकाने मला पाठवलेला व्हॉट्सअप मेसेज. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मीडिया ला पाठवत आहे
“माझ्या सैनिकांनी काय अपेक्षा ठेवावी या महाराष्ट्राकडून
आम्ही बॉर्डरवर 20 20 वर्षे नोकरी करतो परिवारा सोडतो कारण की कुठेतरी आपल्याला देश चांगला आहे
कुठल्यातरी अपेक्षा असतात कुठे भ्रष्टाचार करू नये कोण आहे काय करू नये
इथं आल्यानंतर असं मान्सून होऊन जातं असं वाटतं की डबल त्याच हेमालय पर्वता जाऊन राहावं
इथं फक्त भ्रष्टाचार आणि फक्त गुंडगिरी दिसते
सर्व सैनिकांच्या हेच अपेक्षा आहेत
मॅडम तुम्हाला साथ देणारे लोक भरपूर कमी आहे पण तुम्ही लढताय ना एक शूर वीरासारखे लढत आहे याचा मला खूप खूप अभिमान आहे
कधी कधी असं म्हणाला वाटतं की वीस वर्षांमध्ये आपणाला फक्त वीस लाख रुपये कधी मिळत नाहीत आणि इतर फक्त एका दिवसांमध्ये 1800 करोड रुपये मिळतात
मॅडम तुम्ही मीडियावर सांगा की माझ्या सैनिकांना काय वाटत असेल सगळ्या भावना व्यक्त करा सैनिकांच्या तर्फे”
प्रिय श्री अमित शाहाजी
जय महाराष्ट्र,
आज आपण ज्या भा ज पा कार्यालयाचे भूमीपूजन करणार आहात त्या जमिनीखाली काय रहस्य आहे याची माहिती सादर करीत आहे.
@AmitShah
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AUThackeray
अहो एकनाथ शिंदेजी ह्याची अमलबजावणी आधी घरातून सुरू करा !
एकनाथ शिंदेंचे व्याही लक्ष्मण कदम हे स्वतः बिल्डर आहेत. दौलत नगर, एक मध्यम वर्गीय कॉलोनी, जी एकनाथ शिंदेंच्या मतदार संघात, म्हणजेच कोपरी कॉलोनी ठाणे, एक रिडेव्हलपमेंट प्रकल्प, लक्ष्मण कदम ह्यांनीच हाती घेतला, TMC च्या मदतीने, सी 1 घोषित करून, वीज, पाणी बंद करून, घरं खाली करायला लावली आणि आज ह्या लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. TMC चे अधिकारी गुंडांसारखे घराबाहेर उभे राहून, रहिवाश्यांना घर खाली करायला भाग पाडत होते (वीडियो जोडला आहे) आणि हो, तुमच्याच नावावर हे सुरू झाले होते. आत्ता तुम्हीच उत्तर द्या.
तुमची मी ह्या विषयावर दोनदा भेट घेतली.
पुढे काय ?
तुमचेच व्याहीच भाडे देत नाहीत. त्यांना सांगा, ताबडतोब भाडे द्या.
गृहराज्य मंत्री योगेश कदम.
मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते.
गुन्हेगारांना आणि मोठं करणारे, डॅन्सबार असणारे मंत्री, महाराष्ट्राने का सहन करावे?
पोलीस आयुक्तांचा अहवाल/शिफारस अत्यंत महत्त्वाची असते. जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते.
आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा, आणि का मंजूर केला ? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात. पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. कारण हा कायद्याचा अपमान आहे.
सार्वजनिक सुरक्षेची ऐंशी तैशी करणारे तुम्ही कोण ?
Press Conference (2nd) against Nitin Gadkari tomorrow at 11am from my residence.
उद्या सकाळी अकरा वाजता मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेणार आहे.
Min Nitin Gadkari, how much will you lie to the people of this country? Just day before, you said you have never taken any money from any contractor.
I will prove, not once but in several places when you have taken indirect kickbacks from Road / Toll Contracting companies.
Isn’t this Ideal Road Builders Pvt Ltd ? This is the list of Purti Power & Sugar where both of you are shareholders. They held 58,50,000 shares in Purti way back in 2000
श्री नितीन गडकरी, तुम्ही या देशातील जनतेशी किती खोटे बोलणार? तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही कधीही काँट्रॅक्टर कडून पैसे घेतले नाहीत.
पण मी एकदा नाही तर अनेक वेळा सिद्ध करेन की तुम्ही रोड / टोल कंत्राटी कंपन्यांकडून तुमच्या कंपनीत फंडिंग घेतले, ही लाच नाही का? ही आयडियल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड नाही का?
ही पूर्ती साखर कारखान्याच्या शेअरहोल्डर्स ची यादी त्यात तुम्हीपण आहात आणि आइडियल रोड बिल्डर्स पण आहेत. श्री दत्तात्रय म्हैसकर आता हयात नाहीत. त्यामुळे मी त्या दिवंगत माणसाबद्दल काही बोलणार नाही.
पण ह्या दोन्ही शेयर ची बेरीज ५८,५०,००० शेयर आहे. ही गुंतवणूक वर्ष २००० मधली आहे
बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक खून.
एक अतिशय लहान वयाच्या मुलाचा भर रस्त्यात खून कोणी कसा करू शक्त… मी आत्ताच मुलाच्या काकांशी आणि बहिणीशी बोलले. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे कोणी एका नेत्याच्या पुतण्याने के कृत्य केले आहे.
FIR करायला सुद्धा त्रास झाला असे ते म्हणाले . मी राजस्थान च्या एका गावात होते म्हणून माझा फ़ोन त्यांना लगत नव्हता. मी उद्या रात्री मुंबईत परत येणार आहे. एसपी सारांशी पण बोलते. मला होईल तेवढी पूर्ण मदत मी करणार आहे.
https://t.co/up4iRXhIow
Maharashtra looks to sell (98-year-lease) Bus Depot land.
The only purpose it should be redeveloped is - for a public purpose. Be it schools/gardens/hospitals etc.
As a real estate journalist, I say "We need to stop thinking everything from the lens of real estate"
अजित पवारांना फ़ोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का?
ह्यांच्या हातात काय आहे ?
अश्या लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले?
ये बात तो बिल्कुल सही है।
ख़ुद अपने माँ को जो गाली दे उसका क्या ही करें।
मोदी के हिसाब से तो इन्होंने ने अपने माँ के गर्भ से जन्म ही नहीं लिया है, ये तो नॉन बायलॉजिकल हैं ।
🤷♀️🤷♀️
मोदी जी बस करें, अपने माँ को मरने के बाद तो शांति से रहने दें 🙏🤦♀️
अजित पवारांचा #IPS अधिकाऱ्याला थेट फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे "कारवाई थांबवा"चा आदेश. हा सत्तेचा दुरूपयोग आहे.DySP अंजली कृष्णा यांनी कायदा पाळला, पण उपमुख्यमंत्र्यांनी धमकावलं? मुरुमासाठी इतका हस्तक्षेप का? महाराष्ट्रात खरंच काय चाललंय? अशाच कामांसाठी राज्यातील नेत्यांना आपल्या भागात मर्जीतील अधिकारी हवे असतात का?
#सत्तेचादुरुपयोग
#अजितपवार
#DySPअंजलीकृष्णा
#अधिकाऱ्यांना_धमकी
#मुरुमप्रकरण
हा काय फालतूपणा आहे ?
अमोल मिटकरींनी त्यांच्या Boss च्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले, की स्वतःचे डोकं वापरले?
अंजना कृष्णाची चौकशी ? का ? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून?
चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्यांनमधे अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत.
त्या IPS ऑफिसर ना जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन.
IPS ऑफिसर्स च्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.
अजित पवार : डिप्टी सीएम बोल रहा हूँ. अपना कार्यवाही रोको
IPS अंजलि : अवैध खनन का कंप्लेंट था. कम्प्लेनेंट को मदद करना हमारा काम है
अजित पवार : मैं तुमको बोलता है एक्शन रोको. नही तो तुम पर एक्शन लूंगा
IPS अंजलि : मुझे कैसे मालूम आप डिप्टी सीएम हैं. सर आप मेरे फ़ोन पर डायरेक्ट कॉल कीजिए.
अजित पवार : तेरे अंदर इतना डेरिंग किधर से आया. मेरे को डायरेक्ट कॉल को बोलती है. मेरा चेहरा तो पहचानती है कि नही. तेरे ऊपर एक्शन लेगा.
घटना महाराष्ट्र के सोलापुर जिले की है. IPS अधिकारी अंजलि कृष्ण को फ़ोन पर डिप्टी सीएम अजित पवार धमका रहे हैं.
आयपीएस बनतांना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते.
अंजना कृष्णा ला वाटलं मी हे सगळं अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की ह्या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो, आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टारगेट केले जाते.
हेच कारण आहे की आपल्या तहसीलदार, कलेक्टर, एसपी, कुणकुणामध्ये हिंमत राहत नाही ह्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यातील IPS ऑफिसरवर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव आणला या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांची प्रतिक्रिया!