Recovery is an important part of building lean muscle mass. 💪🏼
#Herbalife24 Rebuild Strength is what I choose with the right amount of protein and carbs. Have you tried it?
#RebuildStrength#MuscleRecovery#Ad
A good way to start the day? A healthy breakfast. Herbalife Formula 1 delivers a balanced mix of protein, fiber, vitamins, and minerals.
#Herbalife#HealthyBreakfast
क्षण विसाव्याचे!
आपल्या कागल शहरात दौऱ्यावर असताना श्री. अजित घाटगे यांच्या घरी जाण्याचा योग आला. यावेळी चिमुकल्या श्रेणिताची भेट झाली आणि तिला जवळ घेण्याचा मोह आवरला नाही.
चिमुकलीचे वडील अभिजित पवार भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असून ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अतिशय गोंडस असणाऱ्या श्रेणिता हिने काही क्षणातच दिवसभराचा सारा शीन घालवला आणि नव्याने ऊर्जा दिली.
#kagal #moments #children #emotions
हे यश स्व.राजे साहेबांच्या दूरदृष्टीचे,
हे यश तुम्हा सर्वांच्या मेहनतीचे...
अनेक वर्षांपूर्वी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी एक स्वप्न पाहिले. स्वप्न राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पेलण्याचे, शेतकरी बांधवांना हक्काचा कारखाना मिळवून देण्याचे, अनेक हातांना रोजगार देऊन संसारांना हातभार लावण्याचे! आज स्व. राजे साहेबांनी लावलेल्या रोपट्याचा महावृक्ष बनला असून याची सावली अनेकांच्या डोक्यावर छाया देत आहे.
नुकतेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील सर्व २६० कारखान्यातून आपल्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा सर्वोत्कृष्ट सहकारी कारखाना म्हणून गौरव करण्यात आला असून हा ७० वा गौरव खऱ्या अर्थाने कारखान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, त्याचे हित चिंतणाऱ्या अनेक हातांचे आहे.
याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातही आपण हा पारदर्शक आणि अभिमानास्पद कारखाना असाच सुरू ठेवू, ही इच्छा...
#kagal #SugarFactory #business #success #awards
इतिहासात कोरलेलं काम.. जे कधीच मिटणार नाही.
देशात पहिल्यांदा अनाथ मुली आणि मुलांना आरक्षण 2018 साली कोणी दिलं असेल तर... तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी दिला.
❣️❣️
आज, 2024 यावर्षी अनाथ मुली आणि मुलांना मोफत शिक्षण सुद्धा देण्यात आलं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाहेब!
आज आमच्या आईसाहेब सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांचा वाढदिवस! स्व. राजे साहेबांशी विवाह झाल्यानंतर संपूर्ण कागल हेच आपले घर मानून कागलसाठी तत्पर असणाऱ्या आईसाहेब आमच्यासोबत अवघ्या कागलच्या आईसाहेब बनल्या.
राजे साहेबांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या आईसाहेबांनी कागलचे सुख हाच आपला आनंद आणि कागलच्या समस्या या स्वतःच्या समस्या समजून राजे साहेबांना सोबत केली. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे साहेबांचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना आईसाहेब हिमालयासारख्या आमच्या पाठीशी उभ्या आहेत.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि त्यांच्या मायेची छत्रछाया सदैव आम्हा सर्वांच्या डोईवर राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
#birthday #happybirthday #birthdaywishes #आईसाहेब
Get Well Soon...
म्हाकवे गावात वास्तव्यास असणारे श्री. युवराज पाटील हे ड्रेस फोटोग्राफर असून काही दिवसांपूर्वी कुक्कुटपालन पोल्ट्रीच्या छतावरून पडल्याने त्यांचा अपघात झाला होता.
अपघातात त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला असून दौऱ्याच्या निमित्ताने गावी गेलो असता त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. यावेळी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत लवकरात लवकर बरे होण्यासाठी मनोमन इच्छा व्यक्त केली.
#patient #getwellsoon
मनःपूर्वक अभिनंदन प्रवीण!
मळगे खु. गावातील श्री. प्रदीप भोसले हे आपल्या शाहू कारखान्याचे मानधनधारक मल्ल असून त्यांचे बंधू श्री. प्रवीण कुंडलिक भोसले यांची छत्रपती प्रमिलाराजे अर्थात CPR रुग्णालयात एक्सरे विभागात अटेंडन्ट म्हणून निवड झाली आहे.
याबद्दल त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून हे पुण्यकर्म करण्याची त्यांना संधी मिळाली आहे, याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि हे काम प्रामाणिकपणे करत लोकांना सेवा द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.
#cprhospital #xrayattendant #selection #Congratulations
सदिच्छा भेट!
केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांची सदिच्छा भेट घेतली आणि नूतन मंत्रिमंडळात मिळालेल्या पदासाठी अभिनंदन करत राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिंधिया कुटुंबाशी आपल्या घाटगे घराचे जुने नाते असून स्वराज्यासाठी दोन्ही कुटुंबांनी आपले सर्वस्व पणाला लावत लढाया लढल्या आहेत. याचसह उत्तम प्रशासक असणाऱ्या स्व. राणी बायजाबाई या दोन घरातील दुवा होत्या. आजही हे नाते टिकून आहे आणि भविष्यात देशाच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू.
@JM_Scindia@BJP4India@BJP4Maharashtra
#visit #Congratulations #bestwishes