एवढा माज येतो कुठून? ज्या राज्यात कमवायला यायचं त्याच राज्यात मराठी भाषा बोल म्हटल्यावर मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला एवढी हिंमत वाढली आहे या परप्रांतीयांची?
बिनशर्त पाठिंब्यावाले देतील का उत्तर?
@mnsadhikrut@AUThackeray@ShivsenaUBTComm
धन्यवाद @lokmat#मराठी#म
History will remember for his brilliant Captaincy in 2020-21 BGT. 36 All out, virat back to home and and the Masterclass in Melbourne and broken the Gaba ka Ghamand.
Thanks for memories @ajinkyarahane88#ajinkyarahane
लड़ो
लड़ नहीं सकते, बोलो
बोल नहीं सकते, लिखो
लिख नहीं सकते, साथ दो
साथ नहीं दे सकते, काम करने वालों का मनोबल बढ़ाओ।
यदि वो भी नहीं कर सकते हो, जो कर रहे हैं, उनका मनोबल मत तोड़ो।
क्योंकि वो तुम्हारे हिस्से की लड़ाई लड़ रहा है।
#isupportsonumwangchuk#jantarmantarprotest
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
महाराष्ट्राचे राजकारण आत्मपरीक्षणावर आलेले आहे.
महाराष्ट्र केवळ एक भौगोलिक राज्यरचना नाही.ती विचारांची, संघर्षांची, सामाजिक परिवर्तनाची आणि प्रबोधनाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना दिली. महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित केला. छ.राजर्षी शाहू महाराजांनी समतेचे राज्य उभारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून लोकशाहीचे अधिष्ठान निर्माण केले. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची दिशा ठरवली.
या सर्व परंपरेचा गाभा होता विचार, तत्त्व, जनहित, सामाजिक न्याय, सार्वजनिक जीवनातील नैतिकता.
परंतु आज महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहताना अनेकांच्या मनात अस्वस्थता आहे. कारण जनतेने एका विचारासाठी दिलेला कौल अनेकदा सत्तेच्या गणितात हरवत आहे. भूमिका वेळोवेळी बदलते. विचारधारा, सत्तेची समीकरणे बदलतात. व दुर्दैवाने त्यासोबत निष्ठाही बदलताना दिसते.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने पक्षफोडी, पक्षांतर सत्तेसाठी बदललेल्या आघाड्या, वैचारिकदृष्ट्या परस्पर विरोधकांचे एकत्र येण्याच्या वेगळे होण्याच्या अनेक घटना पाहिल्या. त्यामुळे सामान्य मतदाराच्या मनात एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की आपण मतदान नेमके कशासाठी करतो ? विचारांसाठी की सत्तेच्या व्यवहारांसाठी?"
विचारधारा दुय्यम आणि सत्तेची गणिते प्राथमिक होत आहेत.निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक खर्चिक बनत आहे. पैशाचा आणि संसाधनांचा प्रभाव वाढत चालला आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला व व्यवस्थापनाला अधिक महत्त्व मिळत आहे. पक्षनिष्ठेपेक्षा सत्तानिष्ठा महत्त्वाची ठरत आहे. लोकप्रतिनिधी उत्तरदायित्वाची भावना कमकुवत होत असल्याची भावना निर्माण होत आहे.
"महाराष्ट्राचा गोलपीठा झाला" त्यापैकीच एक उपमा आहे. ही उपमा प्रत्यक्ष अर्थाने नसून महाराष्ट्राच्या राजकीय मूल्यांचे होत असलेले कथित अवमूल्यनासाठीची एक एक उपरोधिक,संतप्त भाषिक प्रहार आहे.
या परिस्थितीसाठी केवळ एकाच पक्षाला जबाबदार ठरत नाही. पक्षांतर, सत्तासंघर्ष, गटबाजी आणि राजकीय व्यवहारवाद हा भारतीय राजकारणाचा दीर्घकालीन भाग राहिला आहे. त्यामुळे ही समस्या एखाद्या व्यक्तीची व पक्षाची नसून संपूर्ण राजकीय संस्कृतीच्या अधोगतीची आहे.
लोकशाहीची खरी ताकद मतपेटीत नसते; ती जनतेच्या विश्वासात असते. सत्ता येते व जाते, पक्ष बदलतात, आघाड्या बदलतात, चेहरे बदलतात पण जनतेचा व समाजाचा विश्वास एकदा ढासळला तर पुन्हा निर्माण करणे अत्यंत कठीण असते.
महाराष्ट्राला आज नव्या सत्तेची नव्हे तर नव्या राजकीय प्रामाणिकतेची गरज आहे. नव्या घोषणांची नव्हे, तर नव्या विश्वासाची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र राज्याला पुन्हा एकदा विचारांच्या राजकारणाकडे परतण्याची गरज आहे.
कारण महाराष्ट्राचा इतिहास हा सत्तेचा इतिहास नाही तो मूल्यांचा इतिहास आहे.
- महाराष्ट्र 🚩
#महाराष्ट्र #Maharashtra
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.
उद्धव ठाकरे घरात बसून असतात म्हणून खासदार फुटले.
मग
शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचे पक्ष का फुटले?
तेव्हा हे लक्षात घ्या की,
सत्तेच्या भयंकर गैरवापराला लपवण्यासाठी असली कारणे पेरली जातात.
या सत्तेसमोर तोच टिकेल ज्याची सत्याशी बांधिलकी असेल आणि संघर्षाशी नाळ जुळलेली असेल.
ऑपरेशन टायगर : महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात "ऑपरेशन टायगर" हा शब्द मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अद्याप अधिकृतरीत्या हे ऑपरेशन समोर आलेले नाही. सध्या केवळ चर्चा व दावे सुरू आहेत. परंतु या घडामोडीकडे केवळ काही खासदार पक्ष बदलतील की नाही एवढ्यापुरते पाहणे चुकीचे ठरेल. हे ऑपरेशन महाराष्ट्राचे राजकीय वर्चस्व, शिवसेनेचा वारसा, भविष्यातील सत्ताकेंद्र निश्चित करण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीनंतर महाराष्ट्र राजकारणाचा केंद्रबिंदू बदलला. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने संघटन विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेत ताकद मिळवली तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील लोकसभेबरोबर भावनिक, वैचारिक आणि पारंपरिक शिवसैनिकांचा आधार कायम ठेवला आहे. त्यामुळे संघर्ष खरी शिवसेना कोणाची ? हा प्रश्न अजून संपलेला नाही.
ऑपरेशन टायगरची चर्चा थांबत नाही व जर खासदार गेले तर त्यानंतरही ही चर्चा थांबणार नाही. विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार एकनाथ शिंदे पक्षाकडे गेले तर त्याचा परिणाम संख्याबळावर व शिवसेनेच्या वारशाचे केंद्र आता बदलत आहे असा जाईल म्हणूनच हे ऑपरेशन प्रत्यक्षात मानसिक, संघटनात्मक आणि प्रतीकात्मक युद्ध आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाची भूमिकाही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप दीर्घकालीन दृष्टीने स्वबळावर जात आहे. ऑपरेशन टायगर हे केवळ दिल्लीत एनडीएला मजबूत करणे नसून शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व,ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. अधिक आमदार, खासदार व अधिक संघटनात्मक आधार मिळाल्यास भविष्यात भाजपसमोरही त्यांची राजकीय किंमत वाढते. त्यामुळे ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व व विस्तारवाढ या दोन्हींचा प्रश्न आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांचे काही नेते किंवा खासदार सत्ताधारी आघाडीकडे आकर्षित होण्यामागेही काही राजकीय वास्तवाचा आधार आहे. निवडणुकीतील जिंकण्याची शक्यता, संघटनात्मक संसाधने, राजकीय सुरक्षितता, निधी, मतदारसंघाची स्थानिक समीकरणे या सर्व गोष्टी आहेत. भारतीय राजकारणात विचारधारेइतकेच राजकीय अस्तित्वाचे गणितही सध्या महत्त्वाचे बनले आहे.
तथापि देशाचा राजकीय इतिहास सांगतो की पक्षफोडी,पक्षांतर व सत्तासमीकरणे या राजकारणाची केवळ एक बाजू आहे. अंतिम निर्णय मतदारांच्या हातात असतो. अनेक वेळा प्रचंड शक्तिशाली दिसणारे पक्ष पराभूत झाले तर संकटात सापडलेले पक्ष नव्याने उभे राहिले आहेत. त्यामुळे कोणत्याही ऑपरेशनचे यश हे केवळ नेत्यांच्या पक्षांतंराने ठरत नाही तर ते जनतेच्या स्वीकारावर ठरते.
ऑपरेशन टायगर हे काही खासदारांना आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न आहे तेवढ्यापुरते नाही. हे प्रत्यक्ष महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व, शिवसेनेच्या वारशावरील दावा, हिंदुत्ववादी राजकारणाचे भवितव्य व पुढील सत्तेचे केंद्र कोणाचे यावरील एक संघर्ष आहे.
#Maharashtran #UddhavThackeray #EknathShinde #BJP
#Operationtiger #Shivsena
मोटेगावकरला वैद्यकीय तपासणी साठी रुगणालयात नेले तेव्हा तिथल्या डॉक्टरला पाहून मोटेगावकर ला घामच फूटला . तेव्हा डॉक्टर म्हणाल कि घाबरू नका सर मी तुमचाच विद्यार्थी आहे . त्यावर मोटेगावकर म्हणाला कि म्हणूनच मी घाबरलो ना -...
🤣😄
कॉक्रोच जनता पार्टी हा देशातील जेन झी पिढीच्या संतापाचा आविष्कार आहे.तरुणाईला कामाऐवजी रामाचे नाव सांगणाऱ्या तर मुद्द्याऐवजी केवळ टीकेसाठी टीका करणाऱ्यांना हा इशारा आहे, इन्स्टा पिढीला रिझल्ट पण इन्स्टंट हवेत,पण CJP चे JP आंदोलनात रुपांतर होण्याची शक्यता कमी आहे,श्रेय CJI यांचे
बहू असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
"Proud to belong to a land where culture, courage & pride never fades"
#maharashtra#maharashtradin#म#मराठी#marathi