SIR प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती | BLO ने घराकडे बोलावणे योग्य का?
BLO एजंटकडून एका व्यक्तिला फोन आला. त्याने Aadhaar कार्ड & फोटो घेऊन त्याच्या घराकडे येण्यास सांगितले. जेव्हा इतर कुटुंब सदस्यांची माहिती विचारली, तर “माझ्याकडे फक्त एकच नाव आहे” असे उत्तर दिले. (१/४)
#wcl व इतर जनहिताच्या प्रश्नांवर कायदेशीर लढा देत नागरिकांच्या हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण करणारे #शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @deepak_chatap यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
महावितरण कडून मेसेज आलाय......
प्रिय उपभोक्ता,
भारत सरकारने दि.१७.०८.२०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र
अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर 'स्मार्ट मीटर' नसेल, तर हा संदेश
मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या
अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी 'स्मार्ट
मीटर' बसविण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी की, हा संदेश तुमचे
सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे. स्मार्ट मीटरचे फायदे
खालीलप्रमाणे आहेत:
१) यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते.
२) मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या विजेचा वापर आणि बिल यांवर लक्ष ठेवू शकता व ते नियंत्रित करू शकता.
३) घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत (Solar Hours) प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल.
४) मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
आपणास सहकार्य करण्याची आणि या सुविधेचा लाभ घेण्याची नम्र
विनंती आहे.
मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या
सहकार्याची अपेक्षा आहे.
जर तुमचे मीटर अगोदर बदलविले गेले असतील किंवा बदलविण्याच्या प्रक्रियेत असतील तर सदर संदेश दुर्लक्षित करण्यात यावा.
MSEDCL (महावितरण).
👇🏻 हा मेसेज तुमचा कडून प्राप्त झाला आहे,आणि केंद्रीय मंत्री यांनी एप्रिल 2026 मध्ये लोकसभे मध्ये सांगितले की जर तुमचे मीटर व्यवस्थि असेल तर बदलाची गरज नाही.
@MSEDCL@CMOMaharashtra
ते अगदी बरोबर आहे पण मला सध्या ते मीटर बसायचे नाही माझे जुने मीटर व्यस्थ्ती सुरू आहे आणि माझे वीज बिल कोणत्याच महिन्याचे बाकी नसते सगळे क्लिअर आहे.
म्हणून मला सध्या तरी नवीन मीटर बसण्याचे नाही जेव्हा मला वाटेल तेव्हा मी4स्वतः अर्ज करून ते बदलवून घेईल
@MSEDCL
👇🏻 हा मेसेज तुमचा कडून प्राप्त झाला आहे,आणि केंद्रीय मंत्री यांनी एप्रिल 2026 मध्ये लोकसभे मध्ये सांगितले की जर तुमचे मीटर व्यवस्थि असेल तर बदलाची गरज नाही.
@MSEDCL@CMOMaharashtra
बिल तुमच्या नावावर येतं... मग उत्तरदायित्व फक्त तुमचंच का?
वीज बिल जास्त आलं म्हणून ते बरोबरच असेल असं नाही.
अनेकदा चुकीचे रीडिंग, तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांमुळे जादा बिल आकारलं जाऊ शकतं. अशा वेळी आधी मीटर तपासणीची मागणी करा. समाधान न झाल्यास तक्रार नोंदवा आणि तिचा पाठपुरावा करा.
वीज खंडित झाल्यावरही ग्राहकांना काही अधिकार आहेत.
लक्षात ठेवा...वीज ही सेवा आहे.
आणि चांगली सेवा मिळणं हा तुमचा अधिकार आहे.
#VijayKumbhar #RTI #VoterAwareness #वीजबिल #ग्राहकहक्क #महावितरण #जागरूकनागरिक #लोकजागृती #CitizenAwareness #ElectricityBill #ConsumerRights #PublicUtility #QuestionTheSystem #Transparency #RightToQuestion #MaharashtraNews #PowerSupply #Accountability #RaiseYourVoice #ConsumerAwareness
ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर सर्वात मोठी चूक म्हणजे घाबरणं किंवा वेळ वाया घालवणं. अशा प्रकरणांमध्ये सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात.
ताबडतोब https://t.co/phElnJdJhe वर अधिकृत तक्रार दाखल करा. संबंधित स्क्रीनशॉट्स, ट्रान्झॅक्शन आयडी, बँक मेसेजेस आणि पेमेंट डिटेल्स सुरक्षित जपून ठेवा.
जितक्या लवकर तक्रार केली जाते, तितकी व्यवहार थांबवण्याची किंवा पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. अनेकदा वेळेत केलेली कारवाई मोठं आर्थिक नुकसान टाळू शकते. त्यामुळे गोंधळून न जाता पुरावे गोळा करा, अधिकृत नोंद करा आणि तात्काळ पाठपुरावा सुरू करा.
चला, प्रश्न विचारूया.
डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक राहूया.
#Vijaykumbhar #RTI #voterawareness #सायबरफ्रॉड #ऑनलाईनफसवणूक #डिजिटलसुरक्षा #जागरूकनागरिक #लोकजागृती #CyberCrime #CyberSecurity #OnlineFraud #CitizenAwareness #DigitalSafety #QuestionTheSystem #RaiseYourVoice #SocialAwareness #FinancialFraud #RightToQuestion #SystemTransparency #आवाजउठवा #नागरिकहक्क #CyberAwareness #MaharashtraNews
मुलांच्या शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य दाखले वेळेत मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण अनेक पालक सर्व कागदपत्रं जमा करूनही महिनोनमहिने दाखल्यांची प्रतीक्षा करत राहतात. अशा वेळी गप्प बसू नका.
सेतू कार्यालय, तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा “आपले सरकार” पोर्टलवर अधिकृत पाठपुरावा करा. सेवा वेळेत मिळाली नाही तर “सेवा हमी आयोग” अंतर्गत अर्ज आणि अपील करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जाची पोहोच पावती, जोडलेल्या कागदपत्रांची नोंद आणि पुरावे स्वतःजवळ व्यवस्थित ठेवा. कारण सरकारी व्यवस्थेत तोंडी मागणी विसरली जाते… पण लेखी नोंद दुर्लक्षित करणं कठीण जातं.
चला, प्रश्न विचारूया.
वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळण्याचा हक्क मागूया.
#Vijaykumbhar #RTI #voterawareness #सेवाहमी #आपलेसरकार #उत्पन्नदाखला #जागरूकनागरिक #लोकजागृती #प्रश्नविचारा #CitizenAwareness #GovernmentServices #RightToService #PublicAccountability #Transparency #RaiseYourVoice #नागरिकहक्क #ServiceGuarantee #AdministrativeReform #MaharashtraNews #SocialAwareness #GovernmentTransparency #PublicRights #Accountability
बँकेने विनाकारण चार्जेस कापले तर फक्त कॉल सेंटरवर वेळ घालवून उपयोग होत नाही. फोनवरील चर्चा अनेकदा नोंदीत राहत नाही, पण लेखी तक्रार मात्र सिस्टिमला उत्तर द्यायला भाग पाडते.
कोणता चार्ज कापला, तो कोणत्या नियमांतर्गत कापला आणि त्याचा आधार काय हे स्पष्टपणे लेखी विचारा. शाखा व्यवस्थापकाला मेल करा, तक्रारीची नोंद ठेवा आणि गरज पडल्यास आरबीआय ओंबड्समनकडेही जा.
कारण सिस्टिम भावना विसरते… पण लेखी पुरावे आणि नोंदी सहज विसरत नाही.
चला, प्रश्न विचारूया.
आपल्या आर्थिक हक्कांसाठी जागरूक राहूया.
#Vijaykumbhar #RTI #voterawareness #बँकचार्जेस #ग्राहकहक्क #आर्थिकजागरूकता #जागरूकनागरिक #लोकजागृती #CitizenAwareness #BankCharges #RBI #BankingRights #QuestionTheSystem #RaiseYourVoice #FinancialAwareness #ConsumerRights #Accountability #RightToQuestion #SystemTransparency #आवाजउठवा #नागरिकहक्क #MaharashtraNews #BankingAwareness
हॉस्पिटलचं बिल मोठं आलं म्हणून ते अंतिम सत्य मानून शांत बसू नका!
प्रत्येक चार्ज समजून घेण्याचा आणि त्याबद्दल लेखी स्पष्टीकरण मागण्याचा नागरिक म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. उपचारांचे दर काय होते, कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारलं गेलं, त्याचा आधार काय आहे हे स्पष्ट विचारणं आवश्यक आहे.
अनेकदा लेखी उत्तर मागितलं की संभाषणाची दिशा बदलते. गरज पडल्यास चॅरिटी कमिशनर, ग्राहक मंच किंवा संबंधित प्राधिकरणाकडे अधिकृत तक्रारही करता येते.
कारण आरोग्य सेवा म्हणजे विश्वास… आणि विश्वासात पारदर्शकता आवश्यक असते.
चला, प्रश्न विचारूया.
आरोग्य व्यवस्थेत उत्तरदायित्वाची मागणी करूया.
#vijaykumbhar #RTI #हॉस्पिटलबिल #ग्राहकहक्क #आरोग्यव्यवस्था #जागरूकनागरिक #लोकजागृती #CitizenAwareness #HospitalCharges #MedicalTransparency #HealthcareRights #QuestionTheSystem #RaiseYourVoice #SocialAwareness #Accountability #RightToQuestion #ConsumerRights #SystemTransparency #आवाजउठवा #नागरिकहक्क #MaharashtraNews #HealthcareAwareness