"मला भीती वाटते ती स्त्रीच्या पहिल्या हास्याची, नजरेची! कारण, त्या दोन्ही गोष्टींत - त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येतं! पण त्याहीपेक्षा, मला भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या नजरेची! आपली नजर प्रामाणिक नसते, आपल्याही नकळत एखादी अभिलाषेची छटा, सूक्ष्म वासनेचा एखादा
तरंग हां हां म्हणता नजरेत डोकावतो आणि स्त्रीचं पहिलं हास्य- पहिली नजर, लोहचुंबकाने लोखंडाचे कण खेचून घ्यावेत, त्याप्रमाणे ह्या गोष्टी खेचून घेतात. आणि मग, त्याच क्षणी, आपल्यातलं अंतर किती ठेवायचं ह्याचं 'गणित' त्यांच्याजवळ मांडलं जातं.
"How to Win Friends & Influence people...
लोकांशी संवाद कसा साधावा आपल्या बोलण्यातून त्यांच्यावर आपली छाप कशी पाडावी आणि सहजपणे त्यांची मनं कशी जिंकावीत हे शिकवणारं एक अप्रतिम पुस्तक
तसं पाहायला गेलं तर मी अगोदरपासूनच माझ्या जवळच्या लोकांची मनं जिंकलेली आहेत...😁 पण या पुस्तकाने संवाद साधण्याच्या काही नव्या आणि प्रभावी पद्धती मला शिकवल्या. विशेष म्हणजे त्या प्रत्यक्षात काम करतात याचा अनुभवही मी स्वतः घेतला आहे.
कधी कधी अगदी साधे शब्द आणि वाक्य समोरच्या व्यक्तीचं मन जिंकण्यासाठी पुरेसे असतात. अर्थात ते नेमके शब्द आणि वाक्य कोणते हे मात्र मी सांगणार नाही...🙌😎
Reading books can take you to a place that don't exist..!😅✌️❤️
"आपल्याच देशाच्या लेकीला पोलिसांकडून एवढी अमानुष वागणूक का दिली जातिये ?? हे तर अनाकलनीय आहे. तिचा गुन्हा काय तर तिला फक्त आपल्या देशाचा ध्वज फडकवायचा आहे. एकीकडे आपलं सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देतं आणि दुसरीकडे आपल्याच मुलींना अशी वाईट वागणूक देतयं हे सरासर चूक आहे. नी शस्त्र आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे त्याची गळचेपी व्हायला नको देश पाहतोय... 🙌
#NEHABORA
बाबासाहेबांनी त्यांच्या घरी ५०,००० हून अधिक पुस्तकांचं खाजगी वाचनालय तयार केलं होतं
त्याकाळात हे जगातील सर्वात मोठं खासगी वाचनालय मानलं जात असे!
#वाचनप्रेरणादिन
"आयुष्यात कोणत्या सिरीयलचा पूर्ण एपिसोड पाहिला नाही पण ह्या सिरीयलचं हे टायटल ऐकायला जीव आतुर असायचा... किती दिवसांनी हे ऐकायला भेटलं आणि मन अलगद भूतकाळात फिरून आलं..!🥰
"झाड लावणं सोपं असतं पण ते जगवणं ही खरी जबाबदारी असते...🌱
दोन वर्षांपूर्वी मी माझ्या शेतात लावलेलं हे झाड आज फळांनी बहरलेलं पाहताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. इथे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याला पाणी घालतो. आज त्याच्या रूपाने त्या छोट्याशा प्रयत्नाचं फळ डोळ्यांसमोर आहे.
पण झाडाचं महत्त्व केवळ त्याच्या फळांपुरतं मर्यादित नाही. ते आपल्याला ऑक्सिजन देतं पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतं आणि असंख्य जीवांना आधार देतं.
काही दिवसांपूर्वी पुण्याला गेलो असताना वेगवेगळ्या झाडांच्या बिया सोबत घेऊन तळेगाव दाभाडेच्या डोंगरावर पेरून आलो. त्यांना पाणीही घातलं होत आज त्यापैकी किती बिया रुजल्या असतील आणि त्यातून किती रोपं उगवली असतील याची कल्पना नाही. पण त्यांपैकी १०/१२ रोपं जरी जगली तरी माझ्यासाठी तो मोठा आनंद असेल.
आपण लावलेल्या प्रत्येक झाडाचं मोठं वृक्षात रूपांतर झालंच पाहिजे असा हट्ट नाही पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करायला हवेत.
कारण निसर्गाकडून फक्त घेणारे नाही तर निसर्गाला काहीतरी परत देणारेही आपण व्हायला हवं.
झाडं लावा त्यांची काळजी घ्या आणि शक्य तितकी झाडं जगवा. कारण निसर्गाचं रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे...! 🌳
"बाकी ही पण सीताफळं मीच खाणार"😋
#झाडे_लावा_झाडे_जगवा #SaveNature #PlantTrees #Environment #NatureLovers #GreenEarth