आडाचीवाडी ता. पुरंदर, जि. पुणे ♥️
गाव कसे असावे या��े मूर्तिमंत उदाहरण 🫰🏻
गावातील स्मशान सुद्धा असे बांधले आहे की शेजारच्या गावातल्यांना पण इथेच यायला आवडेल 😄
Tomorrow, 12th October, India marches peacefully as one to the Supreme Court.
Students, civil society organisations, Opposition parties: Please join us to defend our democracy.
#ChaloDilli
माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलनं अनुभवली; पण MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने माणुसकीचा एक वेगळाच अनुभव दिल��.
विवेकानंद पाटील, ऋष��केश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहताना, प्रसिद्धीपासून दूर राहून गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना पाणी पोहोचवणाऱ्या धनंजयने मात्र मन जिंकलं.
रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या योगदानाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. धनंजयचं काम त्याचीच आठवण करून देतं. कोणत्याही अपेक्षेविना केलेली छोटीशी कृतीही मोठ्या संघर्षाला बळ देऊ शकते.
धनंजय, तुझं आणि तुझ्यासारख्या निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक! तुझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचा अभिमान वाटतो.
#pune #mpscprotest #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #mpsc
Elon Musk: "Dear Prime Minister Ambani."
Starlink is still waiting for India. Jio fans say Rs 8,600 vs Rs 350. Wrong comparison.
Let them compete. Let people decide.
#ElonMusk#Starlink#CryptoWala
आदरणीय राहुल गांधी जी (@RahulGandhi), मह��राष्ट्र के लाखों MPSC छात्रों की आवाज बुलंद करने और उनके संघर्ष को अपनी आवाज देने के लिए आपका सहृदय आभार! 🙏
यह लड़ाई सत्ता की नहीं, बल्कि सत्य और न्याय की है। महाराष्ट्र का युवा आज अपने हक के लिए रास्तों पर लड़ रहा है। तमाम छात्रों की पुरजोर मांग है कि आप स्वयं इस आंदोलन में उपस्थित होकर उनका मनोबल बढ़ाएं और इस न्याय पथ पर उनका साथ दें। कृपया छात्रों की इस भावना पर विचार करें, यह आपसे विनम्र प्रार्थना है!
पुण्यात काल रात्रीपासून MPSC विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी सत्याग्रह करत आहेत.
पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी स्पष्ट आहे, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा.
आमदार रोहि��दादा पवार आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष ठामपणे उभे राहत या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
काँग्रेस पक्षाचा या सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा असून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नाही. पार���र्शक MPSC साठी संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal
@INCRojgar
#MPSC #MPSCStudents #विद्यार्थी #सत्याग्रह #Congress
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून सरकार याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आम्ही आजपासूनच पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत सत्याग्रह सुरु केला आहे.
आता राजीनाम्याशिवाय माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
मुख्यमंत्री महोदय, भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बाँबही पिकवायला लागला का? म्हणून शेतातही मेटल डिटेक्टर लावण्याची वेळ या सरकारवर आली..!
देशात प्रथमच असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय.. हा बळीराजाचा आणि गरीबांचा अवमान आहे.
मुख्यमंत्री साहेब, डिटेक्ट करायचंच असेल तर आज अडचणीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या भावना डिटेक्ट करा आणि बळीराजाला हेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये मदत द्या.
#दिखाव्याचा_पाहणी_दौरा #दुष्काळ
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.
भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाण��� २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या!
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ता��द द्यावी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम म��गणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्���िव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह ��ा धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आ��ि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर ���रावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
मा.@mpsc_office@bhimanwar लिपिक टंकलेखक पसंतीक्रम देताना उद्योग निरीक्षक तांत्रिक सहायक सुद्धा दिसत होते आता काढले म्हण तुम्ही तर जे चुकून दिसत होत ते फॉलो करा त्यात जाहिराती मधील सर्व पद टाका आणि एकदाच घ्या पसंतीक्रम लई भारी होईल..... चुकून चूक नव्हती आता दुरुस्ती होती दुरुस्ती ला लांबवू नका .....एकाला एक पद देऊन टाका....
मा. फडणवीस साहेब,
आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असून ही बाब ��िद्यार्थ्यांनाही मान्य आहे.
आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीन��मा देण्याचा ��ल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत.
@Dev_Fadnavis
#MPSC #MPSCPaperLeak
#StudentsDemandJustice
MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. गेल्या काही काळात पेपरफुटीसह विविध गैरप्रकार होत असल्याने एक स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डावलल्याची भावना निर्माण होत असून यातूनच त्यांची वर्षानुवर्षे केवळ ��रीक्षा देण्यातच जातात. त्यातच कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळं आईवडील मुलांना शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नाहीत. अशा वेळी लाखो विद्यार्थी उधार-उसनवार करुन पुण्यासारख्या शहरात अभ्यास करतात पण परिस्थितीमुळं हे पैसे परत करता न आल्याने आर्थिक ताण वाढतो आणि स्वाभिमानालाही ठेच लागते मग यातूनच ते आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊ��� भ्रष्ट अधिकाऱ्यांची तातडीने एमपीएससीतून हकालपट्टी करुन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची राख केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबालाही भरीव आर्थिक मदत द्यावी.
@Dev_Fadnavis
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घेण्यात यावा, या मुख्य मागणीसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत पुण्यात धडक मोर्चा!
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यांच्या��र झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
आक्रोश मोर्चासाठी #MPSC चे विद्यार्थी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात जमले आहेत.. याचवेळी काहीसा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील उज्ज्वल भविष्याचं छत्र हिरावण्याचा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. त्यामुळं पाऊस आला तरी हा आक्रोश मोर्चा विराट होणार.. मीही त्यासाठी पुढच्��ा काही मिनिटातच पोचतोय.. हा मोर्चा संविधानिक मार्गाने झाला पाहिजे यासाठी आमचं पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य असेल आणि पोलिसांचंही असंच सहकार्य राहील, ह�� अपेक्षा!
#लढू_आणि_जिंकू
#आता_नाही_तर_कधीच_नाही