ऊर्जा शोषून घेणाऱ्या गोष्टी
* सतत भूतकाळाचा विचार करणे
* झोपेच्या वेळेत अनियमितता
* पसारा आणि अस्ताव्यस्तपणा
* दीर्घकाळ बसून राहणे
* सोशल मीडिया
* अति काम करणे
* शरीरात पाण्याची कमतरता
* स्क्रीनचा अति वापर
* मनात राग व आकस ठेवणे
* नकारात्मकता
* जंक फूड
* सतत बातम्या पाहणे
* मद्यपान
* ताणतणाव
* भीती
ऊर्जा द���णाऱ्या गोष्टी
* निसर्गाच्या सान्निध्यात राहणे
* पुरेशी विश्रांती
* सूर्यप्रकाश
* धैर्य
* सकारात्मकता
* कृतज्ञता
* पुरेसे पाणी पिणे
* ध्यानधारणा
* शारीरिक हालचाल व व्यायाम
* श्वसनाचे व्यायाम
* समाजाशी जोडलेले राहणे
* अनावश्यक पसारा कमी करणे
* नियमित व पुरेशी झोप
* सकस व नैसर्गिक अन्न खाणे
* दररोज काहीतरी नवीन शिकणे
Happy weekend!
दारूबद्दलचे मिथ -
१) दारू मुळे स्ट्रेस कमी होतो
अत्यंत चुकीचे आहे. अल्कोहोल मुळे कोर्टिसोल लेवल्स वाढतात त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्त भीती, निराशा, anxiety वाढते.
२) दारूमुळे झोप चांगली लागते
अत्यंत चूक अल्कोहोलमुळे फक्त बेहोशी, बेशुद्धीची स्थिती निर्माण होते. पण त्यात नैसर्गिक झोपेसारखी शरीर व मनाची अवस्था प्राप्त होत नाही. शरीराची रिपेरिंग न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अपुऱ्या झोपेमुळे होणारे सर्व परिणाम शरीरावर मनावर दिसून येतात.
३) दारूमुळे आत्मविश्वास वाढतो
अत्यंत चूक. अल्कोहोल मुळे मेंदूच्या अशा केंद्रांवर परिणाम होतो की ज्यामुळे योग्य-अयोग्य, चांगले वाईट याची वर्गीकरण करण्याची क्षमता नष्ट होऊन जाते त्यामुळे माणूस बेदरकारपणे वागतो. त्याचे अत्यंत वाईट वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम होतात.
४) दारू मर्यादि�� प्रमाणात फायदेशीर असते
अत्यंत चूक जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक संघटनांच्या अहवालानुसार दारू हे कॅन्सर निर्माण करणारे, लिव्हर सिरोसिस करणारे आणि शरीरात इन्फ्लामेशन निर्माण करणारे केमिकल आहे.
५) दारू हे एक सोशालाईझ करायचे पेय आहे
अतिशय चूक अल्कोहोल हे व्यसन निर्माण करणारे रासायनिक द्रव्य आहे जे शरीराला मनाला व सामाजिक स्थितीला नुकसान करते.
डिसिप्लिन म्हणजे मनाविरुद्ध जाणे!
मन म्हणते आराम करूया पण आपण काम करत राहणे.
मन म्हणते सोडून देऊ या पण आपण टिच्चून काम चालू ठेवणे.
मन म्हणते उद्या/ नंतर करू पण आपण आत्ताच सुरू करायचे.
ही अशी शक्ती आहे जी अशक्याला शक्य करून टाकते.
डिसिप्लिन म्हणजे आपले मन म्हणजे आपण नव्हे हे ���क्षात घेणे, अनुभवातून शिकत जाणे.
आपले मन म्हणजे मी नव्हे.
.मनात आलेला प्रत्येक विचार अंमलात आणणे माझ्यावर बंधनकारक नाही हे शिकणे, आत्मसात करणे यात ताकदवान होण्याचे रहस्य आहे.
आपण मनाप्रमाणे नाही तर मनाला आपल्याप्रमाणे करायला भाग पाडणे ही खरी साधना आहे.
The street light near the GPRA Quarter is not functioning. Immediate intervention is required to restore the lighting and prevent any untoward incidents due to darkness in the area.
आपल्या मनात प्रत्येक क्षणी उत्पन्न होणारे विचार आणि आपण हे एकच नसून दोन वेगवेगळे घटक आहेत ही जाणीव निर्माण होणे आणि या निर्माण झालेल्या जाणिवेतून आपल्या मनात प्रत्येक क्षणी निर्माण होणाऱ्या विचारांकडे त्रयस्थ किंवा तटस्थ वृत्तीने पाहण्यास सुरुवात केल्याने आपण अधिकाधिक ताकदवान, परिणामकारक, प्रभावी, दृढनिश्चयी, यशस्वी, समाधान�� होत जातो.
कोणतीही सवय आपल्याला लावून घ्यायची असल्यास त्यासाठी ती बाब वारंवार करणे, सातत्याने करत राहणे हा योग्य मार्ग आहे, परफेक्ट पद्धतीने करणे हा नव्हे !
गोष्टी वारंवार करत राहिल्याने, सातत्याने करत राहिल्याने सवयीत परिवर्तित होतात पण एखादी कृती आपल्याला पहिल्या दिवसापासून परफेक्ट आली पाहिजे हा अट्टाहास आपल्याला ती कृती करण्यापासून परावृत्त करत जातो.
नवीन वर्षात स्वतःत अमुलाग्र आणि ताकदवान बदल घडविण्यासाठी काही सवयी
नवीन वर्ष उजाडण्यास अद्याप १५ दिवसांचा अवकाश आहे. आजपासून आपण खलील बाबी लक्षात घ्याव्यात
१) सकाळी सूर्योदयापूर्वी शक्य झाल्यास ५ वाजता उठणे.
२) किमान १ लिटर पाणी पिऊन हायड्रेशन करणे.
३) किमान अर्धा तास मेडिटेशन करणे शक्यतो विपश्यना शिकुन साधना करणे.
४) वजन उचलण्याचा व्यायाम करणे तसेच त्यासोबत एक मैदानी खेळ खेळण्याची सवय लावून घेणे.
५) पूर्वनियोजनाप्रमाणे दिवसाचे कामास निश्चित व नियोजित वेळी सुरुवात करणे.
६) पूर्वनियोजनाप्रमाणे दिवसभराचे कामकाज पुर्ण करणे.
७) दर तासाला ५ ते दहा मिनिटांची विश्रांती घेणे, कामात ब्रेक घेणे.
८) आहारात कार्ब कमी करून प्रथिने वाढवणे.
९) पूर्वनियोजित वेळी काम संपवणे.
१०) सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसाठी काह���तरी वेळ मोकळा ठेवणे.
११) झोपण्यापूर्वी किमान एकतास सर्व स्क्रिन्स बंद करणे.
१२) दुसऱ्या दिवसाच्या कामांचे वेळनिहाय नियोजन करणे, लिहून काढणे.
१३) दिवसभरात काय केले, काय राहुन गेले याची पाच सहा मिनिटात उजळणी करणे.
१४) कोणतेही नॉन फिक्शन पुस्तक वाचत वाचत दिवस संपवणे.
१५) उशिरा उशिरा १० वाजेपर्यंत झोपुन जाणे, किमान ७ तास झोपेचे नियोजन करणे, शक्य तितकी जास्त झोप मध्यरात्रीपूर्वी घेणे.
या सर्व सवयी जरी ��वीन वर्षात लावून घ्यायच्या असल्या तरी आजपासून या बाबी कशा शक्य होतील तश्या, जेव्हढा शक्य होतील तेव्हढ्या करायला सुरुवात करा म्हणजे नवीन वर्ष सुरू होईपर्यंत आपण त्याला सरावलेले असाल.
डॉ प्रशांत भामरे.
कोण कोण हे चॅलेंज घेणार ? आणि किती दिवसात साध्य करणार ?
१. आठ मिनिटात किमान एक किलोमीटर पळणे
२. 30 सूर्यनमस्कार सलग मारणे
३. दोन मिनिट प्लांक करणे.
४. तीस जोर बैठक मारणे
५. सलग एक मिनिट एका पायावर उभे राहणे
६. गुडघे न वाकवता पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करणे
७. पंचेचाळीस सेकंद श्वास रोखून धरणे
८. किमान १० पुलप्स सलग मारणे.
९. आणि दररोज सकाळी किमान १५ मिनिटे माईंडफुलनेस करणे.
हे साध्य केले तरी बहुतांश शारीरिक मानसिक फिटनेस साध्य होऊन ज���ते.
डॉ प्रशांत भामरे.