मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dev_Fadnavis
📍 जलसंधारण विभाग पदभरती
उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलस���धारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_Recruitment
@SanjayDRathods
जळगाव महापालिकेकडून केवळ ३० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ११ महिन्यांच्या नोकरभरतीसाठी लाखो रुपयांचे टेंडर?
🛑 हेच भाजप-शिंदे सरकारचं खरे धोरण आहे, स्थायी नोकरभरती टाळा, तरुणांना गाजर दाखवा, आणि कंत्राटदारांना फायदा करून द्या.
@mieknathshinde जी, बेरोजगारांना स्थायी रोजगार हवा आहे, तुम्ही तर दलालांना टेंडर कढाताय !!!
@INCHarshsapkal
#RojgarNakoKaamPahije
#ContractRaj
#BJPExposed
#Congress
📍जळगाव महानगरालिका
जळगाव पालिकेने फक्त ३० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी आणि तेही फक्त ११ महिने यासाठी येवढ्या पैशांचे #Tender काढले आहे. एकीकडे यांना शासनाचे ��दभरतीचे सक्त आदेश असताना देखील पदभरती होताना दिसत नाही.
नगरविकास मंत्री @mieknathshinde यांनी याकडे लक्ष द्यावे.
मा. संजय राठोड
मृदा आणि जलसंधारण मंत्री
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई.
विषय: स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदभरतीच्या जाहिरातीबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत विनंती.
महोदय,
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे आणि यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी आहे.
मृदा आणि जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदभरतीबाबत छत्रपती संभाजीनगर येथे अलीकडेच प्रमुख संघटना, परीक्षार्थी आणि प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत आपण पूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल��यामुळे आणि जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या विलंबामुळे हजारो पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे भविष्य अधांतरी राहिले असून, “संविधानिक मार्गाने रोजगार सत्याग्रह” करण्याचा निर्णय परीक्षार्थ्यांनी घेतला आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आपण तातडीने निर्णय घेऊन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी, ही संबंधित सर्वांची सामूहिक आणि नम्र मागणी आहे.
यासंदर्भात, ३१ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून देतो. त्यानुसार, जर लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, तर छत्रपती संभाजीनगर येथील “वाल्मी” संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रोजगार सत्याग्रह आयोजित करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
आपल्या नेतृत्वाखाली विभागाने अनेक उल्लेखनीय प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आणि पदभरती प्रक्रियेतील विलंबामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे, तसेच हजारो तरुणांच्या रोजगाराच्या आशा धूसर होत आहेत.
आपण तातडीने सकारात्मक पावले उचलून ही प्रक्रिया गतिमान कराल, अशी आम्हाला ठाम अपेक्षा आहे.
आपल्या त्वरित आणि सकारात्मक कार्यवाहीच्या प्रतीक्षेत.
आपला नम्र,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य संयोजक : रोजगार विभाग
प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्���ेस समिती
@INCHarshsapkal @SanjayDRathods @drkalyankale
#WCD_Recruitment #WRD_JE #RojgarSatyagrah #YouthForJobs
🔴 वाल्मी आंदोलन 🔴
📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..!
जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे.
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dhananjay4INC
जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने पुणे आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ पदभरती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून.
जलसंपदा कनिष्ठ अभियंता आणि जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग १००% रिक्त पदभरती करण्यात यावी.
अन्यथा लवकरच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
#WCD_Recruitment#WRD_JE
राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये हजारोंच्या संख्येने अभियंता पदे रिक्त असून, ती दीर्घकाळापासून भरली जात नसल्यामुळे आज राज्यातील तंत्रशिक्षित तरु���ांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाल�� आहे. ‘इंजिनिअर्स असोसिएशन’ या अभियंत्यांच्या संघटनेने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि शासनाला याबाबत ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जलसंपदा, जलसंधारण विभाग तसेच इतर महत्त्वाच्या खात्यांमध्ये सुमारे ४६०० हून अधिक अभियंता पदे रिक्त आहेत. ही पदे भरली गेली नाहीत, तर शासन यंत्रणेची कार्यक्षमता ढासळते, हे उघड आहे. याचा थेट परिणाम केवळ प्रशासकीय कामकाजावरच नाही, तर त्या त्या क्षेत्राच्या विकासावर आणि लोकहिताच्या योजना राबवण्यावर देखील होतो.
या मागणीकडे वेळेवर दुर्लक्ष झाल्यास, ‘इंजिनिअर्स असोसिएशन’ने छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची मागणी केवळ संघटनेची नाही, तर ती राज्यातील हजारो तंत्रशिक्षित तरुण अभियंत्यांची व्यथा आहे.
रिक्त पदे न भरल्यामुळे अनेक पात्र उमेदवारांची संधी हिरावली जाते. या उमेदवारांनी वर्षानुवर्षे शिक्षण घेऊन आणि परीक्षांना सामोरे जाऊन स्पर्धात्मकतेत स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांच्या प्रतीक्षेचा अंत होण्याऐवजी, शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचं आयुष्यच खोळंबतंय.
शासनाने लक्षात घ्यावं की, हे तंत्रकुशल मनुष्यबळ म्हणजे राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांचा यथायोग्य उपयोग करून घेणं ही केवळ गरज नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनम्र आवाहन आहे की, आपण या आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी. जर ही मागणी वेळेत मान्य झाली नाही, तर शासनासमोर उभ्या राहणाऱ्या बेरोजगारीच्या लाटेला रोखणं कठीण होईल.
ही लढाई केवळ नोकरीसाठी नाही, तर तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि देशाच्या प्रगतीसाठी आहे.
#EngineerJobs #RecruitEngineersNow #YouthUnemployment #EngineeringTalent #सरकारीभरती #विकासासाठीअभियंते #EngineersForNation
'इंजिनिअर्स असोसिएशन' या अभियंत्यांच्या संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. जलसंपदा,जलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४६०० हून अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ द��वसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण या आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @degree_holders
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आ���ोजित “रोजगार सत्याग्रह” ऐतिहासिक होते.
अभियंत्यांची संघटना “��ंजिनिअर्स असोसिएशन” च्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून समन्वय साधला.
२०१९ पासून रखडलेल्या जलसंपदा व जलसंवर्धन विभागातील ४,६००+ अभियंता पदांच्या भरतीसाठी बेरोजगार अभियंत्यांनी आपला ठाम आवाज उठवला.
त्याचबरोबर राज्यातील २७ जिल्ह्यांतील युवकांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.
पुण्यात ३५० हून अधिक तरुणां��ी मैदानात उतरत शिस्तबद्ध आणि संवेदनशील आंदोलन घडवले.
या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे युवकांशी संवाद साधून पाठिंबा जाहीर केला.
काँग्रेस पक्षाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे.
त्यानंतरही भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक न आल्यास संभ��जीनगर येथील “वाल्मी” या संस्थेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ अनिश्चितकालीन सत्याग्रह छेडण्यात येईल.
रोजगार हा मूलभूत अधिकार आहे.
हा लढा राजकारणाचा नव्हे, तर तरुणांच्या भविष्याचा आहे. काँग्रेस पक्ष संविधानिक मार्गाने युवकांच्या बाजूने ठामपणे उभा आहे.
@INCHarshsapkal @degree_holders
✊ #रोजगारसत्याग्रह #CongressForYouth
"तरुणांच्या रोजगारासाठी काँग्रेस रस्त्यावर"
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडलेला रोजगार सत्याग्रह उत्स्फूर्त आणि यशस्वी ठरला.
२०१९ पासून रखडलेली जलसंपदा विभाग (WRD) आणि जलसंवर्धन विभाग (WCD) मधील एकूण ४६००+ अभियंता पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील अभियंते रस्त्यावर उतरले होते. पुण्यातील आंदोलनात ३५० पेक्षा अधिक बेरोजगार अभियंत्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र काँग्र���सचे प्रदेश सरचिटणीस आणि रोजगार विभागाचे राज्य संयोजक मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ��ेलं, तर @degree_holders संघटनेने सक्रिय साथ दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. गोपाळ तिवारी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी पुणे दौऱ्यात या तरुण अभियंत्यांशी प्रत्यक्ष भेट घेण्याचं आश्वासन दिलं.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, रोजगाराचा प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असून काँग्रेस पक्ष संविधान मार्गाने शेवटपर्यंत लढा देईल.
हा रोजगार सत्याग्रह राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये समांतरपणे पार पडला.
📌 काँग्रेस पक्षाने सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास WALMI, संभाजीनगरच्या मुख्य गेटसमोर अनिश्चितकालीन सत्याग्रह करण्यात येईल.
🔔 या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबधित मंत्री यांनी येत्या आठवड्यात या विषयाव�� बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
✊ काँग्रेसचा हात, तरुणांना साथ!
@INCHarshsapkal
@INCIndia
@Dhananjay4INC
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics #RojgarSatyagraha #EngineerRecruitment #PuneProtest #CongressForYouth #WRD #WCD #MaharashtraYouth
बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत..
जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा तात्काळ भराव्यात अशी ���्यांची मागणी आहे..
मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी जाहिरातीची वाट पाहत आहेत परंतु सरकार चालढकल करत आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे..
सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर पदभरती करावी..
राज्यातील बेरोजगार युवकांना सारख रस्त्यावर उतरून आंदोलन कराव लागत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे..
सरकारने तरु��ांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे..
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @girishdmahajan @RVikhePatil @AUThackeray @CPRGuv @SanjayDRathods @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm
#WRD_JE
#WCD_Recruitment
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत���य विद्युत यांत्रिकी आणि जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यासारखी शोकांतिका कोणती नाही.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@SanjayDRathods
@CMOMaharashtra
आज स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या 31 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन होणार आहे.
प्रमुख मागण्या!
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी पदभरती....!
२) जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती....!
#संवाद