पुणे जिल्ह्याच्या पायाभूत विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आज शुभारंभ झाला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पुणे–शिरूर जलद दुर्तगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत महामार्ग तसेच तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं भूमिपूजन संपन्न झालं.
पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उभारले जाणारे हे तिन्ही महामार्ग भविष्यातील दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करतील. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, व्यापार, मालवाहतूक आणि रोजगाराच्या नव्या संधींना मोठी चालना मिळून पुणे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आदरणीय अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा करत केंद्र आणि राज्य शासनाशी प्रभावी समन्वय साधला. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या या महामार्गांची उभारणी ही त्यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीची साक्ष देणारी असून, भविष्यातील पायाभूत सुविधांना बळकटी देणारं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं.
तसेच केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशभरात आधुनिक रस्ते आणि दळणवळण सुविधांचं सक्षम जाळं उभं राहत असल्याचं, तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व वेग मिळत असल्याचंही यावेळी सांगितलं.
या तिन्ही प्रकल्पांची कामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालावधीत पूर्ण होऊन पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, उद्योगांना चालना मिळेल, नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच पुण्याच्या भविष्यातील विकासासाठी हे तिन्ही महामार्ग निश्चितच मैलाचा दगड ठरतील, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी नाशिक फाटा–राजगुरुनगर उन्नत महामार्गाचा मुद्दाही आवर्जून मांडत या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले १३० कोटी रुपये येत्या १५ दिवसांत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. याचबरोबर भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढाव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे नाशिक फाटा–राजगुरुनगर उन्नत महामार्गाच्या कामालाही लवकरच गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहील. समाजप्रबोधन, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचे अग्रदूत, अदम्य शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक शहीद मंगल पांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
परकीय सत्तेच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी धैर्याने आवाज उठवत स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पेटवली. मातृभूमीसाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श प्रत्येक भारतीयाला आजही प्रेरणा देत आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
सत्य, लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांसाठी त्यांनी पुरोगामी विचारधारा जपत आयुष्यभर अखंड संघर्ष केला. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा अनेक पिढ्यांना समाजपरिवर्तनाची दिशा देत राहील.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
#DrKumarSaptarshi #RIP #SocialJustice #Tribute #ncp
माजी उपमहापौर तथा पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. शंकरराव निम्हण यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
पुणे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत शहराच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. विशेषतः पाषाण परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या साध्या, अभ्यासू आणि जनसामान्यांशी जोडलेल्या कार्यशैलीमुळे त्यांनी सर्वांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचं बळ देवो.
भारताच्या अंतराळ इतिहासातील सुवर्णक्षण! 🇮🇳
Vikram-1 या भारतातील पहिल्या खासगीरित्या विकसित करण्यात आलेल्या कक्षीय-श्रेणीच्या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने देशाने अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.
ही केवळ एका रॉकेटची झेप नसून, भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची, नवोन्मेषाची आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेतलेल्या भक्कम पावलाची साक्ष आहे.
Vikram-1 च्या संपूर्ण टीमचे या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
#Vikram1 #SkyrootAerospace #IndiaInSpace #SpaceTech #ncp
आज लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वारगेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.
यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मातंग समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजवला. त्यांचे विचार आणि कार्य समाजाला कायम प्रेरणा देत राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
NEET 2026 परीक्षेत बारामतीची कन्या कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिनं ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसंच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीचं नाव देशभरात उज्ज्वल केलं.
या उल्लेखनीय यशाबद्दल व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं. तसंच तिच्या यशामागे मोलाचं योगदान असलेल्या शिक्षकांचंही अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
लोकशाहीर, थोर साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
आपल्या साहित्य, शाहिरी आणि संघर्षमय कार्यातून त्यांनी सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवला. वंचित आणि उपेक्षितांच्या वेदनांना शब्द देत समाजप्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी उभं केलं. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील.
#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे
#AnnaBhauSathe
आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं लोकार्पण पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलं. यावेळी बारामती येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोगत व्यक्त केलं.
बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही होत असून अमृत भारत स्टेशन योजना हा त्याच परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचं यावेळी व्यक्त केलं.
या निमित्तानं आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विकसित भारत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांवर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे विचार मांडले. सर्व सहभागी विद्यार्थी आणि विजेत्यांचं अभिनंदन केलं.
देशात आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानकं राष्ट्राला समर्पित होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णवजी यांचे आभार व्यक्त केले.
सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. स्थानकात आधुनिक सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ व्यवस्था, आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही सुरक्षा, सौरऊर्जा प्रणाली तसंच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 'व्होकल फॉर लोकल' संकल्पनेलाही चालना मिळणार आहे.
बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हे त्याचं उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं.
यावेळी पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं अनावरण केलं. तसंच स्थानकाची पाहणी करत रेल्वेतील विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले. पुणे विभागीय रेल्वे मंडळातर्फे आयोजित स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
बारामतीकरांनी या आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता आणि सौंदर्य जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विकासाच्या प्रवासात प्रत्येकानं सक्रिय सहभाग घेत स्थानकाचा सन्मान आणि परिसराची स्वच्छता कायम राखावी, असं आवाहन यावेळी केलं.
📍बारामती
बारामतीत पर्यावरण संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प!
आज बारामती येथे स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान नामकरण समारंभ तसेच "देवगिरी ते देवराई" राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा केवळ एका उद्यानाच्या नामकरणाचा नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक बळकट करण्याचा आणि स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा प्रेरणादायी क्षण ठरला.
स्वर्गीय अजितदादांनी कन्हेरी पर्यटन उद्यानाच्या संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे राखीव वनाच्या ५५ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी ८ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून Pathways, Suspension Bridge, Solar Lights, Adventure Activity Zone, Rock Garden आणि Butterfly Garden यांसारख्या आधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली.
"देवगिरी ते देवराई" हे अभियान केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ आहे. २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या अभियानात सहकार्य करणारे वनमंत्री श्री. गणेश नाईक, ज्येष्ठ अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सयाजी शिंदे, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Mumbai Port Authority, सह्याद्री देवराई फाउंडेशन, Environmental Forum of India, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, CSR भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि सर्व स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान झालेल्या पावसाने वातावरण अधिक भावूक झाले. उपस्थित प्रत्येकाच्या मनात स्वर्गीय अजितदादा आजही आपल्या आशीर्वादाच्या रूपाने सोबत असल्याची भावना जागृत झाली.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेला पर्यावरण संवर्धनाच्या प्रेरणेचा वारसा पुढे नेत, हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठीचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा मा. सुनेत्रावहिनींनी व्यक्त आला.
आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं तसंच तामिळनाडू विधानसभा सचिवालयाच्या वतीनं आदरणीय अजितदादा यांच्या लोकसेवा, विकासाभिमुख नेतृत्व आणि सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाचा गौरव करणारे स्मृतीपत्र आमच्या कुटुंबाला सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आलं.
हा क्षण आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा होता. जनतेच्या हितासाठी आयुष्यभर अविरत कार्य करणाऱ्या आदरणीय अजितदादा यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या लोकहितवादी विचारांना आणि जनसेवेच्या अखंड प्रवासाला महाराष्ट्रानं व्यक्त केलेली कृतज्ञ मानवंदना आहे.
यावेळी जय आणि ऋतुजा यांचीही उपस्थिती होती. आदरणीय अजितदादा यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याचा आमचा संकल्प यानिमित्तानं अधिक दृढ झाला.
आदरणीय अजितदादा यांनी जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान, विकासासाठी केलेले कार्य आणि समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.
आज बारामती इथं स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान नामकरण समारंभ आणि "देवगिरी ते देवराई" राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ झाला. हा केवळ एका उद्यानाच्या नामकरणाचा किंवा वृक्षसंवर्धन अभियानाच्या प्रारंभाचा सोहळा नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करणारा आणि स्वर्गीय मा. अजितदादांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा अविस्मरणीय क्षण ठरला.
या प्रसंगी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, देशी वृक्षांची लागवड आणि वनसंपदेच्या जतनासाठी त्यांचा नेहमीच विशेष आग्रह असायचा. त्यांच्या नावानं उभारण्यात आलेलं हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारं, पर्यावरण शिक्षण देणारं आणि भावी पिढीला प्रेरणा देणारं केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कन्हेरी पर्यटन उद्यानाची संकल्पना, नियोजन आणि उभारणीत आदरणीय अजितदादांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळं कन्हेरी येथील राखीव वनाच्या ५५ हेक्टर क्षेत्रासाठी ₹८ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून Pathways, Suspension Bridge, Solar Lights, Adventure Activity Tools, Rock Garden आणि Butterfly Garden विकसित करण्यात आले आहेत.
"देवगिरी ते देवराई" हे अभियान केवळ वृक्षलागवडीचे नाही, तर पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट राज्य शासनानं निश्चित केलं असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी केलं.
या अभियानासाठी सहकार्य करणारे वनमंत्री श्री. गणेश नाईक, ज्येष्ठ अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सयाजी शिंदे, तसेच वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Mumbai Port Authority, सह्याद्री देवराई फाउंडेशन, Environmental Forum of India, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, विविध CSR भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि सर्व स्वयंसेवकांचं अभिनंदन केलं.
कार्यक्रम सुरू असतानाच पडलेल्या पावसाने वातावरण आणखी भावूक झालं. उपस्थित प्रत्येकाच्या मनात दादा आजही आपल्या आशीर्वादाच्या रूपानं सोबत असल्याची भावना दाटून आली.
आदरणीय अजितदादांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा जपत, हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.
आज वाल्हेकर ज्वेल्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभारंभ केला.
सुवर्णकार व्यवसाय हा विश्वास, गुणवत्ता आणि समृद्ध परंपरेचा वारसा जपणारा व्यवसाय आहे. वाल्हेकर ज्वेल्स ग्राहकांचा विश्वास संपादन करत उत्कृष्ट सेवा, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांच्या माध्यमातून यशाची नवी शिखरे गाठो, तसंच या व्यवसायातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगली सेवा उपलब्ध होवो, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी श्री. चेतन शहा–वाल्हेकर तसंच संपूर्ण परिवाराचं अभिनंदन करत त्यांच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
📍 बारामती
आज सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी मंत्री ॲड. आशिष शेलारजी आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रतिमा शेलार यांनी सदिच्छा भेट घेतली.
पंढरपूर वारीनिमित्त बारामतीत आगमन झाल्यानंतर त्यांनी भेट देत मनमोकळा संवाद साधला.
महाराष्ट्र शासनानं सन २०२६ पासून आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा आणि राज्याच्या विकासासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा योग्य सन्मान आहे.
जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे त्यांचे कार्य आणि प्रशासनाला दिलेली विकासाभिमुख दिशा हीच त्यांची खरी ओळख आहे. २२ जुलै रोजी दादांच्या जयंतीनिमित्त शासकीय स्तरावर त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जाणार, ही बाब दादांना 'आपला माणूस' मानणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
अजितदादांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं.
'माऊली'चा गजर करत विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना प्रेमानं भोजन वाढत त्यांच्या सेवेत सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. वारकरी संप्रदायाने जपलेली सेवा, समता, प्रेम आणि भक्तीची परंपरा हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. या पवित्र भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनात मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले.
📍काटेवाडी, बारामती
राज्य शासनाची आदरणीय अजितदादांना मानवंदना!
स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी सर्व शासकीय कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात येईल.
हा निर्णय त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा आणि समाजसेवेच्या वारशाचा गौरव करणारा आहे.
#AjitDadaPawar #Maharashtra #ncp #Mahayuti