निर्बुद्ध कलाकार बघा...नीट फुलफॉर्म माहित नाही तर आंदोलनात जाऊन अर्थ काय म्हणे!
मग जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो,त्यासाठी आंदोलन करणारे सगळे शेतकरी असतात का? बलात्कार पीडितेसाठी आवाज उठवणाऱ्यानवर बलात्कार झालेले असतात का? दुसऱ्याच्या व्यथा, वेदना ,अन्याय बघून तुम्हाला वाटल त्यांच्यासाठी आवाज उठवावा तर त्यात गैर काय? हा माणुसधर्म आहे ना!
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ संत तुकारामांची शिकवण आहे ना!
तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी,शेतकऱ्यांसाठी किंवा अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवायचा नाही तर उठवू नका...दुसऱ्यांना कशाला अक्कल शिकवता? यांनी पाकातली नाटक करावी, सरकारची हाजी हाजी करावी, जे उत्तम जमते ते करावे.
देशातले सगळे घोटाळे विसरून जा…
🧠 खरा घोटाळा झाला तो माणसाच्या विचारशक्तीचा.
2014 नंतर
🔁 WhatsApp Forward = सत्य
🤔 विचार = गुन्हा
❓ प्रश्न = देशद्रोह
हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही,
हा बुद्धी गहाण टाकणाऱ्या मानसिकतेविरुद्ध आहे.
ही बातमी कोणत्या दैनिकाची आहे,माहित नाही परंतु ह्यांना जरूर माहिती आहे की वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार हे हरलेले नसून त्यांना कट कारस्थान करून हरविण्यात आले आहे म्हणुच " वंचितला रोखले"असे लिहिले आहे,
पण हे सगळे गाढ झोपेत आहेत👇🏻👇🏻
@ECISVEEP@SpokespersonECI@MaharashtraSEC
हि व्यक्ती आहे बाळासाहेब दराडे ...
एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे , मागे याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना
लाखो करोडचे MOU साइन केले आणि विधार्भात लाख जॉब येतील म्हणून फायदे घेतले
नंतर याची कंपनीने काही केले नाही जेव्हा मी उघडे केले तेव्हा मला हाथ जोडून विनंती केली प्लिज डिलीट कर माझी विनंती म्हणून !!
हा माणूस पुन्हा तेच करतो काल देवेंद्र बरोबर झुरिक मध्ये होता
पुन्हा फेक mou साइन होतील दावोस मध्ये मज्जा होईल
लोकांचा पैसे उडवले जातील ...
मी त्याची २०२३ mou करतानाची न्युज देतो
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे
लेखक - प्रा.डॉ. किशोर वाघ
"भीमा तुझ्या पिढीचा आवाज मीच आहें दारातला तुझ्या तो गजराज मीच आहे गायक कवी प्रणेता जेत्या मधील जेता काहीच काल नव्हतो तो आज मीच आहें "
- महाकवी वामनदादा कर्डक
फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रवाहक म्हणून निष्ठावंतपणे काम करणारा एक सगळ्यात महत्त्वाचा वर्ग म्हणजे आंबेडकरी कवीगायक व शाहीर होय. "माझी 10 भाषणे तर शाहिराचा एक जलसा" अशी प्रशस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द शाहिरांना दिली. बाबासाहेबांच्या काळात व बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा अतिशय निष्ठेने, उपाशी राहून व प्रामाणिकपणे गायकांनी सर्व आघाडीवर प्राण पणाला लावून या चळवळीचं काम केलेलं आहे. परंतु कायमस्वरूपी गायक कवी आणि शाहीर हे फक्त राजकीय नेते व कार्यकर्त्यांना लोक गोळा करण्याचे साधन म्हणून दिसले. त्यामुळे अतिशय प्रतिभा प्रतिभावान कवी गायक शाहिरांनी प्रसिद्धी मिळवली परंतु पैसा मिळाला नाही. वेळप्रसंगी त्यांचा आंबेडकरी चळवळीत धुर्त लोकांनी कायम वापर केला.
वामनदादांसारख्या व्यक्तीला सुद्धा उपाशी -तापाशी राहून दोन वेळेस टीबी सारखा गंभीर आजाराशी झगडावे लागले. तरीसुद्धा त्यांनी आपली निष्ठा विकली नाही. कायमस्वरूपी बुद्ध फुले शाहू कबीर व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बांधील राहून शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. आजही वामनदादांचा वसा व वारसा घेऊन प्रतापसिंगदादा बोदडे यांच्यापासून पासून ते आजही खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीवर, छोट्या छोट्या पारावर, गावांमध्ये गायनाच्या माध्यमातून शाहीर कवी गायक काम करताना दिसतात. परंतु हा वर्ग अतिशय हातावर आणून पानावर खाणारा वर्ग आहे. आणि खऱ्या अर्थाने तोच निष्ठावंत आहे. हा वर्ग आपापली कामधंदे करून पुन्हा प्रबोधनाचं काम बाबासाहेबांच्या काळापासून अद्यापपर्यंत निर्व्याजपने करत आहे. परंतु तरीसुद्धा हा वर्ग कायमस्वरूपी आमच्या स्वार्थी व धूर्त राजकारणामुळे आर्थिक दृष्ट्या पंगू झाला आहे.
आमच्या खूप थोड्या राजकीय लोकांनी कलाकारांना जोपासलेले दिसते. आज पर्यंत या कवी गायक शाहिरांचा फक्त आणि फक्त वापर करणे, गर्दी जमवणे, सभा सुरू झाल्यानंतर लगेच शहराचं गाणं बंद करून त्याला सबबॉर्डीनेट भूमिका देणे. हे चालूच होते व चालूच राहणार आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने गोरगरीब सर्वसामान्य माणसाला राजकीय स्वप्न पडायला लागलेली आहे. ही लोकशाही जिवंत करणारी घटना आहे. याचाच एक भाग म्हणून अतिशय गरिबीतून व संघर्षातून पुढे आलेले एक नाव, निष्ठावंतपणे आंबेडकरी गाण्याला वाहून घेतलेला कलावंत , वंचित बहुजन आघाडीची चळवळ सुरू झाल्यापासून त्या चळवळीत कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता झोकून देणारा कलावंत म्हणजे शाहीर मेघानंद जाधव होय.
बाळासाहेबांच्या चमत्कारामुळे एक सर्वसामान्य घरातला कवी -गायक, निष्ठावंत आंबेडकर विचाराचा खंबीर कार्यकर्ता, गरीब माणूस, झोपडीतला माणूस शाहीर मेघानंदाच्या रूपाने निवडून येतो. ही खऱ्या अर्थाने किमयाच आहे. कोट्यावधी रुपयांची माया असलेली लोक एकीकडे, मसल पावर असलेली लोक,एकीकडे अनैतिकतेने ओतप्रोत भरलेली लोक एकीकडे तर दुसरीकडे आपली फकीरी फाटकी झोळी घेऊन निवडून आलेला अवलिया मेघानंद जाधव आहें. माझा मित्र भाऊ चळवळीतला सहकारी निवडून आला याबद्दल मनस्वी आनंद आहे. कारण हा खऱ्या अर्थाने आम्हा सर्व कवी गायकांचा प्रतिनिधी आहे. हा प्रतिनिधी निश्चितच गाण्याच्या रूपाने महाराष्ट्रात आंबेडकरी आवाज बुलंद करणारा शाहीर छत्रपती संभाजी नगरची महानगरपालिका गदा गदा हलवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला आहे.
छत्रपती संभाजीनगर हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या निष्ठावंत लोकांचा गड म्हणून ओळखला जाणारयात शंका नाही. सर्वसामान्य माणसांना सभागृहात पोहोचवणारे ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना व युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांना खूप खूप धन्यवाद!
"असो वा नसो काहीच आता माझ्या फाटक्या फकीरी झोळीत भीमराव जिवंत राहील सदैव माझ्या गीताच्या ओळीत "
- शाहीर मेघानंद जाधव
VBA ची ही पहलीच महानगरपालिका निवडनुक या पहिल्याच निवडनुकित डबल डिजिट मधे नगर सेवक निवडुन आलेत दोन ठिकाणी उप महापौर सुद्धा होतील.
कमी संसाधन,भ्रष्ट प्रशासन ,मिडिया ,युट्युबर,जातियाादी सोशल मिडिया हॅन्डल यांच्या अपप्रचाराला न जुमानता वंचितांनी आपला झेंडा रोवला त्याबद्दल अभिमानच 🔥
ZERO ते DOUBLE DIGITS पुढे TRIPLE DIGITS साठी पुन्हा जोमाने लढा देत राहने गरजे चे आहे नगरपंचायत व नगरपरिषद पकडुन सद्या महाराष्ट्रात 128 नगरसेवक आहेत पुढे ही वाटचाल चालुच राहिल✌️
विजयी वंचित बहुजनांचे अभीनंदन 💐
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ✌️
#VBAForIndia #PrakashAmbedjar #SujatAmbedkar
@SamadhanRokade9 अगदी बरोबर बोललात, महाराष्ट्रात काय घडवून आणायचा आहे या राजकारण्यांना माजलेत. काँग्रेस चा कंटाळा आला होता पण भाजप च तर विट आला आहे. धर्म, जाती, भाषा, प्रांत सर्वात दुफळी करत आहेत.