व्यक्त आणि अव्यक्त भावनांमध्ये व्यक्ती लंबकाप्रमाणे फिरत असते.हे सांगू की नको ह्या संभ्रमात काही गोष्टी बोलायच्या राहून जातात, त्या एखाद्या टाचणी सारख्या मनाला कायम टोचत राहतात.मात्र आतली भळभळती जखम कुणालाही कळत नाही.कधीतरी कुणीतरी फुंकर घालेल ह्या आशेवरच राहावे लागते.