देशातील प्रत्येक शाळा, कॉलेज, विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा. जेव्हा देशातील प्रत्येक शहरातील विद्यार्थी रस्त्यांवर उतरला होता तेव्हा जगातील सर्वात मोठी विद्यार्थी चळवळ आहे असे म्हणवून घेणारी "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद" मात्र गायब होती.
ते सरकारचा बचाव करण्यात व्यस्त होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांना हे आवर्जून सांगा.
#studentprotest #ABVP
तो चुकीचा आहे? तो बरोबर आहे?
याच्याशी मला घेणं देणं नाही पण आपला मराठी मुलगा दिल्लीच्या हुकूमशाही तख्ताला सह्याद्रीच्या कणखर धडका देतोय. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे!
मी मराठी,
जय मराठी
जय महाराष्ट्र....
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
@NMMConline@NMMCCommr ऐरोली, नवी मुंबई येथील निर्मानाधीन असलेल्या नाट्य गृहाचा सूचना फलक मराठी भाषेत नाही.हा फलक तात्काळ मराठी राजभाषेत लावण्यात यावा ही विनंती.महाराष्ट्राची मराठी राजभाषा डावलणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या निषेधार्ह कृतीसाठी योग्य समज देण्यात यावी.
एक जोरदार थप्पड़
क्योंकि राजस्थानी डिजर्व भी यही करते हैं...
राजस्थान के विश्वविद्यालयों में कभी राजस्थानी भाषा के केंद्र खुलने के आदेश नहीं हो पाए। भाषा की मान्यता के मुद्दे पर हम कभी एकजुट नहीं हो पाए। कौन-सी राजस्थानी जैसे सवाल पूछते रह गए और एक-दूसरे को नीचा दिखाने का प्लेजर लेते रहे गए। अब इस मराठी झापड़ का आनंद लीजिए। गाल बजाइए या सहलाइए, अपनी-अपनी सहूलियत, अपनी-अपनी मजबूरी, अपनी-अपनी जरूरत, अपने-अपने अहम् और अपने-अपने वहम के अनुसार।
राजस्थान के विश्वविद्यालयों में मराठी के केंद्र खुलेंगे। क्योंकि राजस्थान के प्रथम नागरिक मराठी मानुष हैं। लेकिन अन्य आठ करोड़ मूल नागरिकों की कोई भाषा राजस्थानी के केंद्र विश्वविद्यालयों में नहीं खुल पाएंगे। भले ही महाराष्ट्र में मराठी बोली के अलग-अलग स्वरूप हों, हमें इससे क्या? हमें तो राजस्थानी का विरोध करना है। पीढ़ियों से गुलाम रहे हैं, पीढ़ियों तक और गुलाम रह लेंगे। क्या ही फर्क पड़ता है। गुलामों का कोई आत्म सम्मान, कोई आत्म बोध, कोई आत्म गौरव वगैरह कुछ होता थोड़े ही है।
बधाई हो आप सभी को
इस घोषणा पर ऐसी हर्ष ध्वनि करें कि देवता भी आकाश से पुष्प वर्षा करने के लिए विवश हो जाएं।
@RajCMO@RavindraBhati__@DoliThansingh@UmmedaRamBaytu
पहिल्याच पावसात मुंबई कशी तुंबत आहे, रस्त्यांवर खड्डे कसे पडले आहेत याची पाहणी करायला गेलेल्या महापौर महोदयांच्या समोरच, मुंबई महापालिकेचा एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. ही अवस्था या महानगराची..!
#MNSAdhikrut
@CMOMaharashtra@samant_uday@KDMCOfficial टिटवाळा येथील,गणपती मंदिर रोडवरील,आय.डी.बी.आय बँकेसमोरील उमादीप इमारतीच्या आवारातील बहुतेक फलक मराठी डावलून फक्त इंग्रजी भाषेत आहेत.किंवा मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्यात आले आहे.तरी वरील पत्त्यावरील फलकांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.
मुंबईतील प्रसिद्द देऊळ श्री सिद्दीविनायक या संस्थेवर एक परप्रांतीय खजिनदार म्हणून प्रमुख पदाधिकारी आहे.
अजूनही मुंबई मराठी माणसाची आहे म्हणत राहू..
डोळ्यादेखत सर्व हिसकावले जातेय, देवळापासून, सर्व राजकीय प्रमुख पदापासून ते मोठ्या शासकीय वास्तू सर्व हातातून निघून गेले आहे तरी मुंबई आपलीच ??
मराठी माणसा झोपेचं सोंग घेणं बंद कर बाबा...
गोवर्धन देशमुख
#मराठीएकीकरणसमिती
https://t.co/dOY1nnj0KO
मुंबईतील प्रसिद्द देऊळ श्री सिद्दीविनायक संस्थेवर परप्रांतीय खजिनदार म्हणून प्रमुख पदाधिकारी आहे
अजूनही मुंबई मराठी माणसाची म्हणत राहू?
डोळ्यादेखत सर्व हिसकावले जातेय, देवळापासून, राजकीय प्रमुख पदापासून ते मोठ्या वास्तू सर्व हातातून निघून गेले तरी मुंबई आपलीच?
मराठी माणसा जागा हो
मेट्रो तिकिट मराठीत का नाही ??
Phase=टप्पा Road=पथ/रस्ता
परकिय भाषेचे भुत तुमच्या डोक्यावरुन
का उतरत नाही ? १-२ च्या चुका दुरुस्त करा:
उदा.- गरवारे कॅालेज नाही महाविद्यालय उद्घाटनाआधी सर्व स्थानकांची यादी प्रसिद्ध करा.
वरातीमागुन घोड नको @MetroPuneri@metrorailpune#म#मराठी
१५ लाख रिक्षाचालक ही माहिती खोटी आहे, मुंबई ठाण्यात ४ लाख रिक्षाचालक आहे आणि त्यात ६०-६५% मराठी आहेत. उगाच खोटे आकडे सांगून कोणी मराठी विरोध करण्याचा प्रयत्नच करू नये. अन्यथा आम्ही आहोतच. आमचा उपचार माहितच असेल, म्हणून शिस्तीत मराठी बोला आणि कायद्याच पालन करा..
@sanjaynirupam@PratapSarnaik महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा फक्त मराठीच आहे.
महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावच लागेल.
नाहीतर गाशा गुंडाळून आपल्या आपल्या राज्यात निघायचं.
महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार.
मुंबईला उर्वरित महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्लॅन चालू आहे का ?
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापासून रेल्वे कनेक्टिव्हिटी हळूहळू बंद होत चालली आहे.
का ?
तुम्ही आमच्या अधिकारावर आक्रमण करू शकत नाही.
@Dev_Fadnavis