🌿 *रूख अळूचा ट्रिपल कॉम्बो!* 😋🍃
🌱 *रत्नागिरी कृषी विभागाने आयोजित केलेल्या रानभाजी रील स्पर्धेसाठी तयार केलेले हे खास रेसिपी रील नक्की पाहा!* 🎬✨
🎥 *रील पाहण्यासाठी लिंक :*
https://t.co/EghZn2nyWt
❤️ आवडल्यास Like करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा! 🔄📲
२०२६-२७च्या हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पीक विमा हप्ता ५१०० रुपयांनी घटला; विमा कालावधीत १६ दिवसांची वाढ : उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता २०२६-२७च्या हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळपीकविम्याचा हप्ता प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी हेक्टरी ८५०० रुपये इतका करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची हेक्टरी ५१०० रुपये बचत होणार असून, विमा संरक्षण कालावधीही १५ मेवरून ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीला हवामानात होणाऱ्या प्रतिकूल बदलांपासून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण मिळणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आला असून, त्यामुळे या पिकांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही विमा संरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचं सामंत म्हणाले. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, त्याद्वारे स्थानिक हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होऊन फळपीक विमा योजना अधिक परिणामकारक करण्यास मदत होईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
जिल्ह्यात सध्या 'मागेल त्याला काजू कलम' ही योजना राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत चार लाख काजू कलमं मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० कलमं मोफत दिली जाणार असून, या उपक्रमातून जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने काजू लागवड होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. हवामानबदलामुळे आंबा-काजूच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उत्पादनवाढ प्रकल्प जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात २४ क्लस्टर विकसित करण्यात येणार आहेत. त्यात सुमारे ५०० शेतकऱ्यांचा सहभाग असेल. आधुनिक तंत्रज्ञान, हवामान विश्लेषण आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाच्या साह्याने आंबा-काजू पिकांची उत्पादकता वाढवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
@samant_uday
सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट पर्यटनासाठी १० ऑगस्टपर्यंत बंद
खेड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट आजपासून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी आणि सातारा जिल्हे जोडणाऱ्या या अवघड घाटात मोठी दरड कोसळली आहे. डोंगर भागात आणखीही दरडी कोसळण्याची आणि जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ (रघुवीर घाट) च्या साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. कि.मी. १००/५०० ते १०५/५०० मध्ये डांबरी पृष्ठभाग आणि बाजूपट्टी खचली आहे. रस्त्यावर माती व दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्यांना घाटातून जाण्याची परवानगी आहे. याशिवाय सर्व प्रकारची जड वाहने, इतर सर्व प्रकारची खासगी वाहने घाटात नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. पर्यटकांना घाटातील पर्यटनस्थळांवर थांबण्यास आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे
नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
#landslide @satarkindia
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आज (९ जुलै) रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणं आंदोलन केलं.
बातमी वाचा पुढील लिंकवर... https://t.co/oLWLaU0fAW
व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर... https://t.co/Xm2MuDkvM5
खेड तालुक्यातल्या दहिवली-शेलारवाडीत काल रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/L2CSHOv0Wc
रत्नागिरीत कालच्या तुलनेत पावसाचा जोर कमी; मात्र उद्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी
रत्नागिरीत पावसाचा जोर कालच्या तुलनेत आज ओसरला आहे; मात्र खेड तालुक्यातली जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरूनच वाहत आहे. अन्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली नसली, तरी त्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर उद्याही (सात जुलै) सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज खेड बाजारपेठेत पूरस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेऊन आढावा घेतला. तसंच, कशेडी घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणीही भेट देऊन पाहणी केली. ठिकठिकाणी दरडी कोसळत असून, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अनावश्यक प्रवास आणि धोकादायक पर्यटन टाळावं, असं आवाहन बगाटे यांनी केलं आहे.
@RatnagiriPolice
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/ohLbuexVoA
#petroglyphs
म्हाप्रळ-आंबेत पुलाला धडकलेली एक बार्ज निघाली; दुसरी काढण्याचे प्रयत्न सुरू
रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातलं म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातलं आंबेत या गावांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरच्या पुलाला काल दोन बार्जेस धडकल्या होत्या. त्यापैकी एक बार्ज निघाली असून, दुसरी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.
https://t.co/LavZxmTFGM
@samant_uday#Landslide#रत्नागिरी#खेड#भूस्खलन
खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/U9whAK4S2w
@manujjindalIAS@DMRatnagiri
खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/U9whAK4S2w
पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ पुढील लिंकवर... https://t.co/TJK8TEXN4c #Landslide
महसूल राज्यमंत्री योगेश कदम, तसंच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही नुकतीच दहिवली इथे घटनास्थळी भेट दिली असून, प्रशासनाकडून दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी साह्य केलं जाईल, याबद्दल त्यांनी आश्वस्त केलं. प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहनही कदम यांनी केलं. मृतांच्या वारसदारांना योग्य ती मदत दिली जाईल. ज्या घरांचं नुकसान झालं आहे, ती घरं पुन्हा उभी करण्यासाठी शासन १०० टक्के आर्थिक मदत करील. संपूर्ण सरकार या सर्व कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं कदम यांनी सांगितलं.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/U9whAK4S2w
@iYogeshRKadam
- दापोलीत २४ तासांत ३०४ मिमी पाऊस
- कशेडी घाटात कोसळली दरड
- रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला
- जगबुडी नदी धोका पातळीच्या वरच
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/ZO4yhseqpy
@satarkindia@Hosalikar_KS
जगबुडी नदीची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा तीन मीटर अधिक
अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/SNU4l7aRqu
'रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,' अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
बातमी पुढील लिंकवर... https://t.co/ekT0LmVa0E
@madc_official@IndiaCoastGuard@samant_uday@MiKiranSamant@Dev_Fadnavis@Deepakk75058621