महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला
आज माझे मन खूप हेलावले आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक 'पॉवरफुल' नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचे पालन हे सर्वांसाठीच आदर्श होते. ते स्पष्टवक्ते होते, मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे. अशा या रोखठोक नेत्याचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा गड आहे आणि या गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आहे. दादांनी नेहमीच दलित, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मी माझ्या पक्षातर्फे आणि वैयक्तिकरित्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आरोग्यसेवक ५०% २०२३ भरती बाबत ग्रामविकास विभागाने मार्गदर्शन सूचना लवकरात लवकर ZP ना देऊन जोईनींग करून घेणे बाबत.जेणेकरून आरोग्यसेवक ५०% भरतीतील विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी लागून पदावरती रुजू होतील व त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची दिवाळी गोड होईल.@girishdmahajan
@girishdmahajan आदरणीय महोदय साहेब,
आरोग्य सेवक पुरुष 50 टक्के भरती मध्ये प्राधान्य शब्दाचा चुकीचा अर्थ काढून मेरीट वाल्या बेरोजगारांवर मुलांवर अन्याय होत आहे , तरी साहेबांनी स्वतः लक्ष्य घालून न्याय लवकरात लवकर आचार संहिते लागण्या आधी द्यावा अशी आशा , आपला कार्यकर्ता .