@CMOMaharashtra साहेब,PSI 2025 च्या जाहिरातीबद्दल जी 29 जुलै 2025 आली आहे.80 आमदारांनी पाठपुरावा करून देखील भविष्यातील 1 नोव्हेंबर 2025 वय गणण्याचा दिनांक तुम्ही माघे घेऊन 1 जानेवारी 2025 करत नसाल,तर ही हुकुमशाहीच आहे जीची तुलना हिटलरशीच होऊ शकते.अजूनही आशा आहे GR येईल म्हणून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन गंभीर आहे. PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत. ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना, मेहनती तरुणांवर अन्याय होतो आहे. सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@IYCMaha
@CMOMaharashtra साहेब,सरकार आणि MPSC च्या चुकीच्या भविष्यातील वय गणण्याचा दिनांक धरून उमेदवारांना वंचित करून आपण संविधानाच्या मूलभूत हक्क कलम 16 च उल्लंघन केलं आहे.वंचित करण्याचा अधिकार सरकार व MPSC ला आहे का?
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल
DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नाहीय,
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय नाही झाल्यास.
विद्यार्थी गांधीवादी लढाई लढतील.🤝✊
अनुच्छेद- 19
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis शासनाचा हा कसला न्याय? पोलीस शिपायांना वयोमर्यादेत सूट, मग #PSI पदासाठीच का अडवणूक? जाहिरातीला ७ महिने उशीर आणि वयोमर्यादा गणनेचा चुकीचा दिनांक यामुळे हजारो विद्यार्थ्यी चिंताग्रस्त आहेत. भविष्यातील वय धरून कलम 16 च उल्लंघन करून उमेदवारांना वंचित करण्याचा अधिकार MPSC ला आहे का?
PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधींनी विनंती करून सुद्धा GR बाबत निर्णय होत नसेल ,
तर,
शेवटचा पर्याय एकच ,
सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचा विचार करावा.
कलम 19.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने थोड्या वेळात पुढील दिशा जाहीर करतो.
#PSIवयवाढ_1वर्ष
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
परीक्षेला काही दिवस उरलेत आणि सरकार अजूनही निवडणुकीच्या युती आघाडीत अडकलेलं आहे.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.या मुजोरी आणि निष्क्रियतेमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.आता निर्णय घ्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू @CMOMaharashtra
शासनाचा हा कसला न्याय? पोलीस शिपायांना वयोमर्यादेत सूट, मग #PSI पदासाठीच का अडवणूक? जाहिरातीला ७ महिने उशीर आणि वयोमर्यादा गणनेचा चुकीचा दिनांक यामुळे हजारो विद्यार्थ्यी चिंताग्रस्त आहेत.
मा. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis, विद्यार्थ्यांनी ५-६ महिने पाठपुरावा करूनही शासन ढिम्म का? अनेक मुले कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना चिकाटीने अभ्यास करत आहेत. त्यांच्या मेहनतीचा सरकार का विचार करत नाही ? तात्काळ १ वर्षाची सवलत द्या आणि वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ पासून ग्राह्य धरा!
विद्यार्थ्यांच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठींबा आहे.
#MPSC #PSIवयवाढ #JusticeForMPSCStudents
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis साहेब,2025 च्या जाहिरातीमध्ये PSI चे वय गणण्याचा दिनांक हा भविष्यातील जे वय झालेच नाही असे 1 नोव्हेंबर 2025 केल्यामुळे असंख्य उमेदवार एक दोन महिन्यांनी जास्त भरून अपात्र ठरले आहेत.कृपया वय गणण्याचा दिनांक 1 जानेवारी 2025 करून दिलासा द्यावा,ही विनंती.
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC